Mumbai Breaking News Today , 8 July 2025 : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून कोकण आणि पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. त्या तुलनेत इतर भागात पावसाचा जोर कमी आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
कोकणातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून दोन्ही सभागृहांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर जिल्ह्यांतील तसेच राज्याच्या इतर भागांतील ताज्या घडामोडी या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Live Updates
Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi
शिष्यवृत्ती योजनांतील अडचणी सोडवण्यासाठी मोठा निर्णय…
शिष्यवृत्ती, शिक्षण आणि परीक्षा शुल्क, परदेशी-परराज्य शिक्षण शिष्यवृत्ती योजनांबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्थाच्या अडचणी दूर करण्यासाठी शिष्यवृत्ती मदत कक्ष सुरू करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. …अधिक वाचा
ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले ठरले ‘महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार’
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाला विचारवंत, लेखक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले होते. …सविस्तर वाचा
वीज कर्मचाऱ्यांचा संप, पण महावितरणकडून ‘नो पावर कट’ची ‘गॅरंटी’
महावितरणने सांगितले की, नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे. …सविस्तर वाचा
ससूनचे कामकाज ऑनलाइन! रुग्णांची माहिती एक क्लिकवर अन् रांगेत थांबण्याचा वेळही कमी
राष्ट्रीय सूचना केंद्राने विकसित केलेल्या नेक्स्ट जनरेशन ई-हॉस्पिटल प्रणालीचा यासाठी वापर केला जात आहे. रुग्णालयात ऑनलाइन नोंदणीसाठी एकूण २० संगणक आणि २० कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. …सविस्तर वाचा
भंडारा : ‘…तर जिल्हाधिकारी कार्यालयातच राहायला जाऊ’ कारधा गावाला पुन्हा पुराच्या पाण्याने वेढले
दरवर्षीप्रमाणे वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आणि वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या कारधा गावातील घरांमध्ये वैनगंगेचे पाणी शिरले.यापुढे पातळीत वाढ झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयात राहायला जाऊ,असा इशारा पूर बाधित नागरिकांनी दिला आहे.
…अधिक वाचा
आषाढी वारीत ९ लाख वारकऱ्यांची आरोग्य सेवा! सार्वजनिक आरोग्य विभागाची मोहीम
आरोग्य विभागाने आषाढी वारीच्या काळात विशेष मोहिमेच्या माध्यमातून ९ लाख २३ हजार ५०९ वारकऱ्यांना आतापर्यंत आरोग्य सेवा पुरविली असून परतीच्या वारीमध्येही १० जुलैपर्यंत विभागाकडून वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. …अधिक वाचा
अग्निशमन दलाचा जवान ठरला देवदूत; खिडकीतून पडणाऱ्या चार वर्षांच्या बालिकेचे प्राण वाचविले
कात्रज भागातील खोपडेनगर परिसरात ही घडली. याच भागात राहणारे अग्निशमन दलाचे जवान योगेश चव्हाण यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी त्वरीत तेथे धाव घेऊन खिडकीच्या जाळीला धरून थांबलेल्या बालिकेचे प्राण वाचविले. …सविस्तर वाचा
डोंबिवलीजवळील निळजे गावातील विदेशी नागरिकाकडून दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त
गेल्या दहा दिवसाच्या कालावधीत पलावा, निळजे परिसरात कोट्यवधी रूपयांचे अंमली पदार्थ दुसऱ्यांदा जप्त करण्यात आल्याने या भागातून अंमली पदार्थांची उलाढाल करण्यासाठी या भागात तस्करांचा एक मोठा तळ असण्याचा संशय पोलिसांना आहे. …वाचा सविस्तर
रघुवीर घाटात सतत दरडी कोसळू लागल्याने महामार्ग बनला धोकादायक, रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांचा संपर्क तुटण्याची भीती
पावसाळ्यात सतत दरडी कोसळत असल्याने रत्नागिरी सातारा मार्गावरील दरडीचा घाट म्हणून गेल्या काही वर्षांत या घाटाने आपली ओळख निर्माण केली आहे. …वाचा सविस्तर
कळव्यातील पाणी टंचाईवर नताशा आव्हाड यांनी प्रशासनाला विचारला प्रश्न…म्हणाल्या, ठाण्यातच माणसे राहतात का?
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्ष लीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा होतो. …वाचा सविस्तर
ठाणे जिल्हा रुग्णालयात सुरु होणार राज्यातील पहिले तृतीपंथीयांसाठी स्वतंत्र उपचार कक्ष
ठाणे जिल्हा रुग्णालयात तृतीपंथीयांसाठी स्वतंत्र कक्ष असावा यासाठी सर्वच स्तरावरून पाठपुरावा सुरु होता. यासाठी नुकतीच मुंबई येथे एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. …सविस्तर बातमी
पुण्यातील ढोल-ताशा पथकांबाबत काँग्रेसने केली मोठी मागणी !
शहरातील युवकांनी गेल्या काही वर्षांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा चेहरामोहरा बदलला आहे. …सविस्तर बातमी
डोंबिवलीत नेहरू रस्त्यावर उघड्यावर गांजा सेवकांची गर्दी
मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हे प्रकार सुरू असताना रामनगर पोलीस ठाण्याचे गस्तीवरील पोलीस जुगार अड्डा चालक, उघड्यावर गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. …वाचा सविस्तर
…आणि मराठी अस्मितेसाठी मोर्चा निघाला, बालाजी हॉटेल ते मिरारोड स्थानकपर्यंत आंदोलकांचा मोर्चा पूर्ण
सरकार या आंदोलकांवर पोलिसांचा दबाव आणत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते व विरोधकांकडून केला जात होता. …सविस्तर बातमी
मालाडमधील शंकरवाडी रस्ता रुंदीकरणात ३५७ बांधकामांचा अडसर; ६४ प्रकल्पबाधितांना घरांच्या चावीचे वाटप
रस्ता रुंदीकरणासाठी लवकरच ही बांधकामे महापालिकेतर्फे हटविण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. …वाचा सविस्तर
पुणे : भुयारी मार्गात दुचाकी कोसळून तरुण जखमी, डेक्कन जिमखाना भागात अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार धवल हा सोमवारी (७ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव वेगात डेक्कन जिमखाना भागातून निघाला होता. …सविस्तर बातमी
‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल ; प्रशासनाने जाहीर केली दोन दिवसांची सुट्टी
भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी होत असताना शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे वृत्त काही वेळापूर्वी लोकसत्ताने व्हायरल केले होते प्रशासनाने दखल घेत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
…सविस्तर बातमी
‘मेट्रो १’ मार्गिकेवरील गर्दी लवकरच नियंत्रणात… चार डब्यांची मेट्रो सहा डब्यांची होणार…
प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे चार डब्यांची मेट्रो गाडी अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे चार डब्यांची मेट्रो गाडी सहा डब्यांची करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून होत आहे. …सविस्तर वाचा
मंत्री प्रताप सरनाईकांवर आंदोलनकऱ्यांचा रोष, ‘तुम्ही परत जा’ च्या घोषणा
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी अस्मितेसाठी सुरू असलेल्या आंदोलन स्थळी भेट दिली. मात्र सरनाईक येताच आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. …सविस्तर बातमी
गिरणी कामगार बुधवारी आझाद मैदानावर धडकणार… मुंबईतच घरे देण्याची मागणी…
शिवसेना (ठाकरे) आणि मनसेने या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. या मोर्चामध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. …सविस्तर वाचा
डोंबिवली पश्चिमेतील २४ बेकायदा इमारती तोडण्याच्या; मागणीसाठी याचिकाकर्ता पुन्हा उच्च न्यायालयात
पालिका, महसूल अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डोंबिवली पश्चिमेतील २४ बेकायदा इमारतींचे सर्वेक्षण, तपासणी नाहीच, भूमाफियांवर गुन्हेही दाखल केले नाहीत. …सविस्तर बातमी
‘मुंबई एपीएमसी’ नवी मुंबईतूनही हद्दपार?
‘ग्रोथ हब’ नियामक मंडळाच्या बैठकीत बाजारसमितीसाठी १०० एकर पर्यायी जागेचा शोध घेण्याच्या सूचना नवी मुंबई महापालिकेला करण्यात आल्या आहेत.
…सविस्तर बातमी
धार्मिकस्थळांवरील बेकायदा ध्वनीक्षेपकांवर योग्य कारवाई सुर,राज्य सरकारच्या प्रयत्नांबाबत उच्च न्यायालय समाधानी,उच्च न्यायालयाकडून अवमान याचिका निकाली
ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने धार्मिकस्थळांवरील बेकायदा ध्वनीक्षेपकांवर राज्य सरकारकडून योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे नमूद करून उच्च न्यायालयाने सरकारच्या या प्रयत्नांबाबत मंगळवारी समाधान व्यक्त केले …वाचा सविस्तर
वाडा तालुक्यातील टायर कारखान्यांचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात; प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याची आमदारांची मागणी
परदेशातून येणारे टायरचे विशिष्ट वातावरणात विघटन करून त्यापासून कार्बन ब्लॅक, पायरोऑइल तसेच स्टीलचे उत्पादन घेतले जाते. …सविस्तर बातमी
नातवाकडून आजीचा छळ…मुलाच्या व्यसनाला कंटाळून पित्याची आत्महत्या
गोरेगाव येथील रहिवासी संजय राजपूत (५५) आई स्मिता राजपूत (७६) आणि पत्नी, तसेच दोन मुले आदित्य (२७) आणि गौरव (२५) यांच्यासह रहात होते. त्यांच्या दोन्ही मुलांना अमली पदार्थांचे व्यसन होते. …सविस्तर वाचा
डहाणूजवळ बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू; मानवी वस्तीत बिबट्याचा वाढता वावर
गेल्या काही वर्षांपासून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागांमध्ये बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत आहे. …सविस्तर वाचा
कराटेचे शिकवणाऱ्या प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार…पोलिसांकडून आरोपीला अटक
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी २२ वर्षीय आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६५ (१), ३५१ (३) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यातील कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. …वाचा सविस्तर
विदर्भातील हा वीज निर्मिती प्रकल्प अदानीच्या ताफ्यात ६०० मेगावॅटचा प्रकल्प…
नागपूर जिल्यातील बुटीबोरी येथील दिवाळखोरीत निघालेला विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (व्हीआयपीएल) हा वीज निर्मिती प्रकल्प अदानी पॉवर लिमिटेडने (एपीएल)ने घेतला आहे.
…वाचा सविस्तर
कार्यालयीन वेळेत बदल… मुंबईचे डबेवाले नाराज…
कार्यालयीन वेळेत बदल झाल्यास मुंबईच्या डबेवाल्यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुपारचा जेवणाचा डबे पोहोचविण्याचे काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. …अधिक वाचा
मुंबई पुणे नागपूर न्यूज ८ जुलै २०२५