India Ex Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral Highlights: देशाला जागतिकीकरणाच्या वाटेवर नेणारे आणि नव्या आर्थिक विकासाची देशात सुरुवात करणारे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी दिल्लीतल्या निगमबोध घाटावर लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने देशभरात ७ दिवसांचा शोक जाहीर केला आहे.

Live Updates

India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Highlights: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप…

13:37 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh Funeral Live Updates: मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेकडे सामान्य नागरिकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांचीही पाठ?

डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला सामान्य नागरिक, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचीही गैरहजेरी? सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात

13:35 (IST) 28 Dec 2024

India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Live Updates: मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार निगमबोध घाटावर करण्याबाबत आक्षेप नोंदवला आहे. “अटल बिहारी वाजपेयी यांचं १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झालं. तेव्हा मोदीच पंतप्रधान होते. तेव्हा वाजपेयींचे अंत्यसंस्कार राष्ट्रीय स्मृतीस्थळावर झाले. जिथे याआधी दिवंगत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधानांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार झाले. पण मोदी पंतप्रधान असतानाच आता मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मात्र निगम बोध घाटावर झाले. ते भाजपाचे नसून काँग्रेसचे नेते होते म्हणून हे झालं का?”

13:30 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh Funeral Live Updates: शशी थरूर यांनी शेअर केली डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबतची आठवण..

“मला कल्पना होती की डॉ. मनमोहन सिंग त्यांना दिवाळीत येणारे महागडे गिफ्ट्स आणि मिठाई परत पाठवत असत. मी त्यांना एकदा म्हणालो की हे गिफ्ट्स आणि मिठाई दिवाळीत एकमेकांना देण्याची पद्धत आहे. ते परत देणं कदाचित उद्धटपणाचं वाटू शकतं. त्यावर त्यांनी फक्त एक स्मितहास्य केलं. नंतर जेव्हा माझी त्यांची कालांतराने भेट झाली, तेव्हा त्यांनी मला सांगितलं ‘शशी, मी तुझा सल्ला ऐकला’, मला कळेचना की मी असा कोणता सल्ला माझ्या पंतप्रधानांना दिला, जो त्यांना महत्त्वाचा वाटला. ते म्हणाले की तू मला दिवाळी भेटीबाबत जे सांगितलंस ते मी ऐकलं. मी आता महागड्या भेटवस्तू परत देतो, पण मिठाई परत देत नाही. मी ती माझ्या स्टाफमध्ये वाटतो!’ हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य आणखी मोठं झालं होतं”, शशी थरूर यांनी पोस्ट केलेला डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबतचा किस्सा!

13:24 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh Funeral Live Updates: देशाला विकासाची नवी क्षितिजं खुली करणारा भारताचा ‘रत्न’ अनंतात विलीन!

डॉ. मनमोहन सिंग यांना मुखाग्नी दिला तो क्षण…

13:03 (IST) 28 Dec 2024

India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Live Updates: डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाला विधीवत मुखाग्नी…

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवाला दुपारी एकच्या सुमारास मुखाग्नी दिला गेला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आदी मान्यवर उपस्थित होते.

12:47 (IST) 28 Dec 2024

India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Live Updates: गंगा आरतीच्या माध्यमातून डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली

वाराणसीत शुक्रवारी संध्याकाळी डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली देण्यासाठी गंगा आरती करण्यात आली.

12:42 (IST) 28 Dec 2024

dr manmohan singh funeral live updates: मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचे विधी

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्काराचे विधी केले जात आहेत..

12:07 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh Funeral Live Updates: दिल्लीतल्या निगमबोध घाटावर दिग्गजांकडून डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली…

दिल्लीतल्या निगमबोध घाटावर दिग्गजांकडून डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली…

11:58 (IST) 28 Dec 2024

India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी निगमबोध घाटावर उपस्थित

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री व सर्वपक्षीय नेते उपस्थित.

11:46 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh Funeral Live Updates: मनमोहन सिंग यांच्यावर थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार

मनमोहन सिंग यांना तिन्ही सैन्यदलांकडून सलामी, थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार…

10:51 (IST) 28 Dec 2024

India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Live Updates: अंत्यदर्शनावेळी मनमोहन सिंग यांचे कुटुंबीय भावुक

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि त्यांच्या कन्या दमन सिंग यांनी काँग्रेस मुख्यालयात त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं

10:42 (IST) 28 Dec 2024

dr manmohan singh funeral live updates: मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात…

डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

10:40 (IST) 28 Dec 2024

India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Live Updates: राहुल गांधींनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन

राहुल गांधींनी घेतलं मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

09:49 (IST) 28 Dec 2024
India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Live Updates: मनमोहन सिंग यांचं पार्थिव दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात…

डॉ. मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात..

09:26 (IST) 28 Dec 2024

India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Live Updates: मनमोहन सिंग यांच्या स्मृतिस्थळासाठी जागा देण्यास केंद्राची मंजुरी

डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतिस्थळासाठी केंद्र सरकारकडून जागा देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची टीका शुक्रवारी काँग्रेसकडून करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशीरा केंद्र सरकारकडून जागा देण्याचं मान्य करण्यात आलं आहे.

08:58 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh Funeral Live Updates: मनमोहन सिंग यांचं पार्थिव काँग्रेस भवनाकडे रवाना

डॉ. मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानातून काँग्रेस भवनाच्या दिशेनं रवाना झालं आहे.

08:48 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh Demise: पाकिस्तानमधील ‘त्या’ गावाला होती मनमोहन सिंग यांच्या येण्याची प्रतीक्षा!

पाकिस्तानच्या गाह गावात मनमोहन सिंग यांच्या पीढीजात घराची जागा स्थानिकांनी कम्युनिटी सेंटर म्हणून जतन केली आहे. मनमोहन सिंग यांना आम्ही आमंत्रित केलं होतं, पण त्यांना येता आलं नाही. आता त्यांच्या पत्नी व मुलांनी या ठिकाणी भेट द्यावी, अशी इच्छा असल्याचं पाकिस्तानमधील स्थानिक गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

08:35 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh Death: “जे त्यांनी न बोलता करून दाखवलं, ते अनेकांना…”, राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना सोशल पोस्टमधून श्रद्धांजली!

“डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इथे वाचा राज ठाकरेंची सविस्तर पोस्ट

08:34 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?

पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत १०० हून अधिक पत्रकार उपस्थित होते. ६२ हून अधिक प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. यावेळी त्यांनी माध्यमांवरही बोट ठेवले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “मी कमकुवत पंतप्रधान आहे, असे मी बिलकुल मानत नाही. समकालीन माध्यमे आणि संसदेतील विरोधी पक्षांपेक्षा इतिहास माझ्याबद्दल अधिक दयाळू असेल.”

इथे वाचा सविस्तर वृत्त

08:33 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?

पंतप्रधान पद सोडल्यानंतर म्हणजेच २०१४ नंतर माजी पंतप्रधान दिल्लीतल्या मोतिलाल नेहरु मार्गावर असलेल्या बंगला क्रमांक ३ मध्ये वास्तव्य करत होते. २०१४ च्या जून महिन्यानंतर ते या बंगल्यात राहू लागले. ते याच बंगल्यात वास्तव्य करत होते.

08:33 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh Death: “मी मुख्यमंत्री असताना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवल्या मनमोहन सिंग यांच्या आठवणी; म्हणाले, “दिल्लीत आल्यानंतर माझं…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फाळणीच्या वेळचे काही संदर्भ आपल्या व्हिडीओमध्ये दिले. “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आपल्या सगळ्यांनाच मोठं दु:ख झालं आहे. त्यांचं आपल्यातून जाणं एक देश म्हणून आपलं खूप मोठं नुकसान आहे. फाळणीच्या त्या काळात खूप काही गमावल्यानंतर भारतात येणं आणि इथे आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत यश संपादन करणं ही सामान्य बाब नाही. कमतरता आणि संघर्षांमधून पुढे येऊन कशा प्रकारे नवी क्षितिजं गाठली जाऊ शकतात, याची शिकवण त्यांचं जीवन भावी पिढीला देत राहील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संदेशाच्या सुरुवातीलाच नमूद केलं.

इथे वाचा पंतप्रधानांचा सविस्तर संदेश…

08:32 (IST) 28 Dec 2024

dr manmohan singh funeral live updates: मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर कसे होणार अंत्यसंस्कार…

देशाच्या माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील विशेष स्मृतीस्थळांवर केले जातात. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या माजी पंतप्रधानांवर दिल्लीतील राजघाट संकुलात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याचबरोबर अनेक माजी पंतप्रधानांसाठी स्वतंत्र समाधी स्थळेही बांधली आहेत. असे असले तरी, अंत्यसंस्कार करण्याची पद्धत मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार आहे.

08:31 (IST) 28 Dec 2024

India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Live Updates: कधी घेता येणार अंत्यदर्शन?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव आज त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आणण्यात आले आहे. उद्या सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात नेले जाईल त्यानंतर सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान सर्वांना मनमोहन सिंह यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. दरम्यान उद्या सकाळी ९. ३० वाजता काँग्रेस कार्यालयातून अंतयात्रेला सुरुवात होणार आहे.

08:20 (IST) 28 Dec 2024

dr manmohan singh funeral live updates: आजचा अग्रलेख – मार्दवी मार्तंड!

India Former PM Dr. Manmohan Singh Passes Away : आज काँग्रेस राजकीय पक्ष म्हणून जी तळमळ दाखवतो त्याच्या निम्मे जरी शहाणपण तो पक्ष सिंग यांच्या दुसऱ्या खेपेस दाखवता तर त्या पक्षाची आज ही दशा न होती.

इथे वाचा संपूर्ण अग्रलेख

08:19 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh: आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?

Dr. Manmohan Singh: आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत लाज वाटण्यासारखं काहीही नाही म्हणणाऱ्या मनमोहन सिंग यांनी इतिहासाकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. इतिहास त्यांना खरंच न्याय देईल?

इथे वाचा सविस्तर

08:18 (IST) 28 Dec 2024
India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Live Updates: मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी काँग्रेसकडून जागेची मागणी…

डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारता येईल, अशा ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. दरम्यान सिंग यांच्या स्मारकास जागा न देणे हा देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानाचा अपमान ठरेल, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी नमूद केले. अकाली दलाचे सुखबिरसिंग बादल यांनी सिंग यांच्या स्मारकास जागा दिली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा सविस्तर

08:18 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh Funeral Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एका ध्वनिचित्र संदेशाद्वारे डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली. ‘प्रतिकुल परिस्थितीत असंख्य अडथळे पार करून यशाच्या शिखरावर कसे पोहोचता येते, याचा उत्तम परिपाठ असलेला डॉ. सिंग यांचा जीवनपट येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्शवत असेल’, असे मोदी म्हणाले. ‘पंतप्रधान म्हणून डॉ. सिंग यांचे देशाच्या विकास आणि प्रगतीतील योगदान कायम स्मरणात राहील’, असेही मोदी यांनी या संदेशात म्हटले आहे.

08:17 (IST) 28 Dec 2024

Dr. Manmohan Singh Funeral Live Updates: राजकीय वर्तुळातील नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांतील नेतेमंडळींनी तसेच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुक्रवारी डॉ. सिंग यांच्या मोतीलाल नेहरू रोड येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यापासून गेल्या दहा वर्षांपासून डॉ. सिंग यांचे येथेच वास्तव्य होते.

08:16 (IST) 28 Dec 2024

dr manmohan singh funeral live updates: पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात…

दिल्लीतील निगमबोध घाट येथे सकाळी पावणेबाराच्या सुमारास डॉ. सिंग यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८ ते ९.३० या वेळेत डॉ. सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.

वाचा सविस्तर

08:15 (IST) 28 Dec 2024

India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Live Updates: आजवर अनेक महत्त्वाच्या पदांवर काम…

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार, केंद्रीय अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान अशी महत्त्वाची पदे भूषवताना भारताच्या सर्वसमावेशक आर्थिक विकासालाच ध्येयस्थानी ठेवणारे डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव गुरुवारी मध्यरात्रीनंतर निवासस्थानी आणले गेले.

वाचा सविस्तर

डॉ. मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल (photo – AP / insta)

India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Highlights: डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार…