T20 World Cup 2024 Highlights, India Won Against Pakistan: टी-२० विश्वचषक २०२४ चा १९ वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांमधील हा सामना खूपच नीचांकी धावसंख्येचा आणि रोमांचक होता. ज्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ धावांनी विजय मिळवला. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा ७ वा विजय आहे. तर पाकिस्तान संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत भारताला एकदाच पराभूत करू शकला आहे. भारतीय गोलंदाजांनी करिष्माई कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित सेनेला केवळ ११९ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला ७ बाद ११३ धावाच करता आल्या. या विजयात हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ यांनी मोलाचे योगदान दिले.

Live Updates

T20 World Cup 2024, IND vs PAK Match Highlights  : टी-२० विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट विक्रम राहिला आहे. २००७ पासून या स्पर्धेत दोन्ही संघ आठ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने सात वेळा तर पाकिस्तान संघाने एकदा विजय मिळवला आहे.

21:13 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : पाऊस थांबला, लवकरच पुन्हा सामना सुरू होईल

न्यूयॉर्कमध्ये पाऊस पूर्णपणे थांबला आहे. आता सूर्यही बाहेर आला आहे. अशा स्थितीत सामना लवकरच सुरू होऊ शकतो. पावसापूर्वी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शाहीन आफ्रिदीने पहिले षटक टाकले, ज्यामध्ये एका षटकारासह एकूण आठ धावा आल्या.

21:05 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : सामन्यात पुन्हा पावसाचा अडथळा

एक ओव्हर खेळल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच षटकात रोहितने लेग साइडवर शानदार षटकार ठोकला. एका षटकानंतर भारताची धावसंख्या एकही विकेट न गमावता आठ धावा आहे. पावसामुळे नाणेफेकीला अर्धा तास उशीर झाला. त्यानंतर 8.30 वाजता सामना सुरू करण्याची तयारी सुरू होती. मात्र, नाणेफेक झाल्यानंतर पुन्हा पाऊस झाला आणि सामना रात्री 8.50 वाजता सुरू झाला. आता एका षटकानंतर पुन्हा पाऊस पडला आणि सामना थांबवण्यात आला. खूप मुसळधार पाऊस पडत आहे. खेळपट्टी कव्हर्सने झाकलेली आहे.

20:57 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : एका षटकानंतर पावसाला पुन्हा सुरूवात

पहिले षटक झाल्यानंतर पावसाला पुन्हा सुरूवात झाली आहे. पावसाच्या हजेरीमुळे पुन्हा सामना थांबवण्यात आला आहे. पहिल्या षटकात रोहित शर्माने आफ्रिदीच्या तिसऱ्या चेंडूवर एक दणदणीत षटकार खेचला. यासह भारताने पहिल्या षटकात ८ धावा केल्या आहेत.

20:51 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : सामन्याला सुरूवात

भारत पाकिस्तानमधील हायव्होल्टेज लढतीला सुरूवात झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामी जोडी मैदानात उतरली असून पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीच्या हाती नवा गोलंदाज आहे.

20:43 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात दाखल

भारत विरूद्ध पाकिस्तान सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तत्त्पूर्वी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर आले आहेत.

20:38 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : सामना कधी सुरू होणार नवीन अपडेट

खेळपट्टीवर पुन्हा कव्हर्स टाकल्याने ८.३० ला सुरू होणारा सामना आता ८.५० ला सुरू होणार आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकल्याने संघ प्रथम गोलंदाजी करेल. तर भारताकडून रोहित शर्मा विराट कोहलीची जोडी मैदानात उतरणार आहे.

20:21 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : पुन्हा खेळपट्टी झाकण्यात आली, सामना सुरु होण्यास होणार विलंब

खेळपट्टी पुन्हा झाकली

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियममध्ये सध्या पाऊस पडत नाही, परंतु खेळपट्टी कव्हरने झाकली गेली आहे. ढगाळ वातावरण असून वेगवान गोलंदाजांना खूप मदत मिळू शकते. सामना साडेआठ वाजता सुरू होणार आहे. सामना वेळेवर सुरू होतो की नाही हे पाहणे बाकी आहे.

20:11 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

पाकिस्तानः मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद आमिर.

20:08 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा घेतला निर्णय

पाकिस्तानने नाणेफेक जिंकली

पाकिस्तानने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाबर म्हणाला की ढगाळ स्थिती आहे आणि त्याचे चार वेगवान गोलंदाज त्याचा फायदा घेऊ इच्छितात. कर्णधार बाबरने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. इमाद वसीम परतला आहे. आझम खान यांना वगळण्यात आले आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता असे सांगितले. रोहितने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

20:00 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : नाणेफेक रात्री ८ वाजता होईल

भारत-पाकिस्तान यांच्यातील महान सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि त्यामुळे नाणेफेक लांबणीवर पडली. सध्या पंचांनी मैदानावरील कर्मचाऱ्यांशी बोलून नवीन अपडेट दिले आहेत. आता नाणेफेक रात्री 8 वाजता होणार आहे. सामना रात्री 8.30 वाजता सुरू होईल. म्हणजेच सामना अर्धा तास उशिराने सुरू होईल. षटकांमध्ये कोणतीही कपात केलेली नाही.

https://twitter.com/Liverpool_XT/status/1799810786153677274

19:51 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK :खराब हवामान, ढगाळ वातावरणामुळे आठला होणार नाणेफेक

न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटीमध्ये नाणेफेकीपूर्वी पाऊस पडलायला सरुवात झाल्याने नाणेफेकीला विलंब झाला आहे. सध्या मैदानावर ढग दाटून आले आहेत. ओ मात्र, आता पाऊस थांबला आहे. खेळपट्टी अजूनही कव्हर्सने झाकलेली आहे. पंचांनी रोहित आणि बाबरशी बराच वेळ चर्चा केली. साडेआठ वाजता नाणेफेकीसाठी पंच पुन्हा खेळपट्टीची पाहणी करतील.

19:46 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : ख्रिस गेलने आपल्या जॅकेटने जिंकली भारत-पाकिस्तानची मनं

ख्रिस गेल भारत-पाक सामन्यासाठी एक खास जॅकेट घालून आला आहे. ज्यामुळे भारतीयासंह पाकिस्तानी चांहत्यांची मन जिंकली आहेत. त्याच्या जॅकेटवर एका बाजूल केशरी तर दुसऱ्या बाजून हिरवा रंग आहे. ज्यामुळे तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचा फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो दोन्ही संघाच्या खेळाडूंची सही घेतोय.

https://twitter.com/Sami_ullah_1234/status/1799806654227349562

19:32 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : भारत-पाक सामन्यावर संकटाचे ढग, पावसामुळे नाणेफेकीला होणार उशीर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर संकटाचे ढग दाटले आहेत. पावसामुळे या मोठ्या सामन्याच्या नाणेफेकीला विलंब होत आहे. आत्तापर्यंत, खेळपट्टी झाकली गेली आहे. न्यूयॉर्कमध्ये सात वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.

18:59 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात नाणेफेकीचा कौल ठरणार निर्णायक

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले गेले आहेत. भारताने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध ७ पैकी ६ सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. २००७ नंतर पासून टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ५ सामने खेळले गेले आहेत. २००९ आणि २०१० मध्ये दोघांमध्ये एकही सामना झाला नव्हता. २०१२ च्या टी-२० विश्वचषकापासून आतापर्यंत भारताने पाकिस्तानविरुद्ध ४ सामने लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकले आहेत. त्याचबरोबर २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने एका सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

18:54 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : खेळपट्टीबद्दल काय म्हणाला वकार युनूस?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची नाणेफेक 7.30 वाजता होणार आहे. सामन्यापूर्वी टीव्हीवरील प्री-मॅच शो दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस म्हणाला की खेळपट्टीवर भरपूर उसळी पाहायला मिळते. अशा स्थितीत येथे फलंदाजी करणे फार कठीण जाईल.

18:39 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : टॉसच्या वेळी पडू शकतो पाऊस

चाहत्यांसाठी एक वाईट अपडेट समोर आली आहे. न्यूयॉर्कमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. अहवालानुसार, भारत-पाक सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सामना उशिरा सुरू होऊ शकतो.

18:20 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : आझम खान खेळणार नाही?

भारताविरुद्धच्या सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज आझम खान खेळणार नाही. वास्तविक, या शानदार सामन्यापूर्वी तो फलंदाजीचा सराव करताना दिसला नसल्याचे बोलले जात आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, शनिवारी पाकिस्तानच्या सराव सत्रादरम्यान आझम खानला बाहेक ठेवण्यात आले होते. या खेळाडूने फलंदाजीचा सराव केला नाही. अशा स्थितीत आझम भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचे मानले जात आहे.

18:12 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : २०२२ च्या शेवटच्या टी-२० विश्वचषकापासून भारतीय संघात किती बदल झाला?

ऑस्ट्रेलियात अखेरच्या टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळालेल्या सात चेहऱ्यांना यावेळी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. गेल्या वेळी ऋषभ पंतसोबत यष्टीरक्षक म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या दिनेश कार्तिक आणि केएल राहुलचा यावेळी संघात समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे भारतीय संघात चार फिरकीपटूंना संधी मिळाली असली तरी संघाचा सर्वात अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरला आहे. राहुलप्रमाणेच अश्विनही मागच्या वेळी संघाचा भाग होता. राहुल आणि अश्विन व्यतिरिक्त दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि मोहम्मद शमी या खेळाडूंचा समावेश होता, ज्यांना यावेळी संधी मिळाली नाही. हे पाच खेळाडू 2024 च्या टी-20 विश्वचषक संघाचा भाग होते.

17:59 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : भारत पाकिस्तान ५९६ दिवसांनंतर आमनेसामने

भारत आणि पाकिस्तान 596 दिवसांनी टी-20 फॉरमॅटमध्ये आमनेसामने येणार आहेत. 23 ऑक्टोबर 2022 रोजी या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांची शेवटची भेट झाली होती. T20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाने मेलबर्नमध्ये खेळलेला हा सामना चार गडी राखून जिंकला होता. तथापि, यानंतर, 2023 मध्ये दोन्ही संघांमध्ये तीन सामने झाले, परंतु तिन्ही सामने एकदिवसीय स्वरूपाचे होते. आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ दोनदा आमनेसामने आले होते, तर एकदा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत. भारताने दोन सामने जिंकले होते, तर आशिया चषकातील एक सामना अनिर्णित राहिला होता.

17:30 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : सामन्यात पाऊस खलनायक ठरणार? हवामान कसे असेल ते जाणून घ्या

Accuweather च्या अहवालानुसार, न्यूयॉर्कमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 ते दुपारी 2 दरम्यान हवामान चांगले राहील. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यावेळी तापमान 17-25 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पावसाची केवळ पाच टक्के शक्यता आहे. या विश्वचषकात आतापर्यंत पावसामुळे काही सामन्यांवर परिणाम झाला आहे. काही सामने उशिरा सुरू झाले. यासोबतच इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील बार्बाडोसमध्ये 5 जूनला झालेला सामना पावसामुळेरद्द झाला होता.

17:05 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : सामन्यात नाणेफेकीचा कौल ठरणार निर्णायक, काय आहे कारण जाणून घ्या इतिहास?

टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये रविवारी ९ जून रोजी भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. टी-२० विश्वचषकात भारताचा पाकिस्तान संघावर वरचष्मा राहिला आहे. मात्र, या सामन्यात नाणेफेक मोठी भूमिका बजावू शकते. जर आपण रेकॉर्डवर नजर टाकली तर, २००७ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सर्व टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. अशा प्रकारे भारत-पाक सामन्यात नाणेफेक निर्णायक ठरणार आहे.

T20 World Cup 2024 : IND vs PAK सामन्यात नाणेफेकीचा कौल ठरणार निर्णायक, काय आहे कारण जाणून घ्या इतिहास?
16:49 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : भारत पाकिस्तान सामन्यात खेळपट्टी कशी असेल?

टी-२० विश्वचषक २०२४ मधील खेळपट्टीची सर्वाधिक चर्चा होत आहे. नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये ‘ड्रॉप इन पिच’ या खेळपट्ट्यांचा वापर करण्यात आला आहे. येथे भारत आणि आयर्लंड यांच्यात सामना झाला आहे. यापूर्वी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ येथे खेळले होते. खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच अवघड आहे. फलंदाज जखमी होत आहेत. वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येते. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यातही असेच काही घडू शकते.

https://twitter.com/Shashank18_71/status/1799633513026883889

16:30 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : २००७ नंतरच्या टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तानची कामगिरी

टी-२० विश्वचषक २०१२ स्पर्धेत भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला होता. यानंतर, २०१४ च्या टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले होते, जिथे भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला होता. २०१६ च्या टी-२० विश्वचषकात भारताने धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला होता. यानंतर २०२१ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने एकमेव सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. यानंतर २०२२ च्या टी-२० विश्वचषकात भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला.

16:04 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : दोन्ही संघांचा २००७ नंतरचा टी-२० विश्वचषकातील रेकॉर्ड

भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० विश्वचषक सामन्यांचे निकाल (२००७ नंतर पासून)

१. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०१२ टी-२० विश्वचषक – भारत ८ विकेट्सनी विजयी
२. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०१४ टी-२० विश्वचषक – भारत ७ विकेट्सनी विजयी
३. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०१६ टी-२० विश्वचषक – भारत ६ विकेट्सनी विजयी
४. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०२१ टी-२० विश्वचषक – पाकिस्तान १० विकेट्सनी विजयी
५. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०२२ टी-२० विश्वचषक – भारत ४ विकेट्सनी विजयी

15:39 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान/सॅम अयुब, फखर जमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर, हरिस रौफ.

15:34 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेटमधील हेड टू हेड रेकॉर्ड

२००७ पासून या स्पर्धेत दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने सहा वेळा तर पाकिस्तान संघाने एकदा विजय मिळवला आहे. त्याच वेळी, एकूण टी-२० मध्ये दोन्ही संघांमध्ये १२ सामने झाले आहेत. भारताने आठ वेळा तर पाकिस्तानने तीन वेळा विजय मिळवला आहे. २००७ मध्ये, एक सामना टाय झाला होता, जो टीम इंडियाने बाउल आउटमध्ये जिंकला होता. म्हणजेच टीम इंडियाने एकूण १२ पैकी नऊ जिंकले आहेत. २०२२ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ शेवटच्या वेळी टी-२० मध्ये आमनेसामने आले होते आणि त्यानंतर मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला होता.

India Won by 6 Runs against Pakistan Highlights : न्यूयॉर्कच्या नासाऊ इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी करिष्माई कामगिरी करत टीम इंडियाला ६ धावांनी विजय मिळवून दिला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित सेनेला केवळ ११९ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला ७ बाद ११३ धावाच करता आल्या