-
सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.
-
सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीलाही लागले आहेत.
-
विविध मेळावे, कार्यकर्त्यांच्या भेटी ते योग्य उमेदवारांची निवड करण्याचे मोठे आव्हान सर्व पक्षांपुढे आहे. (Photo: @ShivsenaFB)
-
महायुती असेल किंवा महविकास आघाडी योग्य जागावाटप हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महत्वाचे ठरणार आहे. (Photo: @ShivsenaFB)
-
त्यामुळे सर्वच राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते यांच्या हालचालींना वेग आला आहे. (Photo: @ShivsenaFB)
-
याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील नेते दिल्लीवारी करतानाही दिसत आहेत. (Photo: @ShivsenaFB)
-
महविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. (Photo: @ShivsenaFB)
-
या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पक्षाचे खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. (Photo: @ShivsenaFB)
-
दरम्यान मागील आठवड्यात राज्याचे उपमख्यमंत्री आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही दिल्लीमध्ये दाखल झाले होते. महायुतीमध्ये आणि महविकास आघाडीमध्येही जागावाटप कसे होणार हा प्रश्नच आहे. त्याचे उत्तर आपल्याला पुढील काळात मिळणार आहे.
शिवसेना उबाठाची दिल्लीवारी; उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे.
Web Title: Uddav thackeray sanjay raut meeting with rahul gandhi mallikarjun kharge at delhi spl