बुलढाणा : चालू आठवड्यात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड सलग तिसऱ्यांदा चर्चेत आले आहे! प्रारंभी वनविभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ते चर्चेत आले. यानंतर त्यांच्याविरुद्ध महिलेची शेतजमीन जबरीने बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आता शुक्रवारी एका व्हिडिओमुळे ते पुन्हा चर्चेत आले.

हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात आमदार संजय गायकवाड एका युवकाला काठीने बदडत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा…विश्लेषण : खासदार नवनीत राणांच्‍या जात प्रमाणपत्राचे प्रकरण काय?

नेमके झाले काय?

शिवजयंती मिरवणुकीदरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी एका तरुणाला अंगरक्षक पोलिसाच्या लाठीने बेदम मारहाण केल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक माहितीनुसार मिरवणुकीत, आधी काही तरुणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली नंतर पोलिसाने युवकाला काठीने मारहाण केली. मग आमदार संजय गायकवाडदेखील चिडले त्यांनी पोलिसाची काठी घेऊन त्या युवकाला बेदम झोडपले. मारहाण का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून दहा दिवसांनंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.