राज्यात सध्या विविध मुद्य्यांवरून राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून तसेच देशभरात पीएफआय वर एनआयए, ईडी आणि सीबीआय कडून सुरू असलेली छापेमारी आणि काल पुण्यात पीएफआयच्या निदर्शनांदरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या देण्यात आलेल्या घोषणा आदींसह अन्य मुद्य्यांवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपावर टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालकमंत्रीपदावरून अजित पवारांनी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नाना पटोले हे दिवसभरात अनेक विनोद करत असतात, ते तुम्ही ऐकायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा. त्यांच्या विनोदावर आम्हाला प्रतिक्रिया का विचारता? कारण ते बेताल बोलतात. त्यामुळे अशा बेताल बोलणाऱ्या व्यक्तीला उत्तर देण्याइतका माझ्याकडे वेळ नाही. माझ्याकडे खूप कामं आहेत.”

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे आणि दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – नाना पटोले

“ UAPA कायद्यानुसार PFI सारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. PFI वर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस पक्षाने याआधीही केली होती. पण केंद्रातील भाजपा सरकार त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या संघटेवर बंदी घालत नाही का? केंद्रात आठ वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे, या सरकारला पीएफआयच्या कारवायांची माहिती नव्हती का? केंद्र सरकार आजपर्यंत डोळे झाकून बसले होते का?” असे प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केले आहेत. तर, “कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते पण ईडी सरकारच्या काळात राज्यात पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदारच गोळीबार करतो, त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत काय?” असंही पटोलेंनी म्हटलं आहे.

“सध्याचे नवे हिंदूहृदयसम्राट…”, दसरा मेळाव्याबाबत उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पटोलेंचा शिंदे गटाला टोला!

“काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रा सुरु झाल्यापासून देशातले वातावरण बदलले आहे. राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेची भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही दखल घ्यावी लागली, म्हणून तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिदीत जाऊन इमाम इलिसायी यांची भेट घेतली, त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागतच करतो. कालपर्यंत राहुल गांधी यांच्यावर टीका करणारे बाबा रामदेव यांनीही भारत जोडो यात्रेची दखल घेत, राहुल गांधी यांच्या भूमिकेचे स्वागत केले. हा बदल भारत जोडो पदयात्रेमुळे होत आहे. राहुल गांधी हाती तिरंगा घेऊन देश जोडायचे काम करत आहेत, सर्व धर्माला एकत्र घेऊनच देश जोडला जाऊ शकतो. ही राहुल गांधी यांची भूमिका जर कोणाला पटत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. राहुल गांधी यांची भूमिका देशहिताची आहे आणि देशापेक्षा कोणी मोठा नाही.” असंही नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

मॉलमध्ये मंजूरी मिळू नये म्हणून गावबोभाटा करणारी भाजपा आता वाईनला उराशी कवटाळत आहे – नाना पटोले

याशिवाय “भाजपा सत्तेत आल्यानंतर वाईन बाबतीत ‘एकदम ओके’ झाली आहे..! विरोधात असताना वाईन विक्रीला मॉलमध्ये मंजूरी मिळू नये म्हणून यांनी गावबोभाटा केला आणि आता त्याच वाईनला हे उराशी कवटाळत आहेत.” असंही नाना पटोले यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fadnavis response to congress state president nana patole criticism msr
First published on: 25-09-2022 at 19:36 IST