Mumbai Breaking News Today 07 May 2025 : माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या २ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानासमोर आंदोलन केले जाणार आहे.  तसेच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सकाळपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.  तसेच बुधवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने भारतीय सशस्त्र दलांनी पीओके आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले. भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात भूमिका बजावणाऱ्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबा नेतृत्व संपवण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने हल्ल्यांसाठी ही ठिकाणे निवडली. मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 26 April 2025

11:12 (IST) 7 May 2025

“लाडक्या बहिणींचे कुंकु पुसण्याचे काम करणाऱ्यांना धडा शिकवला”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

ज्यांनी आमच्या लाडक्या बहिणींचे कुंकु पुसण्याचे काम केले. त्यांना धडा शिकविल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. …सविस्तर बातमी
11:01 (IST) 7 May 2025

वीज देयकात स्मार्ट घोटाळा? देखावा स्मार्ट मीटरचा, प्रत्यक्षात जुनेच मीटर…

देयकात स्मार्ट मीटर क्रमांकही दर्शवला जात आहे. परंतु, प्रत्यक्षात मीटर जुनेच आहे. या ग्राहकांना सरासरी देयक जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या. …वाचा सविस्तर
10:44 (IST) 7 May 2025

‘श्याम’ पोरका झाला, ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन

गोवा येथील कला अकादमीच्या नाट्य विभागामध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केलेले वझे आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघाचे सभासद होते. नाट्य संघाच्या देश-परदेशातील अधिवेशनामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले होते. …सविस्तर वाचा
10:37 (IST) 7 May 2025

मुंबई : विमानात बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क

मुंबई विमानतळावर विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. …सविस्तर बातमी
10:31 (IST) 7 May 2025

“भारताने दहशतवाद्यांवरील हल्ले सुरुच ठेवलेच पाहिजेत”, डोंबिवलीतील पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटक कुटुंबीयांची प्रतिक्रिया

दहशतवादाचा नायनाट होईपर्यंत असे हल्ले भारताने सुरूच ठेवले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटक कुटुंंबातील हर्षद संजय लेले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. …सविस्तर बातमी
10:29 (IST) 7 May 2025

सोन्याचे बिस्किट चोरणाऱ्या टोळीचा छडा

दोन आरोपींना अटक करून त्याच्याकडून ५५ ग्रॅम सोन्याचे बिस्किट जप्त करण्यात आले आहेत. वैभव मालगावे (रा. ईचलकरंजी) आणि जगन्नाथ जावीर (रा. खंबाळे, सांगली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. …अधिक वाचा
10:22 (IST) 7 May 2025

बावनकुळेंच्या सल्ल्यावर नागपुरात शिंदे गटाचा अमल

भाजपचा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाने मात्र, बावनकुळेंचा सल्ला लगेच मनावर घेतला आणि त्यावर त्यांच्याच जिल्ह्यात त्याच दिवशी अमलही केला.

सविस्तर वाचा…

09:41 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: “ऑपरेशन सिंदूर ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले”, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या संतोष जगदाळे यांच्या पत्नीची प्रतिक्रिया

India Airstrike Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने केलेल्या या हवाई हल्ल्यानंतर, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या संतोष जगदाळे यांच्या पत्नीने समाधान व्यक्त केले आहे.

सविस्तर वाचा…

09:41 (IST) 7 May 2025

“Operation Sindoor हा माझ्या आईसारख्या पीडित महिलांचा सन्मान”, पुण्याच्या कौस्तुभ गणबोटे यांच्या मुलाकडून पंतप्रधानांचे आभार

Operation Sindoor Reactions: भारताच्या या लष्करी कारवाईनंतर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या कौस्तुभ गणबोटे यांच्या मुलाने प्रतिक्रिया देत, या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे.

सविस्तर वाचा…

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे