Maharashtra Politics Highlights , 08 August 2025 : लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २५ जागा केवळ ३३ हजारांच्या मताधिक्याने जिंकल्या आणि या जागांमुळेच मोदी सत्तेवर टिकून राहिले, अशी टीका त्यांनी केली. यासाठी त्यांनी एका मतदारसंघातील मतदारांसी माहिती गोळा करून कथित पुरावे देखील सादर केले आहेत. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या प्रतिक्रियांवर आपलं लक्ष असेल.
इंडिया आघाडी आता निवडणूक आयोगाच्या मुख्यायलयावर मोर्चा नेणार आहे. तर, आयोगाने राहुल गांधी यांना भेटीचं निमंत्रण दिलं आहे. दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरही आपलं लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्राजंल खेवलकर यांच्या महिला आयोगाने गंभीर आरोप केले आहेत. चित्रपटात काम देण्याचं अमिष दाखवूम मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आयोगाने केला आहे. यासह राज्यासह देशातील इतर राजकीय घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Mumbai Maharashtra Breaking News Live Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय व समाजिक बातम्यांचा आढावा वाचा एकाच क्लिकवर.
ऊस वाहतूकदाराची फसवणूक; तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा
नवी मुंबई पोलीस दलात चाललंय तरी काय… महिन्याभरात ५ पोलीसांचा विविध कारणांमुळे मृत्यू
पनवेल : कळंबोलीत १५ वर्षानंतर लोखंड बाजारातील रस्त्याला मोकळा श्वास
पीएमपीच्या जागांवर मॉल, रुग्णालयाची उभारणी?
“मी जेवायला येईन, माझं बिल घेऊ नका”, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी, म्हणाले, “दिवाळं…”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी एका हॉटेलचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांचा मिश्किल अंदाज पाहायला मिळाला. हॉटेल मालक अजित पवारांना नाष्ता करण्यची विनंती करत होते. परंतु, त्यांनी नकार दिला आणि सांगितलं की पुढच्या वेळी आलो की जेवून जाईन. अजित पवार म्हणाले, “मी तुम्हा सर्वांचा फार वेळ घेणार नही. परंतु, हणमंतराव मला म्हणाले, दादा थोडं बसा, नाश्ता करून जा. मी त्यांना म्हटलं आत्ता वेळ नाहीये. पुन्हा कधीतरी जेवायला येईन. तेव्हा माझं बिल घेऊ नका. मित्रांनो हा गमतीचा भाग झाला. परंतु, तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असला तरी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा आणि व्यवसाय व्यवसायाप्रमाणे करा. कोणीही आलं तरी त्याच्याकडून पैसे घ्या. हा जवळचा माणूस, हा साहेबांचा माणूस, सभापती आला, उपसभापती आला, आमका आला तमका आला असं करत बसू नका. नाही तर दिवाळं निघेल. हॉटेल बंद करण्याची वेळ येईल.”
दर पाचवा भारतीय रक्तदाबाच्या विळख्यात! ‘हाय ब्लड प्रेशर’चा सायलेंट स्फोट, आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान…
तंत्रज्ञानाचे नवे अभ्यासक्रम ‘डाएट’मध्ये… काय आहे वेगळेपण?
“काँग्रेसच्या बैठकीत उद्धव व आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत”, फोटो शेअर करत भाजपाचा चिमटा
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, “भाजपासोबत उध्दव ठाकरे होते, किती सन्मान होता मातोश्री व उध्दव ठाकरे यांना… देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्री वर जाऊन सन्मान करीत. २०१९ लोकसभा निवडणूकीच्या वेळी अमित शाह मातोश्रीवर आले होते.”
“आता २०१५ मध्ये पाहा, महाविकास आघाडीत आल्या पासून राहूल गांधी, सोनिया गांधी कुणी मातोश्रीवर गेले? उत्तर नाही.”
“बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आंदरांजली वाहण्यास कुणी कॅाग्रेस नेता गेला? उत्तर नाही”
“बाळासाहेब ठाकरे यांचा कॅाग्रेसने हिंदुह्दयसम्राट असा उल्लेख केला? उत्तर नाही”
“दरवर्षी आता उध्दव ठाकरेच दिल्लीत राहुल सोनिया गांधींना भेटायला जातात.”
“हिंदुत्व सोडल
विचारधारा सोडली त्यातून
मान गेला
सन्मान गेला
हातात पडलं काय तर
आता तर काय बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग…”