Pune Breaking News Updates: राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये अद्याप ही राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हे फरार आहेत. शशांक, करिष्मा आणि लता यांना न्यायालयाने २६ मे पर्यंत पोलीस कोठडी पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे मुंबईसह मध्य महाराष्ट्रात बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तेव्हा मुंबई, मुंबई महानगर, पुणे आणि परिसर तसंच नागपूर शहरातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…
Live Updates
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 21 may 2025
‘शातिर’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले, २३ मे ऐवजी १३ जूनला प्रदर्शित होणार
मराठी चित्रपट ‘शातिर : द बिगिनिंग’ चे प्रदर्शन २३ मे ऐवजी आता १३ जून रोजी होणार आहे. एकाच दिवशी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असल्याने स्पर्धा टाळण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. …वाचा सविस्तर
कल्याण-डोंंबिवलीत कचरामुक्तीच्या चेन्नई पॅटर्नला प्रारंभ
या प्रकल्पाच्या माध्यमातून ही दोन्ही शहरे कचरा मुक्त आणि स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. …वाचा सविस्तर
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन; सहा भाषांमध्ये १ मे २०२६ ला जगभर प्रदर्शित होणार
छत्रपती शिवाजी महाराज यांची अतुलनीय शौर्यगाथा ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. हा चित्रपट महाराष्ट्राच्या अभिमानाचा, नाट्यमय कथेचा आणि उत्कृष्ट निर्मितीचा संगम ठरणार आहे. …वाचा सविस्तर
चुंबन, सेल्फी आणि ब्लॅकमेल; स्वागतिका तरुणीचा लैंगिक छळ
पीडित तरुणी १९ वर्षांची असून गोरेगाव येथे राहते. ती अंधेरी येथील एका खासगी कंपनीत स्वागतिका (रिसेप्शनिस्ट) म्हणून कामाला लागली. …सविस्तर बातमी
बोईसरमध्ये एकाच मंडपात १७५ आदिवासी वधू वर जोडपी अडकली विवाह बंधनात
शिवसेना आदिवासी समाज विभाग व आधार प्रतिष्ठान यांच्यामार्फत बोईसर येथील सर्कस मैदानात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. …सविस्तर वाचा
नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता नंबाला केशवराव उर्फ बसवराजसह चकमकीत २७ नक्षलवादी ठार
नक्षलवादी चळवळीचा देशातील सर्वोच्च नेता नंबाला केशवराव उर्फ बसवराज(७०) याच्यासह जवळपास २७ नक्षलवादी ठार झाले. …सविस्तर बातमी
ऑनलाईन गेमची भूरळ घालून मुलीचे अपहरण, मुंबईतील मुलगी बनारसमध्ये सापडली
‘फायर गेम’ या ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीने हे अपहरण घडले. वनराई पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे मुलीची सुटका केली आहे.
…वाचा सविस्तर
नागपूरच्या आकाशात अनोखे दृश्य, भरदुपारी सूर्याभोवती रिंगण…
२१ मे, बुधवारची दुपार नागपूरकरांसाठी काही विशेष ठरली. साधारणत: मे महिन्यात सूर्याकडे चुकुनही न पाहणारे नागपूरकरांचे डोळे आकाशाकडे वळले आणि सूर्याला बघू लागले. …वाचा सविस्तर
मुंबईत २० दिवसांत करोनाचे ९५ रुग्ण; दोघांचा मृत्यू
जानेवारी व फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण, एप्रिलमध्ये चार रुग्ण सापडले होते. मुंबईप्रमाणे मे महिन्यांत राज्यातही करोनाचे रुग्ण सापडले आहेत. …वाचा सविस्तर
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! पतीला विष देवून ठार केले; विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळले
एखाद्या थरारपटास शोभेल अशी घटना यवतमाळात घडली. एका खासगी शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या तरुणीने पती सतत त्रास देतो म्हणून त्याला विष देवून ठार केले. …सविस्तर वाचा
प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ ठप्प
राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. ‘५०२ बॅड गेटवे’ आणि ‘संकेतस्थळाचे काम सुरू आहे’ असे संदेश दिसत असून मदत क्रमांकही निरुपयोगी ठरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
…सविस्तर बातमी
डोंबिवली नांदिवलीतील बेकायदा राधाई इमारत प्रकरणी तीन जणांंवर आरोपपत्र दाखल
मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दत्तात्रय गुंड यांनी याप्रकरणाचा मागील वर्षभरात तपास केला. …अधिक वाचा
दोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सहकारी अधिकाऱ्याला अटक,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी विकास कोरडे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. एका सोसायटीतील बेकायदेशीर कारवाईवर तक्रारदाराच्या अर्जावर कारवाई करण्यासाठी त्यांनी चार लाखांची लाच मागितली होती.
…सविस्तर वाचा
सिडकोच्या सहाय्यक अभियंता पदासाठी ८ जूनला परीक्षा
मागील अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे ही परीक्षा होऊ न शकल्याने परीक्षेकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते. …सविस्तर वाचा
लसूण दरात पुन्हा उसळी…
लसूण ३० ते ४० रुपयांनी महाग झाल्याने गृहिणींच्या चिंतेत भर पडली आहे. …सविस्तर बातमी
खड्ड्यात पडून जखमी होण्याची मालिका सुरूच, उल्हासनगरात व्हीटीसी मैदानाजवळ खड्ड्यात पडून एक जखमी
सध्या या व्यक्तीवर कळव्याच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. …अधिक वाचा
पैनगंगा नदी पोखरली, वाळू तस्कराना आशीर्वाद कोणाचे ?
कोरपना तालुक्यात वाहणाऱ्या पैनगंगा नदीचे पात्र वाळू तस्करांनी पूर्णतः पोखरून ठेवले आहे. …अधिक वाचा
राज्यात २४ तासांत किती पाऊस झाला? सर्वाधिक पावसाची नोंद ‘या’ भागात
राज्यात वळिवाच्या पावसाने जोर धरला असून गेल्या २४ तासांत सिंधुदुर्गमधील सावंतवाडी येथे सर्वाधिक १३० मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस कोकण, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. …अधिक वाचा
सिडको भूखंडाची १७ वर्षांपासून प्रतीक्षा, ५८६ प्रकल्पग्रस्तांना इरादापत्र देऊनही भूखंडाचा ताबा नाही
शेकडो भूखंड धारकांचे विविध कारणाने मंजूर करण्यात आलेले भूखंड रद्द करण्यात आले आहेत. …सविस्तर बातमी
ग्रामीण पनवेलमध्ये बेभरवशाची वीज, १३ वर्षांनंतरही नेरे उपकेंद्र उभारणीचे काम अपूर्ण
या परिसरात दिवसातून दोन ते तीन वेळा विजेचा लपंडाव सुरू असतो. …सविस्तर वाचा
ऑनलाईन जुगार पडला महागात! तब्बल २ कोटी ७४ लाखांची फसवणूक
याबाबत सोमवारी सायबर पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …अधिक वाचा
कल्याणमध्ये श्री सप्तश्रृंगी इमारतीत विनापरवानगी दुरुस्ती केल्याबद्दल सदस्यावर मनुष्य वधाचा गुन्हा
महाराष्ट्र प्रांतिक व नगररचना प्रादेशिक अधिनियम कलम ४४ सह एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीच्या नियम २(२) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …वाचा सविस्तर
पावसात लघुशंकेला गेला आणि काळ आला; विजेच्या झटक्याने १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, अंबरनाथमधील घटना
मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विघ्नेश कचरे हा सोळा वर्षांचा तरुण या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडला आहे. …अधिक वाचा
ठाण्यात पालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फेरबदल
ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पदी नजीब मुल्ला यांची तर, प्रदेश सरचिटणीस पदी आनंद परांजपे यांची नियुक्ती …वाचा सविस्तर
तेलंगना सीमावर्ती गावात दहा नक्षलींचा मुक्काम
महाराष्ट्र व तेलंगना राज्याच्या सीमावर्ती भागात चंद्रपूर जिल्ह्यातील अमृतगुडा या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर तेलंगनातील इटिकलपाडू या गावात जंगलात चार महिला व सहा पुरूष अशा दहा बड्या नक्षल नेत्यांनी मुक्काम केला होता, अशी माहिती समोर आली आहे. …वाचा सविस्तर
पहलगाम हल्ल्यानंतर आता मुंबईतून बेकायदा सीमकार्ड जप्त,७५ बेकायदा सीमकार्डसह २३ वर्षीय तरूणाला अटक
मुंबईतील गोवंडी परिसरात बेकायदा सीमकार्ड विक्री करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली. आरोपीकडून ७५ सीमकार्ड जप्त करण्यात आली असून, पहलगाम हल्ल्यानंतर ही कारवाई केल्याने सुरक्षा यंत्रणांकडून विशेष सतर्कता बाळगली जात आहे. …सविस्तर बातमी
वीज दुरुस्ती कामांमध्ये एमएसईबी आणि ठेकेदारांचे दुर्लक्ष; कामगारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह
केवळ दोरीच्या साहाय्याने विजेच्या खांबावर चढून कामगार जीव धोक्यात घालून काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. …सविस्तर बातमी
नागपूर : सोन्याचे दागिने, रोख रक्कम असलेली पर्स महिला मेट्रोत विसरली, पण…
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो सेवेमध्ये प्रामाणिकतेचा आणखी एक प्रसंग नुकताच घडला. प्रजापती नगर मेट्रो स्टेशनवर आलेल्या एका ट्रेनमध्ये श्रीमती बिना टेंभरे या प्रवासी महिलेची पर्स सापडली. …सविस्तर बातमी