लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: शरद पवारांनी भाकरी फिरवली असेल तर तो राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. दिल्लीत फटाके फुटणे समजू शकतो. मात्र सामनाच्या कार्यालयात पेढे वाटले जात आहेत. संजय राऊत यांना याचा का आनंद होतोय? मी वारंवार सांगत होतो संजय राऊत या शकुनी मामाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भांडणे लावली, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली.

राणे शनिवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, अजित पवार यांच्याबाबत हा शकुनी मामा सातत्याने बोलत असायचा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विषयी त्याने असेच पेढे वाटले होते. आताही सामना कार्यालयातील लोक सांगत आहेत की साहेब आनंदाने नाचत आहेत. पेढे वाटत आहेत. याचे उत्तर भांडूपच्या देवानंदने दिले पाहिजे, असेही राणे म्हणाले.

हेही वाचा… नागपूर: लष्करात जायचंय? मग ही बातमी वाचाच….!

संजय राऊत यांना उद्धव ठाकरे सोबत राहायचे नाही. राष्ट्रवादी प्रवेशाची घाई झाली आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात उद्धव ठाकरे लंडनवरून येण्यापूर्वी राऊत यांचा प्रवेश राष्ट्रवादीत होऊ शकतो. अजित पवार यांची नाराजी असेल तर तो राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. अमरावतीत उद्धव ठाकरेंच्या शिल्लक सेनेचे चार कार्यकर्ते आले होते माझी गाडी अडवायला. मात्र मला पाहताच निघून गेले. तिथे काय झाले मला माहीत नाही. मला आता पार्थ पवार यांची चिंता वाटते. पार्थ माझा चांगला मित्र आहे. तो मोठा नेता झाला पाहिजे. मात्र राष्ट्रवादीतील काही लोक होऊ देणार नाही, असेही राणे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla nitesh rane criticized that sanjay raut has created a fight in the ncp vmb 67 dvr