Maharashtra News Highlights: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीतील घटकपक्ष आणि त्यांच्या जोडीला यंदा राज ठाकरे आल्याचे दिसते. राज्यातील प्रमुख शहरात ९६ लाख बोगस मतदार निर्माण केल्याचा राज ठाकरे यांनी रविवारी (१९ ऑक्टोबर) केला. जोवर मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत, तोवर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होऊ देणार नाही, अशा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

१ नोव्हेंबर रोजी विरोधकांनी या मुद्द्यावर मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. तर सत्ताधारी भाजपा, शिवसेना (शिंदे) पक्षाकडून ठाकरे बंधूंच्या मनोमिलन आणि विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली जात आहे.

दुसरीकडे पुण्यातील जैन मंदिराच्या जमीन व्यवहाराचा मुद्दा तापला आहे. शिवसेनेचे (शिंदे) नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात विद्यमान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टिकास्र सोडले आहे.

Live Updates

Maharashtra Marathi News Live Updates | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

11:55 (IST) 20 Oct 2025

लक्ष्मीपूजनानिमित्त नवी मुंबई एपीएमसी परिसर झेंडूच्या फुलांनी बहरला; पावसामुळे उत्पादन घटले, तरी बाजारात मागणी कायम

धार्मिक आणि पारंपरिक दृष्ट्या झेंडू फुलांना विशेष महत्त्व असल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी होत आहे. …सविस्तर वाचा
11:55 (IST) 20 Oct 2025

“शिवसेना, मित्र पक्षांना संपवायचं, ही भाजपची पॉलिसी…”, पाचोऱ्याच्या आमदाराचा आरोप !

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती होते, तशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये का नाही ? असा प्रश्न शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. …सविस्तर बातमी
11:54 (IST) 20 Oct 2025

प्रकाश लोंढे, दीपक लोंढेची दिवाळी पोलीस कोठडीतच

सातपुर येथील हॉटेलमधील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक आणि अन्य नऊ गुन्हेगारांना ताब्यात घेतले …अधिक वाचा
11:53 (IST) 20 Oct 2025

माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांचे निधन, गोंदिया जिल्हा निर्मितीचे खरे शिल्पकार…

२६ जानेवारी १९९९ रोजी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिवणकर यांनी गोंदिया जिल्ह्याची घोषणा केली आणि १ मे १९९९ रोजी गोंदिया जिल्हा अस्तित्वात आणून कार्यभार सुरू केला. …अधिक वाचा
11:53 (IST) 20 Oct 2025

सत्ताकेंद्रे ग्रामीण भागात, एकही पक्षाचा जिल्हाध्यक्ष जिल्हा मुख्यालयी नाही; म्हणून आता…

एक तपापूर्वी प्रमुख राजकीय पक्षाचे जिल्हा सूत्रधार म्हणजे जिल्हाध्यक्ष हे जिल्हा मुख्यालयी म्हणजे वर्धा निवासी असायचे. …सविस्तर वाचा
11:52 (IST) 20 Oct 2025

Video: वाघ आधी माघारी फिरला, नंतर दुचाकीस्वारावर झेपावला…. ताडोबा बफर झोनमधील थरार…

चंद्रपूर – मूल मार्गावर मुख्य रस्त्यावर वाघाने एका मोटारसायकलस्वारावर हल्ला केला. या हल्ल्यात सुदैवाने मोटारसायकलस्वार बचावला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. …सविस्तर बातमी
11:51 (IST) 20 Oct 2025

समृद्धी महामार्गावर दिवाळीच्या गर्दीने गोंधळ; इंधन टंचाई, असुविधांमुळे प्रवासी हैराण

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) आता महामार्गावरील सर्व २२ पेट्रोल पंप चालकांना इंधनाचा भरपूर साठा ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, …सविस्तर वाचा
11:51 (IST) 20 Oct 2025

भूपती-सतीश ‘गद्दार’; त्यांना धडा शिकवा, नक्षल्यांच्या केंद्रीय समितीची पत्रकातून आगपाखड…

नक्षलवादी चळवळीला हादरा देणाऱ्या या अभूतपूर्व घटनेनंतर पहिल्यांदाच नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने चारपानी पत्रक जारी करून सोनू व सतीशला धडा शिकविण्याचे आवाहन केले आहे. …सविस्तर वाचा
11:51 (IST) 20 Oct 2025

‘एम्स’मध्ये निवासी डॉक्टरकडून प्राध्यापकाला मारहाण… वार्डात रुग्णांपुढेच…

अचानक मारहाण झाल्यामुळे सहयोगी प्राध्यापकांना कळलेच नाही. या मारहाण प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली. …वाचा सविस्तर
11:49 (IST) 20 Oct 2025

Maharashtra News Live Update: रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांबरोबर साजरी केली दिवाळी; पुण्यातील नेत्याचा स्तुत्य उपक्रम

सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव आहे. दिवाळी म्हंटले की, लहान मुलांचे प्रमुख आकर्षण असते. फटाके, नवीन कपडे, खाऊ… मात्र रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना दिवाळी काय असते हेच माहिती नसते. पुण्याचे माजी महापौर बाबा बागुल यांनी पुणे शहरात रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या गरजू मुला-मुलींसोबत आज दिवाळी साजरी केली. डेक्कन गुडलक चौक येथे मुलांना पाटावर बसवून, सुगंधी उटणे आणि साबण लावून गरम पाण्याने ‘अभ्यंगस्नान’ घालण्यात आले. या मुलांना दिवाळी फराळ, नवीन कपडे आणि फटाके देऊन या मुलांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

10:40 (IST) 20 Oct 2025

Maharashtra News Live Update: ‘नरकासुराचा जन्म गुवाहाटीला झाला आज एकनाथ शिंदेंची जयंती’, संजय राऊतांचा टोला

शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आज नरक चतुर्थी आहे. नरकासुराचा जन्म गुवाहाटीला झाला होता. राज्यातले जे नरकासूर आहेत, ते गुवाहाटीला जाऊन त्याची पूजा करतात. त्यांना बॉडी पेन होणारच. आमच्या पोटात-छातीत दुखत नाही. आज नरकासुराची म्हणजेच एकनाथ शिंदेंची जयंती आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

आज नरकासुराला आपण जसे पायाखाली चिरडतो, तसे महाराष्ट्रातील गद्दार नरकासुरांना जनता पायाखाली चिरडून टाकेल, असेही संजय राऊत म्हणाले.

10:34 (IST) 20 Oct 2025

Murlidhar Mohol : पुण्यात जैन मंदिर जमीन व्यवहाराचा मुद्दा तापला, रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ सामना; म्हणाले, “बडबड अर्धा तास, पण गडी…”

Ravindra Dhangekar accuses Murlidhar Mohol : रवींद्र धंगेकर म्हणाले, “मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत अर्धा तास बडबड केली. परंतु, एकदाही जैन मंदिर वाचलं पाहिजे असं म्हणाले नाहीत.” …अधिक वाचा
10:33 (IST) 20 Oct 2025

Maharashtra Voter List Controversy: सविस्तर: मतदारयाद्यांवरील आरोपांत तथ्य किती?

Maharashtra Local Body Election 2025: कोणत्याही निवडणूक प्रक्रियेतील पहिला टप्पा हा मतदार याद्यांचा असतो आणि सध्या या टप्प्याभोवतीच संशयाचे वर्तुळ निर्माण झाले आहे. …अधिक वाचा

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीनीच्या व्यवहारावरून रवींद्र धंगेकर व मुरलीधर मोहोळ आमनेसामने आले आहेत. (PC : Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol/FB)