-
२०२४ हे वर्ष भारतीय मनोरंजन उद्योगासाठी खूप चांगले होते. वर्षाच्या अखेरीस, डिसेंबरमध्ये पुष्पा २ ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अल्लू अर्जुन प्रथम स्थानी आहे. टॉप १० च्या यादीमध्ये ६ नावं दाक्षिणात्य कलाकारांची आहेत आणि उर्वरित ४ बॉलिवूड कलाकारांची आहेत. पाहुयात संपूर्ण यादी…
-
२०२४ वर्षाच्या शेवटी अल्लू अर्जुनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याचा पुष्पा २ हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या ८ दिवसांच्या सुरुवातीच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, निर्मात्यांच्या अंदाजानुसर पुष्पा २ ने जगभरात १,०६७ कोटी रुपये कमावले आहेत, जी या वर्षातील सर्वाधिक कमाई आहे. या अर्थाने, अल्लू अर्जुन २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा स्टार बनला आहे.
-
साऊथचा आणखी एक सुपरस्टार प्रभास दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या कल्की २८९८ एडी या चित्रपटाने जगभरात १,०६०.४ कोटींची कमाई केली आहे.
-
बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावसाठीही हे वर्ष खूप चांगले ठरले. त्याच्या श्रीकांतने ६०.६० कोटी रुपये, मिस्टर अँड मिसेस माहीने ५१.८ कोटी रुपये, स्त्री २ ने ८५२.४ कोटी रुपये आणि विकी विद्या का वो वाला व्हिडिओने ५६.६ कोटी रुपयांची कमाई केली. राजकुमार रावच्या चित्रपटांनी जगभरात एकूण १,०२१.६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
या यादीत चौथे नाव अजय देवगणचे आहे. त्याच्या शैतान या चित्रपटाने २१३.८ कोटी, मैदानने ६८.६ कोटी, औरों मैं कहाँ दम थाने १५.४ कोटी आणि सिंघम अगेनने ३५८.८ कोटींची कमाई केली. अजय देवगणच्या चित्रपटांनी जगभरात ६५६.६ कोटींची कमाई केली.
-
या यादीत कार्तिक आर्यन पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या चंदू चॅम्पियनने ८९.२ कोटी, भूल भुलैया ३ ने ३६६.४ कोटींची कमाई केली. त्याच्या चित्रपटांची जगभरातील एकूण कमाई ४५५.६ कोटी रुपये होती.
-
तामिळ सिनेमाचा ‘थलपती’ जोसेफ विजय या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. त्याच्या ‘द ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाईम’ या चित्रपटाने जगभरात ४२५.८ कोटींची कमाई केली.
-
यावर्षी ज्युनियर एनटीआरचा ‘देवरा पार्ट १’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात ४२६.८ कोटी रुपये कमावले.
-
दाक्षिणात्य अभिनेता शिवकार्तिकेयनचे या वर्षी 2 चित्रपट प्रदर्शित झाले होते. आयलन आणि अमरन. या दोघांनी एकूण ४०५.८ कोटी रुपयांची कमाई केली.
-
पृथ्वीराज सुकुमारन याच्या ‘द गोट ऑफ लाइफ’ या चित्रपटाने १५८.२ कोटी, बडे मियाँ छोटे मियाँने १०२.४ कोटी, गुरुवायूर अंबालनदयीलने ९०.२ कोटींची कमाई केली. त्याची एकूण कमाई ३५०.८ कोटी रुपये होती.
-
टॉप १९ च्या यादीत हृतिक रोशनचे नाव सर्वात शेवटी आहे. त्याचा फायटर हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात ३३८.४ कोटी रुपये कमावले.
२०२४ मध्ये बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा दाक्षिणात्य अभिनेत्यांची चालती! चित्रपटांनी केली सर्वाधिक कमाई; टॉप १० मध्ये कोणत्या नावांचा समावेश?
highest earning indian actors 2024 : या वर्षीही दाक्षिणात्य कलाकारांनी कमाईच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारांना मागे टाकले. २०२४ या वर्षच्या यादीत अल्लू अर्जुन टॉप १० अभिनेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर एका बॉलिवूड अभिनेत्याचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Web Title: Highest earning indian actors 2024 box office collection and hit movies list allu arjun prabhas rajkummar rao spl