Thane illegal construction, mns : ठाणे : ठाणेकरांना भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी, भ्रष्टाचार, पाणी समस्या यांसह विविध समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेना (उबाठा) आणि मनसेने सोमवारी पालिका मुख्यालयावर काढलेल्या मोर्च्यात शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षही सहभागी झाला होता.

या सर्व पक्षाच्या नेत्यांनी शहरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणावरूनही टीकेची झोड उठवत आयुक्त सौरभ राव यांना धारेवर धरले होते. त्यावेळी, ठाण्यात कोणतेही अनधिकृत बांधकाम होणार नाही असे आश्वासन आयुक्त राव यांनी दिले होते. मात्र, त्याला एक दिवस उलट नाही तोच मानपाडा येथे रस्त्यांच्या बाजूला जवळपास आठ शेड चे काम सुरु झाले असून याठिकाणी मनसेच्या नेत्यांनी धडक देऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन कारवाईस भाग पाडले.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत. या इमारतींना वीज आणि पाणी पुरवठा होत असल्याने येथे रहिवाशी वास्तव्यास येतात. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने अशी बांधकामे उभी राहू नयेत यासाठी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज आणि पुरवठा करण्यात येऊ नये, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. या आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करण्यात येत आहे. तसेच ही बांधकामे तोडण्यात येत आहेत. सण उत्सवामुळे ही कारवाई काहीशी थांबली आहे. त्यातच ठाणे महापालिकेच्या अतिक्रम विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणात अटक झाल्याने प्रशासनावर टीका होत आहे. असे असतानाच दुसरीकडे शहरात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे बाब आता समोर आली आहे.

ठाणेकरांना भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी, भ्रष्टाचार, पाणी समस्या यांसह विविध समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेना (उबाठा) आणि मनसेने सोमवारी पालिका मुख्यालयावर काढलेल्या मोर्च्यात शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षही सहभागी झाला होता. या सर्व पक्षाच्या नेत्यांनी शहरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणावरूनही टीकेची झोड उठवत आयुक्त सौरभ राव यांना धारेवर धरले होते. त्यावेळी, ठाण्यात कोणतेही अनधिकृत बांधकाम होणार नाही असे आश्वासन आयुक्त राव यांनी दिले होते. मात्र, त्याला एक दिवस उलट नाही तोच मानपाडा येथे रस्त्यांच्या बाजूला जवळपास आठ शेड चे काम सुरु झाले आहे.

ही बाब मनसे विभाग अध्यक्ष नीलेश महादेव चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर पालिकेचे पथकही तिथे पोहचले. मोरे आणि चव्हाण या दोघांनी पालिका प्रशासनाला फैलावर घेत जाब विचारला. तसेच जो पर्यंत ही कारवाई होणार नाही तो पर्यंत तेथून हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेऊन पथकाला लागलीच कारवाई करण्यास भाग पाडले.