Mumbai Live News Updates, 28 July 2025 : पुण्यातील खराडी येथील एका हॉटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा घालून केलेल्या कारवाईत अमली पदार्थ, दारू, हुक्का याचे सेवन केले जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणींसह सात जणांना अटक केली. त्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचाही समावेश आहे. दरम्यान, आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता नाही, असे हवामान विभागाने सांगितले आहे. तर नागपूरच्या वाढत्या विस्तारात सार्वजनिक वाहतूकीच्या सुलभ वाहतूक व्यवस्थेसह सर्व भागांना जोडणाऱ्या उत्तम वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वसमावेशक गतीशीलता आराखडा तयार करण्यात आला आहे. 

तेव्हा अशा घडामोडींसह मुंबई शहर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर परिसरातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.

Live Updates

Pune Nagpur Mumbai Breaking News Live Updates in Marathi

11:33 (IST) 28 Jul 2025

ऐतिहासिक धोबीघाट पुनर्विकासाचा वाद ; कपडे वाळवण्याच्या जागेची तपासणी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई : ऐतिहासिक धोबीघाट आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली असून न्यायालयानेही त्याची दखल घेतली आहे. तसेच, संबंधित वादाप्रकरणी धोबीघाट येथील कपडे वाळवण्याच्या जागेची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 28 Jul 2025

एकनाथ खडसे यांच्या जावयासह सात जण अटकेत, पुण्यात पार्टीवर छापा; अमली पदार्थ जप्त

पुणे : खराडी येथील एका हॉटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा घालून केलेल्या कारवाईत अमली पदार्थ, दारू, हुक्का याचे सेवन केले जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणींसह सात जणांना अटक केली. त्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचाही समावेश आहे. अटक आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. .

अधिक वाचा…

11:30 (IST) 28 Jul 2025

बस, मेट्रो, रस्ते सर्व काही जोडणार! भविष्यातील नागपूरसाठी २५,५८७ कोटींचा वाहतूक ‘मास्टर प्लॅन’

नागपूरच्या वाढत्या विस्तारात सार्वजनिक वाहतूकीच्या सुलभ वाहतूक व्यवस्थेसह सर्व भागांना जोडणाऱ्या उत्तम वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वसमावेशक गतीशीलता आराखडा तयार करण्यात आला आहे. 

सविस्तर बातमी…

11:28 (IST) 28 Jul 2025

राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार; ‘या’ भागात पावसाची शक्यता

राज्यात रविवारपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस पडला. कोकणासह विदर्भात सर्वाधिक पाऊस झाला. मुंबईतही बऱ्यापैकी पाऊस पडला. मात्र, आजपासून पावसाचा जोर ओसराणार आहे. मुसळधार नाही पण अधूनमधून हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

वाचा सविस्तर…

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २८ जुलै २०२५