India General Election Result 2024 Exit Poll Updates, 1 June : गेल्या दीड महिन्यापासून देशभरात विविध राज्यांत सात टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आज देशभरातील ८ राज्यांमधल्या ५७ जागांसाठी शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यासाठी मतदान झालं. एकीकडे पहिल्या सहा टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी फारशी वाढली नसल्याचं दिसून आलं असताना दुसरीकडे शेवटच्या टप्प्यात काय घडणार? याची उत्सुकता मतदारांना आहे. मात्र, त्याचवेळी आज संध्याकाळी येणाऱ्या एक्झिट पोल्सकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. यंदाचे एक्झिट पोल्स कुणाच्या पारड्यात कौल टाकणार? याविषयी राजकीय विश्लेषकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Live Updates

Exit Poll Results 2024 Lok Sabha Election Updates : एक्झिट पोल्सचे आकडे जाहीर, भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मतदारांचा कौल असल्याचा अंदाज!

08:35 (IST) 1 Jun 2024
2024 Lok Sabha Nivadnuk Phase 7 Live Updates in Marathi: अभिनेते मिथुन चक्रवर्तींची प्रतिक्रिया

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी बजावला मतदानाचा अधिकार, भाजपाचं नाव घेत म्हणाले, आता उद्यापासून…

https://x.com/ANI/status/1796732594597609737

07:28 (IST) 1 Jun 2024
2024 Lok Sabha Nivadnuk Phase 7 Live Updates in Marathi: मतदानानंतर राघव चढ्ढा यांची प्रतिक्रिया

मतदान केल्यानंतर आपचे खासदार राघव चढ्ढा यांची प्रतिक्रिया…

https://twitter.com/ANI/status/1796718948072710390

07:14 (IST) 1 Jun 2024
Lok Sabha Polls 2024 Phase 7 Live Updates: चिराग पासवान यांच्याकडून आचारसंहितेचं उल्लंघन?

लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांचं एनडीएलाच बहुमत मिळेल असं विधान; आचारसंहितेचं उल्लंघन? म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की पहिल्या ६ टप्प्यांप्रमाणेच सातव्या टप्प्यातही एनडीएच्या बाजूनेच मतदान होईल. एनडीए बिहारमध्ये ४० जागा जिंकेल आणि मोदीच पंतप्रधानपदाची शपथ घेतील यात कोणतीही शंका नाही!”

https://twitter.com/ANI/status/1796699661304037603

07:12 (IST) 1 Jun 2024
2024 Lok Sabha Nivadnuk Phase 7 Live Updates in Marathi: सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात!

सातव्या टप्प्यासाठीच्या मतदानाला ८ राज्यांमधील ५७ मतदारसंघांमध्ये सुरुवात!

https://twitter.com/ANI/status/1796715796363984960

07:08 (IST) 1 Jun 2024
2024 Lok Sabha Nivadnuk Phase 7 Live Updates in Marathi: मोदींचं मतदारांना आवाहन!

सातव्या टप्प्यात मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं मोदींचं आवाहन!

https://twitter.com/narendramodi/status/1796716186752995479

https://twitter.com/narendramodi/status/1796715966229053461

07:07 (IST) 1 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Exit Poll Live: एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाकडून वेळेची मर्यादा…

एक्झिट पोल्सबाबत निवडणूक आयोगाचे निर्बंध!

https://twitter.com/ECISVEEP/status/1796590705831489619

06:57 (IST) 1 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Phase 7 Voting Live Updates in Marathi: शेवटच्या टप्प्यातील महत्त्वाचे उमेदवार…

महत्त्वाचे उमेदवार

नरेंद्र मोदी, भाजप (वाराणसी, उत्तर प्रदेश)

अनुराग ठाकूर, भाजप (हमीरपूर, हिमाचल प्रदेश)

अभिषेक बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस (डायमंड हार्बर, प. बंगाल)

कंगना राणावत, भाजप (मंडी, हिमाचल प्रदेश)

विक्रमादित्य सिंह, काँग्रेस (मंडी, हिमाचल प्रदेश)

आनंद शर्मा, काँग्रेस (कांगडा, हिमाचल प्रदेश)

मीसा भारती, राजद (पाटलीपुत्र, बिहार)

06:57 (IST) 1 Jun 2024
2024 Lok Sabha Nivadnuk Phase 7 Live Updates in Marathi: कुठून किती उमेदवार रिंगणात?

एकूण ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. बसपाने सर्वाधिक ५६ उमेदवार उभे केले आहेत, त्यापाठोपाठ भाजपने ५१ आणि काँग्रेसने ३१ उमेदवार उभे केले आहेत. संपूर्ण पंजाबमधील मतदानासह, राज्यात या टप्प्यात सर्वाधिक ३२८ उमेदवार आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेशातील १३ जागांसाठी १४४ उमेदवार आहेत. बिहारमध्ये ८ जागांसाठी १३४, तर पश्चिम बंगालमध्ये ९ जागांसाठी १२४ उमेदवार आहेत.

06:56 (IST) 1 Jun 2024
Lok Sabha Polls 2024 Phase 7 Live Updates: कुठे-कुठे होणार आज मतदान?

अखेरच्या टप्प्यात पंजाबमधील सर्व १३, हिमाचल प्रदेशातील सर्व चार, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील नऊ, बिहारमधील आठ, ओडिशातील सहा, झारखंड व चंदीगडमधील प्रत्येकी तीन जागांवर मतदान होणार आहे. ओडिशाच्या उर्वरित ४२ विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होणार असून हिमाचल प्रदेशातील सहा विधानसभा जागांसाठीही पोटनिवडणूक होणार आहे.

06:56 (IST) 1 Jun 2024
2024 Lok Sabha Nivadnuk Phase 7 Live Updates in Marathi: मोदींसह ९०४ उमेदवार रिंगणात!

सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंह ९०४ उमेदवार रिंगणात आहेत.

06:55 (IST) 1 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Phase 7 Voting Live Updates in Marathi: सातव्या टप्प्याची आकडेवारी…

सातव्या टप्प्यात १०.०६ कोटी नागरिक मतदानासाठी पात्र असून त्यात ५.२४ कोटी पुरुष, ४.८२ कोटी महिला आणि ३,५७४ तृतीयपंथींचा समावेश आहे.

06:53 (IST) 1 Jun 2024
Lok Sabha Polls 2024 Phase 7 Live Updates: शेवटच्या टप्प्यासाठी काही मिनिटांत मतदानाला सुरुवात

थोड्याच वेळात सातव्या टप्प्यासाठीच्या मतदानाला सुरुवात…

लोकसभा निवडणूक २०२४ (प्रातिनिधिक छायाचित्र)

Lok Sabha Polls 2024 Phase Seven Updates: आज लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचं मतदान!