Mumbai Pune Nagpur Weather Updates : मुंबईः शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना दादर परिसरात घडली. १६ वर्षांच्या मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली. तिच्याविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गक गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.
मुंबई उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मोनो, मेट्रो आणि एसटीतून एकाच कार्डद्वारे प्रवास करण्याचे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १’ ॲप तयार करीत आहे. तर मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या एकाला पुणे खडक पोलिसांनी अटक केली. शाम ज्ञानोबा हातागळे (वय ५०, रा. घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तसंच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप जोशी यांनी ऑनलाईन अॅप्सद्वारे ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांमधून होणारी फसवणूक, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि तपासणी यंत्रणेच्या अभावावर प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.
तेव्हा मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे – नागपूर शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल.
Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi
मुंबईतील शाळांना या देशांमधून येताहेत धमकीचे ई-मेल…
पुण्यात मतिमंद मुलीवर अत्याचार करणारा अटकेत
पुणे : मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या एकाला खडक पोलिसांनी अटक केली. शाम ज्ञानोबा हातागळे (वय ५०, रा. घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आजीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ऑनलाइन अन्न पदार्थ वितरणात अशी होते फसवणूक, आमदार संदीप जोशी यांनी उघड केले वास्तव
नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप जोशी यांनी ऑनलाईन अॅप्सद्वारे ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांमधून होणारी फसवणूक, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि तपासणी यंत्रणेच्या अभावावर प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.
लवकरच लोकल, मेट्रो, मोनो, बेस्ट, एसटी तिकीटसाठी एकच कार्ड
मुंबई : उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मोनो, मेट्रो आणि एसटीतून एकाच कार्डद्वारे प्रवास करण्याचे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १’ ॲप तयार करीत आहे.
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २ जुलै २०२५