Analysis of Maharashtra Municipal Elections : ‘मिनी विधानसभा’ म्हणून उल्लेख करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी नगरपालिकांच्या निवडणुका अखेरजाहीर झाल्या. राज्यातील सत्ताधारी पक्ष साधारणपणे पालिकांच्या निवडणुकांमध्ये बाजी मारतो हा पूर्व इतिहास लक्षात घेता महायुतीला अधिक संधी असली तरी नैसर्गिक आपत्ती, पुरामुळे झालेले नुकसान, सरकारमधील अंतर्गत हेवेदावे, तीन पक्षांमधील कुरघोडीचे राजकारण हे मुद्दे महायुतीसाठी आव्हानात्मक ठरूशकतात. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे खचलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पालिका निवडणुकांमध्ये ‘धनशक्ती’ हा घटक निर्णायक ठरत असल्याने त्यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पार पाडत आहेत. तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्यातील सुमारे १० कोटी मतदारांपैकी एक कोटी मतदारनगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाचा हक्कबजाविणार आहेत.
एकूण ६८५९ जागांसाठी निवडणूक होईल. त्यात २८८ नगराध्यक्षपदांसाठी थेट निवडणूकहोईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकेच्या निवडणुका या नागरी प्रश्नांवर पूर्वी लढविल्या जात असत. अनेकदा राजकीय पक्ष सहभागी होत नसत.स्थानिक आघाड्यांच्या मार्फतच या निवडणुका स्थानिक नेते लढवित. पण गेल्या १० ते १५ वर्षांत राजकारणाचा सारा पोत बदलला. आता राजकीय पक्षांच्या चिन्हांवरच नगरपालिकांच्या निवडणुका लढविल्या जाऊ लागल्या.
राज्यात १९८० ते २००० या काळात काँग्रेस, शिवसेना, भाजप, जनता दल, शेकाप हे मुख्य पक्ष अस्तित्वात होते. शरद पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस तर राज ठाकरे यांच्या बंडानंतर मनसेची स्थापना झाली. राष्ट्रवादीने स्थापनेपासूनच राज्याच्या राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले. या तुलनेत मनसेला २००९च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता फारकाही लक्षणिय कामगिरी करता आलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्या २०२२ मधील बंडानंतर राज्याच्या राजकारणाची सारी समीकरणेच बदलली. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे चार मुख्य पक्ष आधी होते. जून २०२२ मधील शिवसेनेतील फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलली.
शिवसेना ठाकरे आणि शिंदे तसेच जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार असे दोन नवीन पक्ष उदयाला आले. २०२१-२२ मध्ये काही जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडलेल्या नाहीत. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतर महानगरपालिका, नगरपालिका आणिजिल्हा परिषदांच्या निवडणुका पहिल्यांदाच पार पडत आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा कोणत्या पक्षाची किती ताकद याचाअंदाज आला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने राज्यातील ४८ पैकी ३० जागा जिंकून भाजपला मोठा धक्का दिला होता.२०१४ पासून कायम सर्व निवडणुकांमध्ये पहिल्या क्रमांकावरअसलेल्या भाजपची चांगलीच पिछेहाट झाली होती. काँग्रेसने राज्यात सर्वाधिक १३ जागा जिंकल्या होत्या. भाजपला नऊ जागांवरच समाधान मानावे लागलेहोते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र चमत्कार झाला.महायुतीने विक्रमी २३२ जागा जिकंल्या. विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभराने पहिल्यांदा राजकीय पक्षांना आपल्या ताकदीचा अंदाज येणार आहे.
Maharashtra Municipal Elections 2025 : ठाकरे बंधू एकत्र येण्याचा फटका कोणाला ?
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकही अनेक अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर होणाऱ्या या निवडणुकीत मुंबईतील चित्र कसे असेल याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती फटका बसतो याचेच अंदाज बांधले जात आहेत. राष्ट्रवादीच्या पवार काका- पुतण्यात कोण बाजी मारतो हे सुद्धातेवढेच महत्त्वाचे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे जास्त खासदार निवडून आले होते. अजित पवारांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून आला होता. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळाले तर शरद पवार गटाचा पार धुव्वा उडाला होता. नगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंच्या एकीचातेवढा परिणाम जाणवणार नाही.
Maharashtra Municipal Elections 2025 : भाजपसाठी आव्हान
राज्यात २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून भाजपने पहिला क्रमांक कायम ठेवलाआहे. अपवाद फक्त २०२४च्या लोकसभा निवडणुकीचा. तेव्हा काँग्रेसचे सर्वाधिक १३ खासदार निवडून आलेहोते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा घवघवीत यश मिळविले. भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. नगरपालिका निवडणुकीतच पिछेहाट झाल्यास आगामी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या व पुढे २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये त्याचा फटका बसू शकतो. यामुळेच पहिला क्रमांक कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असेल.
Maharashtra Municipal Elections 2025 : धनशक्तीचा परिणाम ?
पालिका निवडणुका यापूर्वी स्थानिक प्रश्नांवर होत असत. पुढे त्या पक्षीय पातळीवर लढविल्या जाऊ लागल्या.कालांतराने राजकीय नेत्यांनी मतांसाठी मतदारांना विविध आमिषे दाखविण्यास सुरुवात केली. यातून धनशक्तीचा मोठापरिणाम जाणवू लागला. निवडणुका जिंकण्यासाठी पैशांचा मोठ्याप्रमाणावर वापर सुरू झाला. यामुळेच नगरपालिका निवडणुकांमध्ये धनशक्तीहा मोठा आणि निर्णायक घटक असूशकतो.
Maharashtra Municipal Elections 2025 : २०१४ ते २०१८ या काळात झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील पक्षीय संख्याबळ :
एकूण जागा : ७४९३
- भाजप : १९४४
- काँग्रेस : १५७७
- राष्ट्रवादी : १२९४
- शिवसेना : १०३५
- अपक्ष : ८५२
- छोटे पक्ष, स्थानिक आघाड्या : ५८१
(संदर्भ : राज्य निवडणूक आयोग आकडेवारी)
