Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. pm narendra modi meeting in karad campaign for the mahayuti candidate udayanraje bhosle from satara lok sabha constituency spl

Lok Sabha Election 2024 : संविधान, आरक्षण ते कलम ३७० साताराच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ‘या’ मुद्द्यांवर भाष्य

या सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले….

Updated: April 30, 2024 10:30 IST
Follow Us
  • pm modi at satara
    1/13

    सातारा लोकसभा मतदारसंघातील ‘महायुती’चे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराडमध्ये काल २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती.

  • 2/13

    पंतप्रधानपदावरील व्यक्तीची कराडमधील ही पहिलीच सभा गर्दीचे सर्व उच्चांक मोडणारी ठरली आहे. ऐन उन्हात मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादामुळे महायुतीत चैतन्य दिसत होते.

  • 3/13

    छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जयघोष करीत कृष्णाकाठच्या जनतेला माझा नमस्कार असे मराठीतून नरेंद्र मोदी यांनी भाषणास सुरुवात करताच, एकच टाळ्यांचा कडकडाट होताना, मोदी, मोदी असा उपस्थित जनसागराने जोरदार जयजयकार केला.

  • 4/13

    प्रारंभी शिवरायांच्या मूर्तीला नरेंद्र मोदी, रामदास आठवले आणि उदयनराजे हे पुष्पांजली अर्पण करून नतमस्तक झाले.

  • 5/13

    त्यांनतर उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भगवी शाल पांघरत प्रभू श्रीरामांची चांदीची मूर्ती भेट देवून मोदींचे स्वागत केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे, भाजपचे महामंत्री विक्रांत पाटील, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, धैर्यशील कदम, प्रा. मच्छिंद्र सकटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

  • 6/13

    मोदी म्हणाले, भाजपाने मला २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यावर प्रथम मी रायगडावर गेलो. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या समाधीस्थळी त्यांचे स्मरण करण्यासाठी ध्यानस्थ झालो, त्यावर मला जी ऊर्जा अन् प्रेरणा मिळाली, त्या पवित्र मातीने दिलेल्या आशीर्वादावर मी १० वर्षे प्रभावीपणे देशाचे नेतृत्व करू शकलो. आजही महत्वाच्या कामावेळी मला शिवरायांचे स्मरण होते असे मोदी यांनी सांगितले.

  • 7/13

    काँग्रेसवर हल्लाबोल चढवताना ते म्हणाले, देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. पण, काँग्रेसने देशात गुलामगिरीची मानसिकता कायम ठेवली. शिवरायांच्या नौदलावर साऱ्या जगाचा विश्वास असलातरी देशाच्या नौदलाच्या ध्वजावर ब्रिटिशांची मुद्राच होती. आम्ही ती हटवून शिवमुद्रा आणली. ऐतिहासिक लोहगड, सिंधुदुर्ग, जिंजीसारख्या शिवरायांच्या किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नामांकन दिले.

  • 8/13

    जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू नव्हते. भाजपने ३७० कलम हटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लागू करत तेथील जनतेला न्याय हक्क आणि आरक्षणाचा लाभ मिळवून दिला.

  • 9/13

    संविधानाने धर्मावर आरक्षण देता येत नाही. पण काँग्रेसने आरक्षणाच्या नावावर लोकांना झुलवून स्वार्थ साधला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ओबोसींच्या आरक्षणात मुस्लिमांना घुसवून ओबोसींच्या २७ टक्के आरक्षणावर एका रात्रीत दरोडा टाकला. कर्नाटकातील सर्व मुस्लिमांना ओबीसी घोषित करून, आरक्षण दिले. आता संविधान बदलून काँग्रेसला कर्नाटकातील पॅटर्न देशभर लागू करायचा आहे. पण, मोदी जिवंत असेपर्यंत कोणी संविधान बदलू शकत नाही आणि धर्मावर आधारित आरक्षण आणण्याचा प्रयत्न सुध्दा करू शकणार नसल्याचे मोदींनी सांगितले.

  • 10/13

    काँग्रेसचा घराघरातील संपत्ती लुटण्याचा इरादा
    आपल्या सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवल्या. सर्वसामान्य व गरिबांच्या मोफत धान्य, आरोग्य सेवा, शेतकरी, महिला व वंचित सर्वच घटकांना आवश्यक सर्व सुविधा मोफत दिल्या आहेत. पण, दुसरीकडे काँग्रेसचा लोकांच्या जमिनी, पैसे आणि दागिन्यांसह घराघरातील संपत्ती लुटण्याचा इरादा असल्याची टीका मोदी यांनी केली.

  • 11/13

    काँग्रेसने सैनिकांना वंचित ठेवले
    काँग्रेसने सैनिकांच्या कुटुंबियांना वन रँक वन पेन्शनपासून वंचित ठेवले. मात्र, भाजपने वन रँक वन पेन्शन लागू करताना, एक लाख कोटींहून अधिक रक्कम देवूनही टाकली आहे. भारतीय सेनेकडे आज स्वदेशी बनावटीची शस्त्रे असल्याचे ते म्हणाले.

  • 12/13

    मोदी सरकार शिवरायांच्या विचाराचेच
    उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना लोकसहभागाची भूमिका घेतली. यातूनच लोकशाही स्थापन झाली. मोदी सरकार शिवरायांच्या याच विचार आणि संकल्पावर चालले आहे. काँग्रेसकडून शेतकरी, जनतेच्या कल्याणासाठी फक्त घोषणा झाल्या. मात्र, त्या सत्यात उतरवण्याचे काम मोदींनी केले. काँग्रेसला मोठा अहंकार होता. पण, लोककल्याणाचा विचार करून भाजपने करून दाखवले. त्यामुळे जनसामान्यांच्या हितासाठी नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचे काम सर्वांना करायचे असल्याचे आवाहन उदयनराजेंनी केले.

  • 13/13

    (सर्व फोटो साभार- Chhatrapati Udayanraje Bhonsle/Facebook Page)

TOPICS
उदयनराजे भोसलेUdayanraje Bhosaleनरेंद्र मोदीNarendra Modiनिवडणूक २०२४Electionभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionशिवसेनाShiv SenaसाताराSatara

Web Title: Pm narendra modi meeting in karad campaign for the mahayuti candidate udayanraje bhosle from satara lok sabha constituency spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.