माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर देशमुखांवर झालेली कारवाई आणि देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपामुळे राज्याच राजकारण ढवळून निघालं होतं. अनिल देशमुख हे १४ महिने तुरुंगात असताना काय घडलं? आपल्या विरोधात कशा पद्धतीने षड्‌यंत्र रचण्यात आलं? याबाबत आता देशमुखांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐन विधानसभेच्या निवडणुकीत अनिल देशमुख यांनी त्यांच्या ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ या पुस्तकाचे काही पानं एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत केले आहेत. अनिल देशमुख यांनी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ असं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. त्यांचं हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती सांगितली जाते. मात्र, त्याआधी अनिल देशमुख यांनी त्या पुस्तकातील काही महत्वाचे पेजेस शेअर करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस, पार्थ पवार, आदित्य ठाकरे, दिशा सलियान प्रकरण यासह आदी प्रकरणासंदर्भात या पुस्तकात उल्लेख करत केलेल्या आरोपामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत महायुतीत दोन गट! शिंदे-फडणवीस-पवार काय निर्णय घेणार? उदय सामंत म्हणाले…

अनिल देशमुख यांनी काय खुलासे केले?

अनिल देशमुख यांनी त्यांच्या एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “बंद दरवाज्यांच्या आडून खेळला गेलेला कपटी राजकीय डाव, देवेंद्र फडणवीसांच्या दुताने त्यांच्याशी काय बोलणं करून दिल? फडणवीसांनी नेमकी कोणती ऑफर टाकली होती? नक्की त्यांचा प्लॅन काय होता? शरद पवारांना का वाटलं की सरकार २४ तासांत कोसळेल?”, अशा अनेक प्रश्न करत पुस्तकात खुलासा केला आहे.

पार्थ पवारांबाबतही धक्कादायक खुलासा

“अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं काय होणार होतं? भाजपाला त्यांना कसं अडकवायच होतं? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध कोणता कपटी डाव रचला गेला?”, यासंदर्भात अनिल देशमुख यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच या पुस्तकातील नवव्या प्रकरणात करण्यात आलेले खुलासे मी तुमच्यासमोर शेअर करत आहे”, असं अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

देशमुखांनी कशासंदर्भात खुलासे केले आहेत?

अनिल देशमुख यांनी त्यांचं ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’, असं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचं कव्हर पेज आता समोर आलं असून हे पुस्तक लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, या पुस्तकामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आदित्य ठाकरे, पार्थ पवार, ईडी, दिशा सलियान प्रकरण, आपल्या कुटुंबाला कसा त्रास देण्यात आला? कोणी आणि कसे षडयंत्र रचले?, याबाबत त्यांनी पुस्तकात खुलासे केले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former home minister anil deshmukh book on devendra fadnavis aditya thackeray parth pawar shocking revelations gkt