Mumbai Maharashtra Breaking News, Dahihandi 2023: राज्यात ठिकठिकाणी आज गोविंदांमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राजकीय वर्तुळात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापू लागला आहे. राज्य सरकारकडून कुणबी प्रमाणपत्राबाबत आश्वासन मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याचवेळी भारत की इंडिया या वादाचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटताना पाहायला मिळत आहेत.
Maharashtra Breaking News Live Today: महाराष्ट्रातील दहीहंडी व इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
घराच्या दारासमोर गांजाची झाडे लावल्याचा प्रकार पिंगळेनिळख येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी एकाला अटक अटक केली असून दारासमोरील मोकळ्या जागेतून एक लाख ९६ हजार ९३० रुपये किमतीची १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची दोन झाडे जप्त करण्यात आली आहेत.
पुण्यातील पिंपरी परिसरात १७६ चौरस मीटर क्षेत्रफळाचा ३ बीएचके टेरेस फ्लॅट बाजारभावापेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीद्वारे उपलब्ध झाली आहे.
वाशीम जिल्हा परिषदेत विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) आरोग्य सेविका ( महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, वरीष्ठ सहाय्यक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक उच्च श्रेणी, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा विवधि २४२ पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई-ठाणे व आसपासच्या तब्बल ३१ दहीहंडी उत्सव ठिकाणांना भेटी देणार आहेत!
कल्याण: रस्ते वाहतुकीवरील वाहनांचा, प्रवासी भार कमी करण्यासाठी, दळणवळणाचे झटपट साधन म्हणून केंद्र शासनाने मुंबई-अहमदाबाद द्रृतगती रेल्वे मार्गाच्या उभारणीचे नियोजन केले आहे.
नागपूर : मराठा आणि कुणबी समाजासाठी असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) परदेशी शिष्यवृत्तीसाठी केवळ ८२ अर्ज प्राप्त झाले आहेत. सारथीतर्फे ७५ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले जाणार आहे. दुसरीकडे ओबीसी प्रवर्गातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले. मात्र, त्यांच्यापैकी केवळ ५० विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना मुहूर्त मिळत नसल्याने जिल्ह्यातील भाजप आमदारांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचाच हा भाग असल्याचे मानले जाते.
आज सर्वत्र दहीहंडी या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा हजेरी लावत गोविंदांच्या उत्साहात भर घातली आहे. नवी मुंबईत दरवर्षी कुतूहल निर्माण करणारी हंडी आयोजित केली जाते. यंदा सानपाडा येथील सोन्याच्या दहीहंडीने लक्ष वेधून घेतले आहे. तर ऐरोली येथील सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनची दही हंडी सर्वांचे आकर्षण बनली आहे.
हिंदूंच्या 'कृष्णजन्माष्टमी' निमित्त साजरा होणाऱ्या 'दहिहंडी' या मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला गेला होता तेव्हा एक 'राज'गर्जना झाली… मराठी मनगटं एकवटली, निकराने लढली आणि महाराष्ट्राचा 'दहीहंडी' सण टिकला…! – मनसे
हिंदूंच्या 'कृष्णजन्माष्टमी' निमित्त साजरा होणाऱ्या 'दहिहंडी' या मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला गेला होता तेव्हा एक 'राज'गर्जना झाली… मराठी मनगटं एकवटली, निकराने लढली आणि महाराष्ट्राचा 'दहीहंडी' सण टिकला…! #हिंदूजनांसाठी #मराठीमनांसाठी #दहीहंडी #राजठाकरे #महाराष्ट्रधर्म pic.twitter.com/wZT6xENAon
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 6, 2023
नागपूर : राज्यातून गेले अनेक दिवस बेपत्ता झालेला मान्सून आता पुन्हा परतला आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वर्धा : शालेय शिक्षण विभागाची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उमेदवारांना नोंदणी करतानाच स्वप्रमाणपत्र भरायचे आहे. पण हे करीत असताना एखादी चूक चांगलीच महागात पडू शकते. म्हणून विभागाने काही खबरदारी सुचविली आहे. ‘महा टीचर रिकृटमेंट’ या संकेतस्थळावर नोंदणी केल्याशिवाय भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत १४ व्या हप्त्याचे वितरण नुकतेच करण्यात आले आहे. अद्यापही २२ हजारहून अधिक लाभार्थ्यांचे ‘ई- केवायसी’ पूर्ण नसल्याने त्यांना लाभ मिळू शकला नाही. नोंदी अद्ययावत करणे लाभार्थ्यांना बंधनकारक आहे.
ठाणे: महानगर कंपनीच्या गॅस पुरवठा वाहिनीत बिघाड झाल्याने गुरुवार सकाळी ८ वाजल्यापासून कोपरी आणि मुलुंड परिसरातील २० हजार ग्राहकांचा गॅस पुरवठा ठप्प झाला आहे.
ठाणे: महानगर कंपनीच्या गॅस पुरवठा वाहिनीत बिघाड झाल्याने गुरुवार सकाळी ८ वाजल्यापासून कोपरी आणि मुलुंड परिसरातील २० हजार ग्राहकांचा गॅस पुरवठा ठप्प झाला आहे.
उरण: गुरूवारी सकाळी ७ वाजल्या पासून उरण शहर आणि तालुक्यात महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आमच्या कुणाकडेच वंशावळीचे दस्तऐवज नाहीत. त्यामुळे आम्हाला त्या निर्णयाचा एक टक्काही फायदा होणार नाही. दुसरा मुद्दा, वंशावळीचे पुरावे असतील, तर आम्ही कार्यालयातून स्वत: त्याचे प्रमाणपत्र काढू शकतो. त्याला अध्यादेशाची गरज नाही. पण धाडस दाखवावं लागतं. तुम्ही किमान या कामाला सुरुवात तरी केली, यासाठी मी स्वागत करतो. पण झालेल्या निर्णयाचा आम्हाला काडीमात्र उपयोग नाही. निर्णय चांगलाय, आम्ही मान्यही केला. पण त्यात थोडी सुधारणा करा. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कालचा तुमचा निर्णय मान्य केला. पण जिथे वंशावळीचा शब्द आहे, त्या ठिकाणी सुधारणा करावी. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी सुधारणा करा. वंशावळ या शब्दात सुधारणा केली जावी – जरांगे पाटील
यंदा नवी मुंबई शहरात ५० सार्वजनिक दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ १ चे उपायुक्त विवेक पानसरे यांनी लोकसत्ताला दिली.
मुंबईतील सार्वजनिक रस्त्यांवर दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या विविध गटांना परवानग्या दिल्यामुळे होणाऱ्या गैरसोयी आणि वाहतूक कोंडीच्या परिणामांचा धोरणात विचार केलेला नाही.
Dahi Handi 2023: मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडीचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर बाळगोपाळ दहीहंडीचा आनंद घेताना दिसतात. यात अनेक राजकीय पक्ष देखील मोठ- मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करतात.
शिळफाटा रस्त्याने पत्रीपूल मार्गे शिवाजी चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपूल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
उत्सवांमधून राजकीय नेते निर्माण होत होते. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांनी उत्सवच बळकावले आहेत. त्यात दहीहंडीचा उत्सव सुटलेला नाही.
मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने बसेसच्या मार्गात बदल केले आहेत.
महापालिका निवडणूक अनिश्चिततेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडीच्या उत्सवावर विरजण पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई-ठाण्यात राजकीय दहीहंडींचं दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आयोजन करण्यात आलं आहे. ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीसाठीही मोठ्या प्रमाणावर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र न्यूज
Maharashtra Breaking News Live Today: महाराष्ट्रातील दहीहंडी व इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर