Mumbai News Updates Today 14th May 2025 : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मराठवाड्यापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वेळी काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. या बातम्या तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 14 May 2025

13:11 (IST) 14 May 2025

पुण्यातील मार्केट यार्डात अडीच किलो वजनाचा ‘खुददाद’ आंबा कर्नाटकातून दाखल

मार्केट यार्डातील फळ बाजारात दोन ते अडीच किलो वजनाच्या दीडशे किलो आंब्याची आवक झाली. कर्नाटकातून आंब्याची आवक झाली असून, एक किलो आंब्याला ६० ते ७० रुपये दर मिळाले आहेत. …अधिक वाचा
13:05 (IST) 14 May 2025

कठोर शिस्तीचे रंग दाखवताच कडोंमपाचे ‘रमतगमत’ कर्मचारी वेळे अगोदरच कार्यालयात

कल्याण डोंबिवली पालिकेत आलेले नवीन आयुक्त थेट भारतीय प्रशासन सेवेतील आहेत. ते साधे भोळे की, कठोर प्रशासकीय करड्या शिस्तीचे आहेत. …अधिक वाचा
13:05 (IST) 14 May 2025

भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये, असे शौर्य दाखवले म्हणून..;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सर्व शूरवीर सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेने तर्फे बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले …वाचा सविस्तर
12:19 (IST) 14 May 2025

गोखले पुलावरून आता ‘बेस्ट’च्या बसची प्रतीक्षा

गोखले पुलाचे काम सुरू झाल्यामुळे या मार्गावरून जाणारे दहा बसमार्ग बंद आहेत. तर काही मार्ग पर्यायी रस्त्याने वळविण्यात आले आहेत. …सविस्तर बातमी
12:06 (IST) 14 May 2025

निवडणुकांसाठी जातीय समीकरण जुळवण्याचे भाजपचे प्रयत्न; अकोला ग्रामीणमध्ये बदल, महानगरवर विश्वास कायम

अकोला ग्रामीण भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा संतोष शिवरकर यांच्या खांद्यावर देण्यात आली, तर अकोला महानगराध्यक्षपदी जयंत मसने यांना कायम ठेवले. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. …सविस्तर वाचा
11:50 (IST) 14 May 2025

बाणेर येथे मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; दोन पार्लरवर छापे

याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला असून, मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अली याला अटक करण्यात आली …वाचा सविस्तर
11:49 (IST) 14 May 2025

बेकायदा कृत्य हा असाध्य आजार; पुण्यातील शाळेला दिलासा नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

कोणीही बेकायदेशीररीत्या आणि परवानगीशिवाय बांधकामे करू शकतात. तसेच, नंतर ती नियमित करण्याची मागणी करू शकतात, अशी सर्वसाधारण धारणा किंवा समज आहे. परंतु, बेकायदेशीर कृत्य ही असाध्य आजारासारखी असल्याचा खंडपीठाने पुनरूच्चार केला. …वाचा सविस्तर
11:21 (IST) 14 May 2025

२००६ चे शस्त्रसाठा हस्तगत प्रकरण;आईप्रमाणे मातृभूमीसाठीही भावनिक राहायला हवे होते,आईच्या मृत्युनंतरच्या विधींना उपस्थित राहण्यासाठी आरोपीला जामीन नाहीच

आईच्या मृत्युनंतरच्या विधींना उपस्थित राहण्यासाठी तात्पुरता जामीन देण्यास मुंबईस्थित विशेष न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. …सविस्तर बातमी
11:05 (IST) 14 May 2025

सोहले खाण पारिसरात शेकडो झाडांची कत्तल?, वनविभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष

दक्षिण गडचिरोलीत सूरजागाड टेकडीवरील लोहाखाण यशस्वी सुरु केल्यानंतर प्रशासन आणि कंत्रादार कंपनी आता उत्तर गडचिरोलीतील खाण देखील सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. …सविस्तर वाचा
10:33 (IST) 14 May 2025

गृहमंत्र्यांच्या शहरातून ७४८ मुला-मुलींचे घरातून पलायन 

२०२४ मध्ये ३६७ शाळकरी मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी एचटीयू पथकाने तब्बल ३६४ मुलींचा राज्यासह अन्य राज्यातही शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिल्या. …वाचा सविस्तर
10:17 (IST) 14 May 2025

आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारांची टोळी अटकेत, नागपूर पोलिसांनी इंदूरमध्ये…

शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफ्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य स्तरावर कार्यरत असलेल्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा सायबर पोलिसांनी छडा लावला. …सविस्तर वाचा
10:10 (IST) 14 May 2025

मेट्रो ९; दहिसर-काशीगाव मार्गिकेवर आजपासून चाचण्या

.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता मिरा रोड मेट्रो स्थानकांवरून गाड्यांच्या चाचणीला सुरुवात होईल. …सविस्तर बातमी
10:04 (IST) 14 May 2025

मसाजच्या नावावर देहव्यापार, नागपुरातील ‘डीलाईट स्पा’मध्ये पाच तरुणी…

या मसाज सेंटरमध्ये आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मणिपूर राज्यातील तरुणी या स्पामध्ये मसाजची कामे करीत होत्या. …सविस्तर बातमी
09:36 (IST) 14 May 2025

अमिताभ बच्चन यांचा ‘अजूबा’ चित्रपट युट्यूबवर; कंपनीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे मूळ हक्क ‘इन एन्टरटेनमेन्ट’ आणि ‘फिल्मवालाज’ या कंपन्यांकडे आहे. त्यांनी याबाबत अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. …सविस्तर वाचा
09:36 (IST) 14 May 2025

मरीन ड्राइव्ह येथे महिलेची आत्महत्या

वाहतूक पोलीस सुरेश गोसावी यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून महिलेला बाहेर काढले. पण, पुढे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. …अधिक वाचा
09:28 (IST) 14 May 2025

काळाघोडा परिसरात बेकायदा शुल्कवसुली; वाहनतळ कंत्राटदार संस्थेवर दंडात्मक कारवाई

दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरच्या वाहनतळांवर जादा शुल्क आकारणी केल्याच्या घटना अनेकदा उघडकीस आल्या आहेत. तसाच आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. …अधिक वाचा
09:06 (IST) 14 May 2025

‘उजनी’तील पळसनाथ मंदीर खुले होण्याच्या मार्गावर

.उजनी धरणाच्या निर्मितीनंतर सत्तेचाळीस वर्षांपूर्वी पाण्यात बुडालेल्या अनेक गावांच्या पाऊलखुणा स्पष्ट उघड्या पडू लागल्या आहेत. …अधिक वाचा
08:30 (IST) 14 May 2025

उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला, शिंदे सेनेची निवडणुकीची आखणी सुरू

राज्यात गणेशोत्सवानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा…

08:29 (IST) 14 May 2025

मुंबईत वळवाच्या पावसाची हजेरी, पुढील दोन दिवसही मध्यम सरींचा अंदाज

मुंबईतील अनेक भागांत मंगळवारी वळवाच्या पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. पवई, घाटकोपर आणि दिंडोशी परिसरात सकाळपासून पावसासह जोरदार वारे वाहत होते.

सविस्तर वाचा…