2024 Mumbai Konkan Assembly Election Result highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली होती. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.

Live Updates

Mumbai Konkan Assembly Election Results highlights : मुंबईसह ठाणे व कोकणातील प्रत्येक मतदारसंघाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.

13:47 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : रायगड ब्रेकिंग

  • श्रीवर्धन मतदार संघातुन महायुतीच्या आदिती तटकरे विजयी
  • प्रतीस्पर्धी उमेदवार अनिल नवगणे यांच्या विरोधात ८२ हजार ८५४ मताधिक्य मिळवून भरघोस विजय
  • माजी आ. अनिकेत तटकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला जल्लोश
  • 13:46 (IST) 23 Nov 2024

    vikhroli Assembly Election Results 2024 : विक्रोळी विधानसभा अपडेट

    १) विश्वजित ढोलम – १६७१६

    २) सुनील राऊत – ६५७१५

    ३) सुवर्णा करंजे – ५०३६३

    ४) नोटा – १६८९

    13:42 (IST) 23 Nov 2024

    Kalyan Assembly Constituency Election Results live updates : १६ वी फेरी

    कोपरी -पाचपाखाडी विधानसभा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ७०,४१९ मतांनी आघाडीवर

    एकनाथ शिंदे (शिवसेना ) ९६, २६१

    केदार दिघे (उबाठा ) २५, ८४२

    मनोज शिंदे (बंडखोर उमेदवार ) १,४०९

    नोटा – १६६१

    13:41 (IST) 23 Nov 2024

    Kalyan Assembly Constituency Election Results: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) उमेदवार राजेश मोरे यांचा विजय निश्चित

    (१९ फेऱ्या पूर्ण)

    शिवसेना राजेश मोरे=91636

    सुभाष भोई=39871

    राजू पाटील=40250

    एकूण लीड=51386

    13:41 (IST) 23 Nov 2024

    Thane Assembly Constituency Election Results: १८ फेरी

    ठाणे शहर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार संजय केळकर हे ३५६५१ मतांनी आघाडीवर

    संजय केळकर (भाजप) ७४२४२

    अविनाश जाधव (मनसे) २७२९८

    राजन विचारे (ठाकरे गट) ३८५९१

    13:41 (IST) 23 Nov 2024

    Kalyan Assembly Constituency Election Results: १५ वी फेरी

    कल्याण ग्रामीण 14 वी फेरी

    राजेश मोरे 67 हजार 956

    राजू पाटील 31 हजार 933

    सुभाष भोईर 25 हजार 938

    13:41 (IST) 23 Nov 2024

    Kopri Assembly Constituency Election Results: १५ वी फेरी

    कोपरी -पाचपाखाडी विधानसभा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६५,९८१ मतांनी आघाडीवर

    एकनाथ शिंदे (शिवसेना ) ९०, ६६७

    केदार दिघे (उबाठा ) २४, ६८६

    मनोज शिंदे (बंडखोर उमेदवार ) १, ३७०

    नोटा – १५९०

    13:41 (IST) 23 Nov 2024

    Kalwa Assembly Constituency Election Results: कळवा – मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी आघाडी मिळवल्याने त्यांच्या मतदारसंघात ‘काम बोलता है’ असा आशय असणारी फलकबाजी करण्यात आली आहे. (छाया- दीपक जोशी)

    13:40 (IST) 23 Nov 2024

    Kalyan Assembly Constituency Election Results: कल्याण पूर्व 17 वी फेरी

    सुलभा गायकवाड 55607

    महेश गायकवाड 39 हजार 884

    धनंजय बोडरे 28 हजार 586.

    13:40 (IST) 23 Nov 2024

    Assembly Constituency Election Results: ओवळा माजीवडा मतदार संघात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक ४४३०१ मतांनी आघाडीवर

    प्रताप सरनाईक( शिंदेंची शिवसेना) ६७९२६

    नरेश मनेरा (ठाकरे गट) २३६२५

    संदीप पाचंगे (मनसे) ३१६०

    13:40 (IST) 23 Nov 2024

    Dombiwali Assembly Constituency Election Results: डोंबिवली विधानसभा बारावी फेरी

    रवींद्र चव्हाण 71417

    दीपेश म्हात्रे 31735

    39 हजार 682 मतांनी आघाडीवर

    13:39 (IST) 23 Nov 2024

    Dombiwali Assembly Constituency Election Results: डोंबिवली विधानसभा बारावी फेरी

    रवींद्र चव्हाण 71417

    दीपेश म्हात्रे 31735

    39 हजार 682 मतांनी आघाडीवर

    13:34 (IST) 23 Nov 2024

    Beed Assembly Constituency Election Results: बीड विधानसभा

    *फेरी क्र.-17

    संदीप क्षीरसागर -64707

    डॉ.योगेश क्षीरसागर-54238

    आघाडी-10469 (संदीप क्षीरसागर)

    माजलगाव मतदार संघ

    14 फेरी अखेर

    मोहन जगताप 3635 मतांनी आघाडीवर

    13:33 (IST) 23 Nov 2024

    Dapoli Assembly Constituency Election Results: दापोली विधानसभा मतदार संघ निकाल

    मतमोजणी फेरी २१

    अबगुल संतोष सोनू – मनसे: ३८०७

    कदम योगेश – शिवसेना: ७६५२६

    कदम संजय शिवसेना (उबाठा):५९०७५

    मर्चंडे प्रविण – बसपा: १३०६

    कदम योगेश रामदास – अपक्ष : २५६

    कदम योगेश विठ्ठल – अपक्ष: ११२

    कदम संजय सिताराम – अपक्ष: ५३६

    कदम संजय संभाजी – अपक्ष : ६६५

    खांबे ज्ञानदेव रामचंद्र- अपक्ष: ६७७

    नोटा : ८५६

    13:33 (IST) 23 Nov 2024

    Vandre East Assembly Constituency Election Result- वांद्रे पूर्व (तेरावी फेरी)

    ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई ७०१३ मतांनी आघाडीवर

    अजित पवार गटाचे झिशान सिद्दिकी पिछाडीवर

    वरुण सरदेसाई – ३७९१३

    झिशान सिद्दिकी – ३०९००

    13:33 (IST) 23 Nov 2024

    Assembly Constituency Election Results: नालासोपारा ९ वी फेरी भाजपचे राजन नाईक १३ हजार ३५३ मतांनी पुढे

    एकूण

    राजन नाईक ८०, ४१८

    क्षितिज ठाकूर ६७, ०६५

    13:33 (IST) 23 Nov 2024

    Sawantwadi Assembly Constituency Election Results: सावंतवाडी मतदारसंघात १९ फेरी अखेर दिपक केसरकर ३४ हजार २०० मतांनी आघाडीवर

    सावंतवाडी

    सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे.१९ फेरी अखेर दिपक केसरकर ३४ हजार २०० मतांनी आघाडीवर आहेत.

  • दिपक केसरकर ६९,९२९
  • राजन तेली ३५,७२९
  • विशाल परब
  • 13:32 (IST) 23 Nov 2024

    sangamner Assembly Constituency Election Results: संगमनेर

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये पराभवाच्या छायेत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिंदे सेनेचे अमोल खताळ पंधराव्या फेरीनंतर ११०३२ मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून खताळ यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे त्यामुळे थोरात पराभवाच्या छायेत आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या थोरात यांनी आजवर सलग आठ वेळा विजय मिळवला होता.

    13:24 (IST) 23 Nov 2024
    Andheri West Assembly Constituency- अंधेरी पश्चिम (चौदावी फेरी)

    अमित साटम (भाजपा) – ५०,९८९

    अशोक जाधव (कॅांग्रेस) – ४८४२१

    अमित साटम २५६८ मतांनी आघाडीवर

    13:22 (IST) 23 Nov 2024

    Mahim Assembly Constituency- माहिम विधानसभा (चौदावी फेरी)

    महेश सावंत (शिवसेना ठाकरे गट) – 37259

    सदा सरवणकर (शिवसेना शिंदे गट)- 36105

    अमित ठाकरे (मनसे) – 25162

    महेश सावंत आघाडीवर

    13:19 (IST) 23 Nov 2024
    Versova Assembly constituency- वर्सोवा (चौदावी फेरी)

    भारती लव्हेकर (भाजपा)- ३६०४५

    हारून खान (सेना ठाकरे) – ४६६१९

    हारून खान १०,५७४ मतांनी आघाडीवर

    13:19 (IST) 23 Nov 2024

    विक्रोळी विधानसभा (सतरावी फेरी)

    विश्वजीत ढोलम- १६१०७

    सुनील राऊत- ६१०४०

    सुवर्णा करंजे- ४४८२२

    13:17 (IST) 23 Nov 2024

    वरळी विधानसभा (अकरावी फेरी)

    ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे ४२ हजार ०७५ मते

    शिंदे गटाचे मिलिंद देवरा ३७ हजार ४१३ मते

    मनसेचे संदीप देशपांडे १४ हजार ९५० मते

    आदित्य ठाकरे ४ हजार ६६२ मतांची आघाडी

    13:17 (IST) 23 Nov 2024

    चेंबूर विधानसभा (बारावी फेरी)

    प्रकाश फातरपेकर – ३०२३७

    तुकाराम काते- ३५३७९

    माऊली थोरवे- ४२५८

    दीपक निकाळजे- ५७८६

    वंचीत- ५३५३

    13:15 (IST) 23 Nov 2024

    Maharashtra Assembly Election Results 2024 : पनवेलमध्ये एकुण मतदान ३ लाख ८२ हजार मतदान झाले असून आतापर्यंत १३ व्या फेरीअखेर १ लाख ९५ हजार मतांची मोजणी झाली आहे.

    13:09 (IST) 23 Nov 2024
    माहिम विधानसभा (तेरावी फेरी)

    शिवसेना (ठाकरे गट)- महेश सावंत- ३४३५२

    शिवसेना (शिंदे गट)- सदा सरवणकर- ३२७५५

    मनसे- अमित ठाकरे- २२७१०

    शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर

    13:07 (IST) 23 Nov 2024

    भांडुप पश्चिम (अकरावी फेरी)

    रमेश कोरगावकर आघाडीवर ४९५

    अशोक पाटील पिछाडीवर

    अशोक पाटील (शिंदे गट) – ३९५१६

    रमेश कोरगावकर-(ठाकरे गट) – ४००११

    शिरीष सावंत (मनसे) – ११९४७

    13:07 (IST) 23 Nov 2024

    अणुशक्ती नगर (सतरावी फेरी)

    सना मलिक (अजित पवार राष्ट्रवादी पक्ष)- ४३०१२ ( -१६२)

    फहाद अहमद (शरद चंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष) – ४३१७४ (+ १६२)

    फहाद अहमद आघाडीवर

    13:06 (IST) 23 Nov 2024

    विक्रोळी विधानसभा (चौदावी फेरी)

    सुनील राऊत आघाडीवर

    १) विश्वजित ढोलम – १५५८०

    २) सुनील राऊत – ५७८०२

    ३) सुवर्णा करंजे – ४१६८८

    13:01 (IST) 23 Nov 2024

    वरळी विधानसभा (दहावी फेरी)

    आदित्य ठाकरे (ठाकरे गट) ३७ हजार ५८८ मते

    मिलिंद देवरा (शिंदे गट) ३३ हजार ७३६ मते

    संदीप देशपांडे (मनसे) १३ हजार ७२४ मते

    आदित्य ठाकरे ३ हजार ८५२ मतांची आघाडी