• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. pm narendra modi on congress and india allience latest statement in ahmednagar maharashtra spl

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल; म्हणाले, “काँग्रेस सत्तेवर आल्यावर…”

महायुतीचे नगरमधील उमेदवार डॉ. सुजय विखे व शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये मंगळवारी पंतप्रधानांची प्रचारसभा झाली.

May 8, 2024 13:33 IST
Follow Us
  • new news of modi
    1/9

    “मुस्लीम समाजाच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेस रोज खालच्या पातळीवर जात आहे. आता काँग्रेसची पाकिस्तानातील ‘बी टीम’ही कार्यान्वित झाली आहे. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील अतिरेक्यांना काँग्रेसने ‘क्लीन चिट’ देऊन निर्दोषत्वाचे प्रमाणपत्रही जारी केले आहे.”

  • 2/9

    “काँग्रेस नेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत केलेले वक्तव्य धक्कादायक असून शहिदांचा अपमान करणारे आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ४ जूनला ‘इंडिया आघाडी’ विसर्जित होईल,” असा दावाही त्यांनी केला.

  • 3/9

    महायुतीचे नगरमधील उमेदवार डॉ. सुजय विखे व शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये मंगळवारी पंतप्रधानांची प्रचारसभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भागवत कराड, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित होते.

  • 4/9

    “चारा घोटाळ्यातील बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यांचे नाव प्रेक्षकांच्या तोंडून वदवून घेत मोदी म्हणाले, की काँग्रेस सत्तेवर आल्यावर मुस्लिमांना पूर्ण आरक्षण दिले जाईल, असे ते सांगत आहेत.”

  • 5/9

    सध्या देशात केवळ एससी, एसटी, ओबीसी व गरिबांना पूर्ण आरक्षण आहे. काँग्रेस ते हिसकावून त्यांची ‘व्होट बँक’ असलेल्या मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार मोदी यांनी केला.

  • 6/9

    “ही लढाई भाजप आघाडीने गरिबांचे केलेले संतुष्टीकरण विरुद्ध काँग्रेस आघाडी मुस्लिमांचे करत असलेले तुष्टीकरण यांच्यामध्ये आहे”, असे ते म्हणाले.

  • 7/9

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या अलिकडील विधानाचा संदर्भ घेऊन पंतप्रधान म्हणाले, की “२६/११च्या हल्ल्यातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली असून पाकिस्ताननेही ते मान्य केले आहे. असे असताना कसाबला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्या काँग्रेसला जनता मतदानातून धडा शिकवेल.”

  • 8/9

    (सर्व फोटो देवेंद्र फडणवीस या फेसबुक पेजवरुन साभार.)

  • 9/9

    हेही पहाः शरद पवारांबद्दल ‘ते’ गूढ कायम; प्रफुल्ल पटेलांचे टीकास्र! म्हणाले, “…त्यांनी उत्तर दे… 

TOPICS
अहमदनगरAhmednagarनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtraराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Pm narendra modi on congress and india allience latest statement in ahmednagar maharashtra spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.