• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. amit shah on rahul gandhi latest statement on rahul gandhi and uddhav thackeray spl

“नकली शिवसेना प्रमुख” म्हणत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले तर राहुल गांधींबद्दल म्हणाले…

मोदींची विकासाची तर राहुलजींची चायना गॅरंटी असे म्हणत अमित शहा यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला.

Updated: May 4, 2024 17:03 IST
Follow Us
  • amit shah on rahul gandhi
    1/10

    भाजपाचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ काल विटा येथे भाजपाच्यावतीने महाविजय सभेचे आयोजन करण्यात आले होते.

  • 2/10

     राहुल गांधी यांची चायना गॅरंटी आहे, तर नरेंद्र मोदी यांची विकासाची गॅरंटी आहे. यामुळे विकासाला प्राधान्य देणारे मतदार नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करतील असा विश्‍वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रचार सभेत व्यक्त केला.

  • 3/10

    यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, रामदास आठवले, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, नीता केळकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

  • 4/10

    विरोधकाकडे मात्र एक चेहरा नसून अनेक चेहरे आहेत. यदाकदाचित इंडियाच्या हाती सत्ता गेलीच तर बारी-बारीने पंतप्रधान पद देण्याचे ठरविले जाईल. पंतप्रधान म्हणजे काय दुकान आहे का असा सवाल करत त्यांनी देश सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले.

  • 5/10

    यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री शहा म्हणाले, “मोदींनी देश विकासाची गॅरंटी देत देशाच्या कल्याणासाठी साथ मागितली आहे, विरोधक मात्र, परिवार कल्याण समोर ठेवून सत्तेसाठी एकत्र आले आहेत. एनडीएकडे पंतप्रधान पदासाठी केवळ मोदी यांचा एकमेव चेहरा आहे.”

  • 6/10

    अमित शहा पुढे म्हणाले, नकली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे लक्ष आता नव्या मतपेढीकडे लागले असून त्यांना देशाची अस्मिता, धर्म याबद्दल काहीच वाटत नाही.

  • 7/10

    पाचशे वर्ष रखडलेला राममंदिर जन्मभूमीचा प्रश्‍न निकाली काढत त्या ठिकाणी भव्य मंदिराची उभारणी मोदींच्या काळात झाली. देशाची अस्मिता जोपासण्याबरोबरच देशविकासाचे मोठे काम गेल्या दहा वर्षात केले असून यामध्ये महामार्गाचे जाळे असो व गरीब कल्याण कार्यक्रम असो.

  • 8/10

    येत्या काही दिवसात देशाची अर्थव्यवस्था जगात तिसर्‍या स्थानी पोहोचविण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखाली होणार असून महिलांनाही संसद व विधी मंडळात ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. सुरक्षित व समृद्ध देश घडविण्यासाठी मोदींना पर्याय होऊच शकत नाही. असेही शहा यांनी यावेळी सांगितले.

  • 9/10

    सर्व फोटो अमित शाह या फेसबुक पेजवरून साभार.

  • 10/10

    हेही पहा- “गुजरातचे दोन व्यापारी..” उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर खोचक टीका

TOPICS
अमित शाहAmit Shahउद्धव ठाकरेUddhav Thackerayभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsराहुल गांधीRahul Gandhiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionशिवसेनाShiv Sena

Web Title: Amit shah on rahul gandhi latest statement on rahul gandhi and uddhav thackeray spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.