Maharashtra Breaking News Updates, 17 October 2025: राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येही महत्त्वाची पदे आणि अधिक जागा मिळवण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे.

याचबरोबर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शहरांमध्ये खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. यासह राज्यातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

Live Updates

Maharashtra Marathi News Live Updates

11:35 (IST) 17 Oct 2025

एक सामान्य दूध व्यवसायिक ते मुरब्बी राजकारणी : शिवाजी कर्डिले

शिवाजी कर्डिले हे बुऱ्हाणनगरचे सरपंच आणि दोन वेळा आमदार राहिलेले, सतत लोकांमध्ये सक्रिय आणि अनुभवसंपन्न भाजप नेते होते. …सविस्तर बातमी
11:21 (IST) 17 Oct 2025

नक्षलवादाला सर्वात मोठा हादरा! गडचिरोलीनंतर आता छत्तीसगडमध्ये २०० हून अधिक नक्षल्यांचे महा-आत्मसमर्पण!

या घटनेमुळे मध्य भारतातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले असून, शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला मिळालेले हे आजवरचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक यश मानले जात आहे. …अधिक वाचा
11:20 (IST) 17 Oct 2025

पुण्यातील बड्या बिल्डरांचे ‘आरएमसी’ प्रकल्प कारवाई करूनही सुरूच कसे?

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वर्षी सुमारे ५० रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांवर कारवाई केली. हे प्रकल्प बंद करण्याची नोटीस बजाविण्यात आली. …अधिक वाचा
11:20 (IST) 17 Oct 2025

पुणे शहरातील भटक्या श्वानांना ‘मायक्रोचिप’ बसविण्यात येणार; पुणे महानगरपालिकेचा निर्णय

देशभरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.या भटक्या श्वानांनी नागरिकांना चावल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. …सविस्तर बातमी
11:18 (IST) 17 Oct 2025

५० दिवसांनंतर विरार इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या वारसांना मदत

२६ ऑगस्ट रोजी विरारच्या विजय नगर येथील वरील इमारत दुर्घटनेत १७ जणांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला व ९ जण गंभीर जखमी झाले होते. ऐन गणेशोत्सवात ही दुर्घटना घडल्याने राज्यात याचे पडसाद उमटले होते. …वाचा सविस्तर
11:18 (IST) 17 Oct 2025

मिरा रोड येथील दिवाणी व सत्र न्यायालयाला बेवारस वाहनांचा विळखा; ये जा करण्यास अडचणी

मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांच्याकडेला तसेच मोकळ्या जागांमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे धोरण महापालिकेने ठरवले आहे. यासाठी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. …अधिक वाचा
11:18 (IST) 17 Oct 2025

मिरा रोड येथील दिवाणी व सत्र न्यायालयाला बेवारस वाहनांचा विळखा; ये जा करण्यास अडचणी

मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांच्याकडेला तसेच मोकळ्या जागांमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे धोरण महापालिकेने ठरवले आहे. यासाठी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. …अधिक वाचा
11:18 (IST) 17 Oct 2025

मिरा रोड येथील दिवाणी व सत्र न्यायालयाला बेवारस वाहनांचा विळखा; ये जा करण्यास अडचणी

मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांच्याकडेला तसेच मोकळ्या जागांमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे धोरण महापालिकेने ठरवले आहे. यासाठी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. …अधिक वाचा
11:18 (IST) 17 Oct 2025

परभणी जिल्ह्यातल्या कोक गावात गॅस्ट्रोची साथ; १४० रुग्ण आजारी, गावकऱ्यात भीतीचे वातावरण

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. या प्रकरणात एकूण १३९ रुग्णांना ग्रामस्तरावर ओ.पी.डी. मध्ये उपचार देण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय, बोरी येथे ७७ रुग्ण दाखल करण्यात आले होते. …सविस्तर वाचा
11:17 (IST) 17 Oct 2025

औष्णिक वीज निर्मीती केंद्रातील अभियंता सुभाष राठोड यांना जबर मारहाण

अभियंता सुभाष राठोड यांना गाडीला कट मारण्याचे कारणावरून मारहाण झाल्याची तक्रार संभाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवली गेली असली तरी खरे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. …वाचा सविस्तर
11:17 (IST) 17 Oct 2025

​वेंगुर्ले तालुक्यातील रेडी सुगळभाट येथे सीआरझेड-१ मध्ये अवैध उत्खनन; प्रशासनाकडून मोजमाप, दंड आकारणीचे आश्वासन

श्री. भूषण बांदिवडेकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत, १६ ऑक्टोबर रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी, डीजीएम (DGM) कोल्हापूर यांचे प्रतिनिधी, तलाठी आणि पंच यांच्या पथकाने या जागेची पाहणी केली आणि उत्खननाचे मोजमाप घेतले, अशी त्यांनी माहिती दिली. …अधिक वाचा
11:17 (IST) 17 Oct 2025

बाजार समित्यांची सूत्रे थेट पणनमंत्र्यांकडे; ‘एपीएमसी’वरील सहकार विभागाचे नियंत्रण संपुष्टात

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतमालाच्या खरेदी-विक्रीची महत्त्वाची केंद्रे असली तरी, त्यांना मोठे राजकीय महत्त्वही आहे. …अधिक वाचा
11:16 (IST) 17 Oct 2025

सिडको महामंडळात ५० हजार तर पनवेल महापालिकेत ३२ हजार सानुग्रह अनुदान घोषित

पनवेल महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्यासमोर महापालिकेच्या म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव यांनी ४० हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव मांडला होता. …सविस्तर वाचा
11:15 (IST) 17 Oct 2025

Video : रबाळे एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत आग… आठ तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण

नवी मुंबई लगत ठाणे बेलापूर औदयोगिक वसाहत आहे. याच ठिकाणी रबाळे भागातील आर ९५२ भूखंडा वरील जेल फार्मा या कंपनीला आग लागली. …सविस्तर वाचा
11:06 (IST) 17 Oct 2025

Maharashtra News Live Update: रबाळे एमआयडीसी परिसरात भीषण आग

नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.