• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. pm modi in maharashtra narendra modi speech at nanded and parbhani candidates spl

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोफ मराठवाड्यात धडाडली, नांदेड, हिंगोली, परभणीसाठी जोरदार प्रचार

Pm Modi In Maharashtra: नांदेड आणि परभणीमध्ये मराठवाड्यातील लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आले होते.

April 20, 2024 18:16 IST
Follow Us
  • pm modi sabha in marathwada
    1/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी २६ एप्रिल रोजी मतदान होत असलेल्या मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या. (सर्व फोटो साभार- BJP/DevendraFadanvis फेसबुक पेज)

  • 2/12

    मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड लोकसभेच्या प्रचार सभेनंतर त्यांनी परभणीतही प्रचार सभा घेतली. परभणीमध्ये महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत.

  • 3/12

    या दोन्ही सभांमध्ये काय घडलं जाणून घेऊयात.

  • 4/12

    “इंडिया आघाडीचे लोक आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आले आहेत, हे लोकांनाही समजत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच मतदारांनी इंडिया आघाडीला नाकारले. देशातील २५ टक्के जागांवर इंडिया आघाडीचे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. जे लोक स्वतःच्या आघाडीवर विश्वास ठेवत नाहीत, अशा लोकांवर देश विश्वास ठेवू शकतो का? जे लोक स्वतःच्या आघाडीतच एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करतात, अशा लोकांना लोकसभेत स्थान दिले तर तिथेही ते लोक एकमेकांविरोधात संघर्ष करतील. ४ जूननंतर इंडिया आघाडीचे नेते एकमेकांचे कपडे फाडतील”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या प्रचार सभेत केली.

  • 5/12

    नांदेड लोकसभेतील भाजपाचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि हिंगोली लोकसभेतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नांदेड येथे प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे भाषणाची सुरुवात मराठीतून करत “नांदेड आणि हिंगोलीकरांना माझा नमस्कार. २६ एप्रिलची तयार झाली ना?” असा प्रश्न विचारला.

  • 6/12

    कुणालाही मतदान करा, पण करा
    पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, काल देशात पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. मी सर्व मतदार आणि विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. मतदानानंतर अनेकांनी बुथ स्तरापर्यंतचे विश्लेषण केले आहे. ते पाहता पहिल्या टप्प्यात एनडीएच्या पारड्यात एकतर्फी मतदान झाले असल्याचे दिसते. मी देशातील नागरिकांना आवाहन करतो की, एनडीएचा विजय तुम्ही पक्का करत आहातच. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पण जे लोक मतदान करत नाहीत, त्यांनाही सांगू इच्छितो की, तुम्ही कुणालाही मतदान करा. पण मतदान करण्यापासून मागे हटू नका.

  • 7/12

    विरोधकांनाही आज ना उद्या यश मिळेल
    “हे खरं आहे की, प्रचंड उकाडा आहे. लग्नाचा काळ आहे. शेतातील कामे आहेत. पण आपण पाहतो देशाचा सैनिक प्रतिकूल वातावरणातही देशाच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य निभावत असतो. त्याप्रमाणेच मतदारांनीही मतदान हे कर्तव्य समजून मतदान करावे. तसेच मी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की, भलेही तुम्ही निवडणुकीत पराभूत होणार असाल तरीही मतदानासाठी लोकांना जागृत करा. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा तुम्हालाही यश मिळेलच. त्यामुळे पराभूत होणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही मी प्रेरीत करू इच्छितो”, असा उपरोधिक टोलाही पंतप्रधान मोदी यांनी लगावला.

  • 8/12

    राहुल गांधींना अमेठीप्रमाणं वायनाडही सोडावं लागणार
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेस आणि राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “राहुल गांधी हे वायनाड वगळता आणखी इतर ठिकाणी सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत. २६ एप्रिल रोजी वायनाडमध्ये मतदान पार पडल्यानंतर राहुल गांधी दुसरा मतदारसंघ शोधतील. ज्याप्रमाणे त्यांना अमेठी सोडावी लागली. त्याप्रमाणे ते वायनाडही सोडतील. काँग्रेसचे कुटुंबीय या निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणार नाही. कारण ज्याठिकाणी ते राहतात, त्याठिकाणी काँग्रेसचा उमेदवारच नाही. काँग्रेसची अशी अवस्था होईल, असा विचार त्यांनीही केला नसेल. ज्या परिवारावाराच्या भरवशावर काँग्रेस पक्ष चालतो, तो परिवारही स्वतःच्या पक्षाला मतदान करू शकत नाही, अशी अवस्था आहे.”

  • 9/12

    अशोक चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांचे कौतुक केले
    “मी राजकारणात नव्हतो, तेव्हापासून चव्हाण कुटुंबीय राजकारणात आहे. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्याशी चर्चा करण्याचा एकदा योग आला होता. तेव्हा मी राजकारणात नव्हतो. मी सामान्य माणूस असतानाही शंकरराव चव्हाण यांनी माझ्याशी नम्रतापूर्वक संवाद साधला. राज्य आणि केंद्रात इतकी महत्त्वाची पदे भूषविल्यानंतरही त्यांच्यात इतकी नम्रता पाहून मी आजही त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो”, अशी आठवण सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण आपल्याबरोबर आल्यामुळे आपली ताकद वाढली असल्याचे सांगितले.

  • 10/12

    नांदेड लोकसभेच्या प्रचार सभेनंतर त्यांनी परभणी लोकसभेत प्रचार सभा घेतली.
    परभणीमध्ये महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत. “महादेव जानकर हे माझे लहान भाऊ आहेत. त्यांना तुम्ही लोकसभेत पाठविणार की नाही?”, असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना विचारला. तसेच मोदी यांनी आपल्या खिशातून शिटी काढून महादेव जानकर यांच्या हातात दिली. जानकर हे रासपच्या शिटी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मोदींनी ही प्रतिकात्मक भेट त्यांना दिली. यानंतर जानकर यांनी मंचावरच ही शिटी फुंकली.

  • 11/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, आमच्या सरकारच्या धोरणांमुळे परभणीतील १२ लाख लोकांना मोफत रेशन मिळत आहे. या कुटुंबातील कुणालाही उपाशी झोपावं लागत नाही. पुढील पाच वर्षातही असेच मोफत रेशन मिळत राहिल. तसेच परभणीत १७ जनऔषधी केंद्रातून औषधांवर ८० टक्के सूट मिळत आहेत. सव्वा लाखाहून अधिक महिलांना उज्ज्वला गॅस जोडणी देण्यात आली आहे. परभणीत ७५ टक्क्यांहून अधिक घरातून नळाद्वारे पाणी देण्यात येत आहे. परभणीतील नऊ लाखाहून अधिक जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. कोणतेही सरकार हे काम तेव्हाच करू शकते, जेव्हा ते गरीबांप्रती संवेदनशील असते.

  • 12/12

    काँग्रेसने निजामाप्रमाणेच मराठवाड्याचा विकास होऊ दिला नाही
    “काँग्रेस अशी वेल आहे, ज्याचे स्वतःचे मूळ आणि जमीन नाही. या वेलीला जो आधार देतो, त्यालाच ती संपवते. त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाची फाळणी केली, काश्मीरचा प्रश्न पेटवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू होऊ दिले नाही. तिथल्या दलितांना इतके वर्ष अधिकारच मिळू दिले नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार असताना मराठवाड्यातून निजामांचे राज्य केले आहे, याची जाणीवच त्यांनी करू दिली नाही. निजामासारखीच मानसिकता ठेवून त्यांनी मराठवाड्याचा विकास होऊ दिला नाही”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.रझाकारांची मानसिकता असलेल्या लोकांना मराठवड्यात स्थान देऊ नका, असेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra ModiनांदेडNandedपरभणीParbhaniभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtraलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionहिंगोलीHingoli

Web Title: Pm modi in maharashtra narendra modi speech at nanded and parbhani candidates spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.