Bihar Election 2025 NDA Alliance Candidates Performance Updates : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी तर दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर रोजी पार पडला. यानंतर आज (१४ नोव्हेंबर) मतमोजणी पार पडत आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असून बिहारमध्ये पुन्हा एनडीए सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत हाती आलेला कौल हा महायुतीच्या बाजून दिसत आहे. एनडीएला किती जागा मिळणार? तसेच महाआघाडीला किती जागा मिळणार? जन सुराज्य पक्षाला किती जागा मिळणार? बिहारमध्ये कोणाचं सरकार येणार? हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पुढील बिहारच्या निकालाचं चित्र काही क्षणात स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुकीच्या निकालाच्या सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Bihar Assembly Election 2025 Results NDA Performance Live : बिहार निवडणुकीच्या निकालाच्या सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

17:53 (IST) 14 Nov 2025

तेजस्वी यादव १२४०७ मतांनी आघाडीवर

बिहारच्या निवडणुकीत एनडीएची विक्रमी आघाडी घेतली आहे. मात्र, विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. तेजस्वी यादव हे सध्या १२४०७ मतांनी आघाडीवर आहेत.

17:37 (IST) 14 Nov 2025
बिहारमध्ये एनडीएची विक्रमी आघाडी; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सुशासनाचा विजय…”

बिहारच्या निवडणुकीत बिहारमधये एनडीएची विक्रमी आघाडी घेतली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार बिहामध्ये एनडीए सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यावर आता देशाचे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. “सुशासनाचा विजय झाला आहे, विकासाचा विजय झाला आहे, सार्वजनिक कल्याणाच्या भावनेचा विजय झाला आहे, सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे”, अशा शब्दांत मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.

17:24 (IST) 14 Nov 2025

बिहारमध्ये एनडीएला प्रचंड मोठं बहुमत, केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले….

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एनडीए प्रचंड मोठं बहुमत मिळवण्याकडे वाटचाल करत आहे. बिहार विधानसभेत एनडीएला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यामुळे एनडीएचे कार्यकर्ते मोठा जल्लोष करत आहेत. यावर आता केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, बिहारच्या जनतेनं ज्या प्रकारे प्रचंड बहुमत दिलं आहे ते पाहा पुढील पाच वर्षांसाठी विकासाच्या मार्गाने जाण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. बिहारमध्ये डबल इंजिन सरकार आणखी मजबूत करण्याचा क्षण आलेला आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार हे बिहारला विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी काम करतील, असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.

17:20 (IST) 14 Nov 2025

Bihar Assembly Results : फीर एक बार नितीश… भाजप-नितीश यांच्या विक्रमी विजयास कारणीभूत ठरले हे ६ घटक!

विरोधकांनी उपस्थित केलेल्या ‘मतचोरी’च्या मुद्द्याचे काय, होणार हे पाहावे लागेल. मात्र दोन दशके मुख्यमंत्रीपदावर राहूनही ७४ वर्षीय नितीशकुमार हे बिहारच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याचे निकालाने दाखवून दिले. …सविस्तर बातमी
17:17 (IST) 14 Nov 2025

“ज्ञानेश कुमार यांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा…”, कॉमेडियन कुणाल कामराची खोचक पोस्ट

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून दुपारपर्यंत एनडीएने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसले. यामुळे एनडीएच्या समर्थकांमध्ये जोरदार उत्साह दिसत आहे. दुसरीकडे महाआघाडीचे पानीपत झाल्याचे दिसले. महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादवही दुपारी तीन वाजेपर्यंत पिछाडीवर होते. यानंतर विरोधी पक्षांनी आणि इतरांनी निवडणूक आयोगाला बोल लावले आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरानेही निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली आहे.

सविस्तर वाचा

16:57 (IST) 14 Nov 2025

Bihar Assembly Election Results 2025 : “नितीश कुमार मुख्यमंत्री होते अन् राहतील”, जेडीयूचा मोठा दावा; पण काही वेळात पोस्ट डिलीट, बिहारमध्ये घडामोडींना वेग

Bihar Assembly Election Results 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एनडीए प्रचंड मोठं बहुमत मिळवण्याकडे वाटचाल करत आहे. बिहार विधानसभेत एनडीएला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यामुळे एनडीएचे कार्यकर्ते मोठा जल्लोष करत आहेत. दरम्यान एनडीए बिहारमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचं चित्र स्पष्ट होत असतानाच बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरून राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.

वाचा सविस्तर

16:22 (IST) 14 Nov 2025

तुरुंगात असलेले जेडीयू उमेदवार अनंत सिंह यांचा मोठा विजय

तुरुंगात असलेले जेडीयू उमेदवार अनंत सिंह यांनी २६ फेऱ्यांच्या मतमोजणीत मोकामा विधानसभा मतदारसंघातून २८२०६ मतांनी विजय मिळवला आहे.

16:18 (IST) 14 Nov 2025
बिहारमध्ये NDA ची विक्रमी आघाडी, भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष; मोदी थोड्याच वेळात भाजपा मुख्यालयातून संवाद साधणार?

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून राज्यात एनडीए प्रचंड मोठे बहुमत मिळवण्याकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, यानंतर आता देशाचे पंतप्रधान मोदी हे थोड्याच वेळात दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात दाखल होऊन जनतेशी संवाद साधणार आहेत. बिहार विधानसभेत एनडीएला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयाबाहेर मोठा जल्लोष केला आहे.

16:06 (IST) 14 Nov 2025

Bihar Elections Nitish Kumar: पिढी बदलली, बिहार बदलला; तरीही नितीश कुमार दोन दशकं सत्तास्थानी कायम

Bihar Elections Nitish Kumar सलग २० वर्षे सत्तेत राहणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. सत्तेत राहण्यासाठी त्यांनी युती तोडली- जोडली आणि पुन्हा तोडली असे सारे प्रयोग करून झाले. तरीही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. ही नितीशनीति आहे तरी काय? नितीश कुमारांचे सामर्थ्य नेमके कशात आहे… त्याचा शोध घेणारा हा लेख. …सविस्तर वाचा
16:06 (IST) 14 Nov 2025

Bihar Election Result 2025 : “राहुल गांधींना तोडच नाही, ९५ पराभव आणि…”, बिहारमधील यशानंतर भाजपाने उडवली खिल्ली

Bihar Vidhan Sabha Nivadnuk Nikal Updates: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून राज्यात एनडीए प्रचंड मोठे बहुमत मिळवण्याकडे वाटचाल करत आहे. यादरम्यान भारतीय जनता पक्षाकडून विरोधीपक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने होणाऱ्या निवडणुकीतील पराभवाचे प्रतीक बनले आहेत, असा दावा भाजपने केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगावर नागरिकांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप करत टीका केली आहे.

वाचा सविस्तर

15:34 (IST) 14 Nov 2025

“तेजस्वी यादव यांना पुढील १० किंवा २० वर्षांत सत्तेत यायचे असेल तर…”, उपेंद्र कुशवाह यांची प्रतिक्रिया

बिहार निकालावर बोलताना राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह म्हणाले की, “मी तेजस्वी यादव यांना सांगू इच्छितो की जर त्यांना पुढील १० किंवा २० वर्षांत सत्तेत यायचे असेल तर त्यांना त्यांची पद्धत बदलावी लागेल. त्यांच्या लोकांनी वर्तन बदलावे लागेल. बिहारच्या लोकांनी त्यांना नाकारले आहे आणि त्यांनी बिहारमध्ये असा चेहरा निर्माण केला आहे की त्यांना बिहारच्या लोकांनी नाकारलेच पाहिजे.”

15:09 (IST) 14 Nov 2025

Bihar Election Analysis : सविस्तर : बिहारच्या निकालातून काँग्रेसने काय शिकावे? उत्तर भारतात धुव्वा; दक्षिण भारतात काय?

Bihar Assembly Election Results 2025 Analysis : मतचोरीवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वातावरण तापविले होते, पण बिहारमधील मतदारांवर या मतचोरीच्या आरोपांचा काहीच परिणाम झालेला नाही हेच निकालावरून स्पष्ट झाले. …अधिक वाचा
15:00 (IST) 14 Nov 2025

‘निकाल काहीही लागला, तरी जनतेच्या मनातले मुख्यमंत्री तेजस्वी यादवच’; रोहित पवारांची प्रतिक्रिया

“हरियाणा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता. हे चित्र पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. EVM व्होटिंगदरम्यान पहिला एक तास हा कल पोस्टलप्रमाणेच राहिला. परंतु पुढच्या एक दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजपा आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आला. आज सेम-टू-सेम याच पद्धतीचे चित्र बिहारचुनाव दरम्यान निकाल येताना दिसत आहे. येणाऱ्या निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा, निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आलंय हे नक्की! महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा गुवाहाटी व्हाया सुरत जसा प्रवास झाला तसाच निवडणूक निकाल लावण्याचा आयोगाचा प्रवास हरियाणा टू बिहार व्हाया महाराष्ट्र असा दिसून येतो. असो, ही निवडणूक थेट बिहारची जनता विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यात आहे, यांना मिळालेला प्रतिसाद त्यांच्या सभांमध्ये उसळलेला जनसागर आणि त्यांनी युवांचे, शेतकऱ्यांचे मांडलेले प्रश्न बघता आजचा निकाल काहीही लागला, तरी जनतेची खरी पसंद आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मात्र तेजस्वी यादव आहेत यात तिळमात्र शंका नाही”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

14:55 (IST) 14 Nov 2025

भाजपाच्या ९२ तर जेडीयूच्या ८२ जागा आघाडीवर, विरोधकांच्या किती जागा आघाडीवर? जाणून घ्या

बिहारमध्ये एनडीए सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार भाजपाच्या ९२ जागा आघाडीवर आहेत, जेडीयूच्या ८२ जागा आघाडीवर आहेत, आरजेडीच्या २५ जागा आघाडीवर आहेत. एलजेपीआरव्ही २१ जागा आघाडीवर आहेत. एमआयएमच्या ६ जागा आघाडीवर आहेत. कॉग्रेसच्या ६ जागां आघाडीवर आहेत. एसएएम पाच जागांनी आघाडी आहे.

14:50 (IST) 14 Nov 2025

Bihar Election Result 2025 : राहुल गांधी यांची मत चोरी मोहिम फेल; बिहारमध्ये कॉग्रेस फक्त ६ जागांवर आघाडीवर

Bihar Election Result 2025 : बिहारमध्ये एनडीए सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तसेच दुसरीकडे विरोधी महाआघाडीला मात्र मोठा धक्का बसल्याची चिन्हे आहेत. तसेच बिहारमध्ये कॉग्रेस फक्त ६ जागांवर आघाडीवर असून राहुल गांधी यांची मत चोरी मोहिम फेल ठरल्याची चर्चा आहे.

14:43 (IST) 14 Nov 2025

बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार? नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीवर आहे. एडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी यांनी म्हटलं की, “बिहारमधील जनतेने एनडीएला दिलेला पाठिंबा ऐतिहासिक आहे. बिहारमधील जनतेने जातीवादाला विरोध केला आहे आणि बिहारमधील डबल इंजिन सरकारच्या विकासाला पाठिंबा दिला आहे”, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

14:38 (IST) 14 Nov 2025

मोठी बातमी! मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादव ४,८२९ मतांनी पिछाडीवर, भाजपाच्या उमेदवाराची जबरदस्त आघाडी

उत्तर भारतातील राजकारणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील मानले जाणारे राज्य म्हणजे बिहार. यंदाची विधानसभा निवडणूक ही अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीतून ठरणार होते. अतिशय प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादव राघोपूर विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. महागठबंधन आणि राष्ट्रीय जनता दलासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सविस्तर वाचा

14:37 (IST) 14 Nov 2025

तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव दोन्ही बंधू पिछाडीवर

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीवर असून एडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर महाआघाडीला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. तेजस्वी यादव हे पिछाडीवर आहेत, तसेच तेज प्रताप यादव हे देखील महुआ विधानसभा मतदार संघातून पिछाडीवर आहेत.

14:09 (IST) 14 Nov 2025

14:04 (IST) 14 Nov 2025

13:55 (IST) 14 Nov 2025

13:55 (IST) 14 Nov 2025

Maithili Thakur : “बधैया बाजे आँगने में…”; बिहारमध्ये NDA ने मोठी आघाडी मिळवल्यानंतर मैथिली ठाकूरने गायलं गीत

Maithili Thakur : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून थोड्या वेळात बिहारच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मात्र, दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीवर असून एडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीचं सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत.

बिहारच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली होती ती म्हणजे लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर यांची. मैथिली ठाकूर या आघाडीवर असून विजयाच्या जवळ आहेत. दरम्यान, थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल. मात्र, बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना मैथिली ठाकूर यांनी एनडीएला शुभेच्छा देत शुभेच्छा गीत गायलं आहे.

13:52 (IST) 14 Nov 2025

13:36 (IST) 14 Nov 2025

“ज्ञानेश कुमार, काम पे लागो!”, नताशा आव्हाड यांचं खोचक ट्विट

“महाराष्ट्र और बिहार तो झांकी है, पश्चिम बंगाल और तामिळनाडू अभी बाकी है! ज्ञानेश कुमार, काम पे लागो!”, असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनी केलं आहे.

13:24 (IST) 14 Nov 2025
Bihar Election Result 2025 : नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार? पंतप्रधान मोदी संध्याकाळी भाजपा मुख्यालयातून संवाद साधणार?

Bihar Election Result 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एनडीए आघाडीवर आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा महायुतीच सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी ६ वाजता दिल्लीतील भाजपा मुख्यालयाला भेट देत संबोधित करणार आहेत.

13:21 (IST) 14 Nov 2025
Bihar Election Result 2025 Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी बिहारमध्ये प्रचार केलेल्या ४९ मतदारसंघातील उमेदवार आघाडीवर!

Bihar Election Result 2025 Devendra Fadnavis : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एनडीए आघाडीवर आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा महायुतीच सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, बिहारच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रचार केला होता. त्यांनी प्रचार केलेल्या ४९ मतदारसंघातील उमेदवार आघाडीवर आहेत.

13:05 (IST) 14 Nov 2025

चिराग पासवान यांच्या पक्षाची २० जागांवर आघाडी

मतमोजणीत NDA ची १९७ जागांवर आघाडी असून चिराग पासवान यांच्या पक्षाची २० जागांवर आघाडी आहे. थोड्याच वेळात निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे.

13:02 (IST) 14 Nov 2025

Tejashwi Yadav Election Result: महागठबंधनच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादवच पिछाडीवर, RJD चे ‘तेज’ ओसरणार?

Tejashwi Yadav Raghopur Election Result 2025: महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री राघोपूर विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. …सविस्तर वाचा
12:59 (IST) 14 Nov 2025

बिहारमध्ये NDA ची १८८ जागांवर आघाडी, अखिलेश यादवांनी दिला मोठा इशारा; म्हणाले, “एसआयरने बिहारमध्ये…”

“एसआयरने बिहारमध्ये जो खेळ खेळला तो आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी शक्य होणार नाही, कारण हे निवडणूक कट आता उघड झाले आहे. आता आम्ही त्यांना हा खेळ खेळू देणार नाही. सीसीटीव्हीप्रमाणे आमचे ‘पीपीटीव्ही’ म्हणजेच ‘पीडीए प्रहारी’ सतर्क राहतील आणि भाजपाचे मनसुबे उधळून लावतील. भाजपा हा पक्ष नाही तर फसवणूक करणारा पक्ष आहे”, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.

12:45 (IST) 14 Nov 2025

मतमोजणीत NDA ची १८८ जागांवर आघाडी, मैथिली ठाकूर यांनी गायलं शुभेच्छा गीत

अलिनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार आणि गायिका मैथिली ठाकूर यांनी मतमोजणीत NDA १८८ जागांवर आघाडी आहे. यावर प्रतिक्रिया देताना शुभेच्छा गीत गायलं आहे.

बिहार विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाइव्ह (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)