-
अजित वाडेकर
इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामना जिंकण्याचा मान माजी भारतीय कर्णधार अजित वाडेकर यांना मिळाला आहे. वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९७१ मध्ये इंग्लंडला चार विकेट्सने हरवले. त्यानंतर भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला गेला, ज्यातील दोन सामने अनिर्णित राहिले. (Photo: Social Media) -
कपिल देव
विश्वचषक विजेत्या कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८६ मध्ये इंग्लंडमध्ये दोनदा विजेतेपद जिंकले होते. भारताने पहिला सामना पाच विकेट्सने आणि दुसरा सामना २७९ धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. (Photo: Social Media) -
सौरव गांगुली
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने २००२ मध्ये इंग्लंडचा एक डाव आणि ४६ धावांनी पराभव केला. ही चार सामन्यांची कसोटी मालिका अनिर्णित राहिली होती. (Photo: Social Media) -
राहुल द्रविड
२००७ मध्ये, राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये विजयाची चव चाखली. नॉटिंगहॅममध्ये भारताने यजमान संघाचा ७ गडी राखून पराभव केला होता. भारताने ही तीन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली होती. (Photo: Social Media) -
एमएस धोनी
२०१४ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडचा ९५ धावांनी पराभव केला. तथापि, पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत धोनी ब्रिगेडला १-३ असा दारुण पराभव पत्करावा लागला होता. (Photo: Social Media) -
विराट कोहली
इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये तीन कसोटी सामने जिंकले आहेत. (Photo: Social Media) -
भारताने २०१८ मध्ये येथे २०३ धावांनी, तर २०२१ मध्ये १५१ आणि १५७ धावांनी विजय मिळवला आहे. (Photo: Social Media)
-
भारताला आता शुक्रवारपासून (२० जून) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा सामना करायचा आहे. (Photo: Social Media)
-
भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिल या आगामी मालिकेत विराट कोहलीचा विक्रम मोडू शकेल का? याकडे सर्वांचं लक्ष असेल. (Photo: Social Media) हेही पाहा- Fathers Day 2025: “जगातली सर्वात भाग्यवान मुलं”; असं म्हणत सारा तेंडुलकरने शेअर केले सचिनबरोबरचे जुने अल्बम फोटो…
इंग्लंडमध्ये भारताने जिंकले आहेत फक्त ९ कसोटी सामने; कर्णधार शुबमन गिल कोहलीचा विक्रम मोडू शकेल का?
India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यामध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. इंग्लंडमध्ये भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. भारताने इंग्लंडमध्ये फक्त ९ कसोटी सामने जिंकले आहेत. ‘या’ ६ भारतीय कर्णधारांनी इंग्लंडमध्ये कसोटी सामने जिंकले आहेत.
Web Title: 6 indian captains with test wins in england can shubman gill break virat kohli record on 2025 tour spl