Pune Palkhi 2025 : जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज (शुक्रवारी) पुणे शहरात दाखल होत आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागताची तयारी महापालिका प्रशासनाची पूर्ण झाली आहे.

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था महापालिकेने केली असून, यासाठी पालखी मार्गावर आरोग्य कक्ष, फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेसह विविध सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांच्या मंडळींनीदेखील पालखीच्या स्वागताची तयारी केली आहे. या संबंधित बातम्यांसह मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 20 June 2025

11:15 (IST) 21 Jun 2025

वकिलांना समन्स बजावण्यापूर्वी ईडी संचालकांची मंजुरी आवश्यक

सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) वरिष्ठ वकील प्रताप वेणूगोपाल यांना पाठवलेले समन्स मागे घेतले असून ईडीकडून याबाबत शुक्रवारी माहिती देण्यात आली. …अधिक वाचा
11:01 (IST) 21 Jun 2025

बनावट नोट प्रकरणातील फरार आरोपीला दुबईहून भारतात आणले, १२ वर्षांहून अधिक काळ होता फरार

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) २०१३ मधील बनावट नोटांच्या चार गुन्ह्यांत फरार असलेला प्रमुख आरोपी मोईदीनअबा उमर बेरी उर्फ मोईदीनला तब्बल १२ वर्षांनंतर अटक केली. …सविस्तर बातमी
10:49 (IST) 21 Jun 2025

कर्जवसुलीसाठी दलालांचा तगादा; तीन चित्रफित तयार करून तरुणाची आत्महत्या

टिळकनगर आणि चेंबूर स्थानकांदरम्यान गुरूवारी दुपारी एका तरुणाने धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली होती. त्याच्या खिशात सापडलेल्या एटीएम कार्डावरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली. …वाचा सविस्तर
10:19 (IST) 21 Jun 2025

लीलावती ट्रस्टबाबत आक्षेपार्ह विधान; एचडीएफसीच्या व्यवस्थापकीय संचालकांविरोधात एक हजार कोटींचा मानहानीचा दावा

लीलावती ट्रस्टचे कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत मेहता यांच्याबाबत जगदीशन यांनी आक्षेपार्ह खोटे आणि बदनामीकारक विधाने केल्याचा दावा करून ट्रस्टने हा दिवाणी दावा दाखल केला आहे. …सविस्तर वाचा
09:59 (IST) 21 Jun 2025

चौथ्या मुंबईसाठी ९६ गावे, वाढवण विकास केंद्राच्या क्षेत्रात वाढ

देशातील सर्वात मोठ्या प्रस्तावित वाढवण बंदरालगत विकासाच्या संधी लक्षात घेऊन वाढवण बंदरालगत वाढवण विकास केंद्राअंतर्गत चौथी मुंबई वसवण्यात येणार आहे. …वाचा सविस्तर
09:16 (IST) 21 Jun 2025

शेवा कोळीवाड्यातील जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांची उच्च न्यायालयात धाव

खोट्या आश्वासनांवर विसंबून राहिल्यानंतर, कायमस्वरूपी पुनर्वसन, भरपाई आणि संक्रमण शिबिरातील सुधारणा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
22:06 (IST) 20 Jun 2025

बुलेट ट्रेन प्रकल्प… महाराष्ट्रात पहिला पूर्ण लांबीचा बॉक्स गर्डर यशस्वीरित्या उभारला

एनएचएसआरसीएलने मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील महाराष्ट्रामधील डहाणू येथील साखरे गावात ४० मीटर लांबीचा पहिला पूर्ण लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) बॉक्स गर्डर यशस्वीरित्या उभारला. …अधिक वाचा
21:26 (IST) 20 Jun 2025

कोकणात, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोकणात १ ते २० जून या कालावधीत सरासरीच्या ३७ टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ३८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. …अधिक वाचा
20:59 (IST) 20 Jun 2025

अजूनही तीन हजार संक्रमण शिबिरार्थींचे बायोमेट्रीक सर्वेक्षण शिल्लक, म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडून सर्वेक्षणासाठी अखेरची संधी

अनेकदा संक्रमण शिबिरार्थी घरी नसल्याने, कागदपत्रे अपुरी असल्याने वा इतर कारणांमुळे सर्वेक्षण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता अशा संक्रमण शिबिरार्थींना शेवटची संधी देण्यात येणार आहे. …सविस्तर वाचा
20:20 (IST) 20 Jun 2025

ठाण्यात ३३ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई; सीआरझेड क्षेत्रातील बांधकामांनाही उद्ध्वस्त

या कारवाईत तळ अधिक चार मजले, सीआरझेड क्षेत्रात उभारलेले भंगाराचे गोदाम, व्याप्त अनधिकृत इमारतीवरील वाढीव बांधकाम, प्लिंथ, दुकानातील वाढीव बांधकाम आदी वेगवेगळ्या तक्रारींनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. …सविस्तर बातमी
20:09 (IST) 20 Jun 2025

रविवारी लोकलने प्रवास करणार आहांत? त्याआधी मेगा ब्लॉकची ही बातमी वाचूनच प्रवासाला सुरुवात करा…

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक असेल. …वाचा सविस्तर
19:41 (IST) 20 Jun 2025

Video : चर्चगेट विरार लोकल मध्ये महिला प्रवाशांची तुंबळ हाणामारी, घटनेची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित

यात एक महिला गंभीर जखमी झाली. मात्र कुणीही तक्रार न दिल्याने वसई रेल्वे पोलिसांनी केवळ स्टेशन डायरीत या घटनेची नोंद केली आहे. …सविस्तर बातमी
18:26 (IST) 20 Jun 2025

पालखी आगमनापूर्वी रस्ते बंद; वाहनचालकांना वळसा; गल्ली बोळात कोंडी

पालखी सोहळा पाहण्यासाठी शहर आणि उपनगरातील भाविकांची गर्दी होती. पालखी मार्गावरील वाहतूक नियोजनासाठी यंदा पोलिसांनी टप्याटप्याने रस्ते बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. …वाचा सविस्तर
18:20 (IST) 20 Jun 2025

गणेशोत्सवासाठी ठाणे स्थानकात दोन अतिरिक्त खिडक्या सुरु

२० जून ते ५ जुलै २०२५ या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानका जवळील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या इमारती समोरील मुख्य आरक्षण केंद्र येथे या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या (खिडकी क्रमांक ७ आणि ८) सुरु राहणार आहेत. …अधिक वाचा
17:53 (IST) 20 Jun 2025

सोमनाथ येथील शिवलिंग बुधवारी दर्शनासाठी ठाण्यात

२५ जून रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता आर माॅलमधील इलिफ रिटझ बॅन्क्वेट सभागृह, तिसरा माळा, घोडबंदर रस्ता, ठाणे पश्चिम येथे सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन आणि रुद्र पुजा आणि सत्संग पार पडणार आहे. …सविस्तर बातमी
17:46 (IST) 20 Jun 2025

गडचिरोलीतील खाण विस्ताराचा मार्ग उच्च न्यायालयाकडून मोकळा…

गडचिरोलीमधील सुरजागड येथे आवश्यक पर्यावरण मंजुरी न घेताच संबंधित कंपनीने खाणीचे विस्तारीकरण केले असल्याचा आरोप याचिकाकर्त्यानी केला होता. …अधिक वाचा
17:39 (IST) 20 Jun 2025

सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला ठणकावले, म्हणाले ‘सिलेक्टिव्ह’ निर्णय चालणार नाही….

न्यायमूर्ती गवईंनी असा इशारा दिला आहे की, कॉलेजियमने एकत्रितपणे केलेल्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या व बदलींच्या शिफारसी विभागून मंजूर केल्यास त्याचा न्यायालयीन स्वायत्ततेवर प्रतिकूल परिणाम होतो. …सविस्तर वाचा
17:24 (IST) 20 Jun 2025

वारसा वृक्ष वाचविण्‍यासाठी नागरिकांचा लढा; अखेर सर्वोच्‍च न्‍यायालयाने…

पुरातन उर्वरित झाडे वाचवण्यासाठी जलवृक्ष चळवळीने उभा केलेला न्यायालयीन लढा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एकही झाड तोडू नका, असे आदेश दिले. …सविस्तर बातमी
17:21 (IST) 20 Jun 2025

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणातील आरोपी रवी वर्माचा जामिनासाठी अर्ज

कळवा भागात राहणारा रवी वर्मा हा एका कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता. त्याच्याकडे गोदीचे नकाशे आणि छायाचित्र होती. हे छायाचित्र आणि नकाशे त्याने एका तरुणीला पुरवल्याचा आरोप आहे. …सविस्तर वाचा
17:13 (IST) 20 Jun 2025

राज्य सरकारचा निषेध म्हणून सात हजारांवर शाळांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; २३ जूनपासून शाळा….

नवीन शैक्षणिक सत्रात राज्यातील शाळा १६ जून पासून सुरू झाल्या असून विदर्भातील शाळा सोमवार २३ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. …सविस्तर वाचा
17:05 (IST) 20 Jun 2025

ठाणे महापालिका साहाय्यक आयुक्तांवरील जीवघेणा हल्ला प्रकरणात फेरीवाल्याला सक्तमजुरीची शिक्षा

भाजीविक्रेता फेरीवाला अमरजितसिंह यादव याने कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला इतका गंभीर होता की, पिंपळे यांची बोटे तुटून खाली पडली होती. …वाचा सविस्तर
16:17 (IST) 20 Jun 2025

पालघर : सातिवली उड्डाणपुलावरून हलक्या वाहनांची हंगामी पद्धतीने वाहतूक सुरू

सातिवली येथील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण राहिल्याने पावसाळ्याच्या आरंभी सेवा रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडले होते. …अधिक वाचा
14:48 (IST) 20 Jun 2025

कल्याण पूर्व-उल्हासनगर जोडणारा उड्डाण पूल खचल्याने वाहतुकीसाठी बंद

ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी सांगितले, पुलाच्या खचलेल्या भागाखालून बाजुला असलेल्या एका गॅस कंपनीची वाहिनी गेली आहे. …अधिक वाचा
14:22 (IST) 20 Jun 2025

‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’ : दैनंदिन प्रवासी संख्येचा बुधवारी विक्रम; तब्बल २ लाख ९३ हजार ६९१ प्रवाशांनी केला प्रवास

सुरुवातीला असलेली प्रतिदिन ३० हजार प्रवासी संख्या आता थेट २ लाख ६० हजारांवर पोहोचली आहे. …वाचा सविस्तर
14:19 (IST) 20 Jun 2025

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रुग्णालयात दाखल

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बाबत अस्वस्थता वाटत होती. …सविस्तर वाचा
14:18 (IST) 20 Jun 2025

५० हून अधिक घरफोड्या करणारा चोरटा गजाआड, ग्रामीण पोलिसांची कामगिरी; ३० लाखांचे सोन्याचांदीचे दागिने जप्त

पुणे स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा पोलीस स्थानकाच्या पथकांनी ही कामगिरी केली. चोरटा नुकताच चेन्नई येथील घरफोडीच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता. …सविस्तर बातमी
14:06 (IST) 20 Jun 2025

जळगाव : चोपडा तालुक्यात अवैध कृषी सेवा केंद्रावर छापा… सव्वासात लाखांचे खत, बियाणे जप्त

वैजापूर येथे न्यू लक्ष्मी कृषी केंद्र नावाने योगीराज पाटील (३०, रा. नागलवाडी) हा तरूण २५ मेपासून विना परवाना बियाणे आणि रासायनिक खते विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. …वाचा सविस्तर
13:32 (IST) 20 Jun 2025

महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना मिळणार गुगलचे बळ

महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा प्रयत्नशील आहेत. …वाचा सविस्तर
13:26 (IST) 20 Jun 2025

पावसामुळे तुर्भे रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात तुंबले पाणी; प्रवाशांचे हाल, प्रशासनाकडून तात्पुरत्या उपाययोजना

या भुयारी मार्गाशेजारीच ड्रेनेज लाईन असल्याने गटारे तुंबली की साचलेले सांडपाणी रस्त्यावर पसरते. त्यामुळे दुर्गंधी व घाण पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. …सविस्तर बातमी
13:25 (IST) 20 Jun 2025

मुंबई : घाटकोपरमध्ये आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास एक इसम गंभीर अवस्थेत  रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर असल्याची माहिती पंतनगर पोलिसांना मिळाली. …अधिक वाचा

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे