Maharashtra : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसानं थैमान घातलं असून नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्याच्या ज्या भागांमध्ये अल्प पावसाची समस्या होती, अशा ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून पुढील दोन दिवसदेखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार, एकनाथ शिंदे व संपूर्ण मंत्रीमंडळ वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्यावर आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

Live Updates

Marathi News : महाराष्ट्रातील पावसासंदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी…

14:16 (IST) 25 Sep 2025
Uddhav Thackeray in Marathwada: उद्धव ठाकरेंचा धाराशिवमधील पूरग्रस्त भागाचा दौरा

ज्या ज्या वेळी असं संकट येतं, तेव्हा सरकार खंबीर असायला हवं. मी इथे राजकारण करायला आलेलो नाही. पण या सरकारला तुमच्यावर अन्याय करू देणार नाही हे सांगायला मी इथे आलोय. ओमदाद, कैलास, अंबादास दानवे असे सगळेच तुमच्या मदतीला आहेत. मी व्हिडीओ पाहिल्यानंतर कैलास, ओमराजे निंबाळकर यांना फोन केला की तुम्ही पुरात उतरून शेतकऱ्यांना मदत करताय, पण स्वत:चीही काळजी घ्या. तर ते मला म्हणाले की साहेब आमची काळजी करू नका. आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीत तयार झालेलो आहोत. वाट्टेल ते झालं तरी आम्ही जनतेला वाचवण्याचा प्रयत्न करणार – उद्धव ठाकरे, अध्यक्ष, ठाकरे गट

14:14 (IST) 25 Sep 2025

Live-in Relationship Crime: प्रेयसी आणि तिच्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न… लिव्ह इन पार्टनर’ला अटक

पीडित महिला मागील एक महिन्यापासून मालाडमधील गावदेवी मंदिर रस्त्यावरील जुलूसवाडी परिसरातील यादव चाळीत सिध्दार्थ पटेल सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. …सविस्तर वाचा
14:13 (IST) 25 Sep 2025

आयुर्वेदाला नवे बळ देणारे आयुष मंत्रालयाचे बहुआयामी उपक्रम!

आयुर्वेदाला अधिकाधिक चालना मिळावी यासाठी आगामी दोन वर्षांत देशभरात १०० हून अधिक आयुर्वेद संशोधन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा आणि मानसिक आजारांवर आयुर्वेदिक औषधोपचारांच्या परिणामकारकतेचा अभ्यास होणार आहे. …सविस्तर वाचा
14:02 (IST) 25 Sep 2025

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांना आता‘सेनापती’, ‘सुभेदार’, ‘बाजी’ अशी नावे 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे आता बारसे झाले आहे . स्थानिक लोकांनी त्यांना इतिहासातील ‘सेनापती’, ‘सुभेदार’ व ‘बाजी’  अशी प्रसिद्ध नावे बहाल केली आहेत. …अधिक वाचा
13:51 (IST) 25 Sep 2025

भरजरी शालू नेसवलेले काँग्रेसचे मामा पगारे मानसिक धक्क्याने रुग्णालयात दाखल; भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली

काँग्रेस नेते मामा पगारे यांना भररस्त्यात भाजप कार्यकर्त्यांनी शालू नेसवल्याने राजकीय वातावरण चिघळले असून मानसिक धक्क्याने ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. …सविस्तर बातमी
13:44 (IST) 25 Sep 2025

राज्य मार्गावर थाटले अनाधिकृत गाळे; शाळेलाही झाला धोका… कुणी केला हा प्रताप ?

काठरेदिगर ते चाळीसगाव या १९ क्रमांकाच्या राज्य मार्गावर डांगसौंदाणे गावालगत पर्यायी बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. …सविस्तर बातमी
13:33 (IST) 25 Sep 2025

प्रभादेवी पुलबाधितांचे पुनर्वसन… म्हाडाकडून एमएमआरडीएला ११९ घरांची यादी सादर

रहिवाशांच्या पसंतीनुसार ११९ पैकी ८३ घरे एमएमआरडीएला वर्ग करण्यात येणार असून यासाठी एमएमआरडीएकडून शीघ्रगणकाच्या ११० टक्के दराने रक्कम घेण्याचा म्हाडाचा प्रस्ताव आहे. …वाचा सविस्तर
13:10 (IST) 25 Sep 2025

सेन्सेक्स १,००,००० अंशांवर जाणार

२०२५ मध्ये सेन्सेक्सने आतापर्यंत केवळ ४.१ टक्के परतावा दिला आहे, तर एमएससीआय एशिया पॅसिफिक निर्देशांक २२ टक्के आणि एमएससीआय वर्ल्ड निर्देशांक १५ टक्क्यांनी वधारला आहे. …सविस्तर वाचा
13:10 (IST) 25 Sep 2025

अखेर पूर परिस्थितीमुळे विविध परीक्षा पुढे ढकलल्या, एमपीएससीच्या परीक्षा….

येत्या २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा होणार आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे तसेच केंद्रांवर वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे. …सविस्तर वाचा
13:04 (IST) 25 Sep 2025

वैद्यकीय शिक्षणाच्या एकदम १० हजार जागा वाढविण्याचा केंद्राचा निर्णय धोकादायक!

सध्या भारतात ८०८ वैद्यकीय महाविद्यालये आणि १.२३ लाख एमबीबीएसच्या जागा असून, हा आकडा जगात सर्वाधिक आहे. गेल्या दशकात भारताने ६९,००० हून अधिक एमबीबीएस आणि ४३,००० पदव्युत्तर जागा वाढवल्या आहेत. …वाचा सविस्तर
12:54 (IST) 25 Sep 2025

Devendra Fadnavis on Moving to Delhi: दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण…

मी भाजपात काम करतो. इथे कोण मुंबईत राहणार किंवा दिल्लीत राहणार हे कुठलीही व्यक्ती ठरवत नाही. पक्ष ठरवतो. पण मला जितकी भाजपाची कार्यप्रणाली माहिती आहे, त्यानुसार मी सांगू शकतो की किमान ही पाच वर्षं तरी मी महाराष्ट्रात आहे. त्यानंतर पक्षाला जो निर्णय घ्यायचाय तो पक्ष घेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

12:38 (IST) 25 Sep 2025

मराठा आरक्षणाला विरोध…ओबीसीच्या याचिकांवर तातडीने सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर २९ सप्टेंबर रोजी तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ओबीसी समाजाच्या याचिकाकर्त्यांनी गुरूवारी उच्च न्यायालयात केली. …सविस्तर वाचा
12:29 (IST) 25 Sep 2025

कोटमगावात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांच्या त्रिगुणात्मक स्वरुपाचे दर्शन

श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक स्वरुपातील दर्शन कोटमगाव येथील देवस्थानात घडते. नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. …सविस्तर वाचा
12:27 (IST) 25 Sep 2025

Ratnagiri Crime News: ‘माता न तू वैरिणी’…रत्नागिरीत आईने आपल्या एका वर्षाच्या बाळाला केले ठार

शाहीन हिने बाळाच्या तोंडात कापूस कोंबून त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सायंकाळी उशिरा घडलेल्या या घटनेने रत्नागिरीत चांगली खळबळ उडाली आहे.  …अधिक वाचा
12:18 (IST) 25 Sep 2025

IRCTC Update: रेल्वेचे तिकीट काढताना पहिल्या १५ मिनिटांसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य

आयआरसीटीसीचे संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲपवरून तिकीट काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सामान्य आरक्षित तिकिटांचे आरक्षण सुरू होण्यापूर्वी १० मिनिटांच्या मर्यादित वेळेत कोणताही बदल होणार नाही. …वाचा सविस्तर
12:04 (IST) 25 Sep 2025

Mumbai Coastal Underpass Fire: सागरी मार्गावरील भुयारात वाहनाला लागली आग…तासभर वाहतूक ठप्प

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी किनारा मार्ग बांधण्यात आला आहे. या मार्गातील भुयारात शनिवारी एका वाहनाला अचानक आग लागली. …सविस्तर वाचा
12:04 (IST) 25 Sep 2025

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू, शाळांना सुट्टी जाहीर

गुरुवारी जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे चंद्रपूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. …सविस्तर बातमी
12:01 (IST) 25 Sep 2025

Crime News: नगरमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपीला सात वर्षांनी जामीन

मनपा निवडणुकीतील प्रकार; शहरात मात्र प्रवेशबंदी …वाचा सविस्तर
11:49 (IST) 25 Sep 2025

Mhada Biometric Survey: उपकरप्राप्त इमारतींचे बायोमेट्रीक सर्वेक्षण दोन दिवसांतच ठप्प; कोणत्या कायद्याद्वारे सर्वेक्षण – मालक, रहिवाशांचा सवाल

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला म्हाडाने सर्वोच्च न्यालायत आव्हान दिले असून आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची म्हाडाला प्रतीक्षा आहे. पण आता रहिवासी आणि मालकांनी बायोमेट्रीक सर्वेक्षणावरही प्रश्न उपस्थित करीत ही प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत नसल्याची भूमिका घेतली आहे. …वाचा सविस्तर
11:44 (IST) 25 Sep 2025

राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर… कधी होणार परीक्षा, नियोजन काय?

१०, ११ व १३ ऑक्टोबर या कालावधीत मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची परीक्षा घेतली जाणार असून, शालेय वेळापत्रकानुसार सकाळ किंवा दुपारच्या सत्रात परीक्षा आयोजित करण्याचे स्वातंत्र्य शाळांना देण्यात आले आहे. …अधिक वाचा
11:34 (IST) 25 Sep 2025

झोपडवासीयांच्या देखभाल शुल्कापोटी आता एक ते तीन लाख रुपये!

सध्या देखभाल शुल्कापोटी विकासकाला प्रत्येक झोपडीवासीयामागे ४० हजार रुपये प्राधिकरणाकडे जमा करावे लागत होते. त्यात आता वाढ सुचविण्यात आली असून इमारतीच्या उंचीच्या प्रमाणात एक ते तीन लाख रुपये जमा करावे लागणार आहेत. …अधिक वाचा
11:31 (IST) 25 Sep 2025

राजपत्रित अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी !

सामाजिक बांधिलकी जपत, १.५ लाख राजपत्रित अधिकारी पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीला देणार आहेत. …वाचा सविस्तर
11:28 (IST) 25 Sep 2025

Nashik illegal banner collapse: नाशिक महापालिका प्रशासनाची गांधारी…अवैध फलक, कमानींची बजबजपुरी

पंचवटीतील मखमलाबाद रस्त्यावरील ड्रीम कॅसल इमारतीजवळील सिग्नलवर नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा फलकाची कमान भाजपच्या माजी नगरसेवकाने लावली होती. …सविस्तर बातमी
11:21 (IST) 25 Sep 2025

समृद्धी महामार्गावर १६ भव्य उपहारगृहे उभारण्यासाठी वेग

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पेट्रोलपंपांनंतर भव्य १६ उपहारगृहे (फुड माॅल) उभारण्यात येणार आहेत. …सविस्तर वाचा
11:20 (IST) 25 Sep 2025

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सांगलीतून मदत पथक

अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यात जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे सीना कोळेगांव, चांदणी, खासापुरी प्रकल्पातील अतिरिक्त जलसाठा तसेच भोगावती नदीमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. …सविस्तर वाचा
11:20 (IST) 25 Sep 2025

​सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत घुसून मासेमारी करणाऱ्या कर्नाटकच्या ‘हायस्पीड ट्रॉलिंग’ नौकेवर कारवाई

मालवणच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील एका ‘हायस्पीड ट्रॉलिंग’ नौकेला सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने आज पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. …वाचा सविस्तर
11:10 (IST) 25 Sep 2025

पत्रकारांच्या छळवणुकीच्या अनेक घटना घडत आहेत; उच्च न्यायालयाची टिप्पणी

अलीकडच्या काळात पत्रकारांच्या छळवणुकीच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. एखाद्या प्रभावशाली व्यक्तिंबाबत वार्तांकन केल्यानंतरच पत्रकरांवर हल्ले अथवा त्यांची छळवणूक केली जाते, असेही न्यायालयाने उपरोक्त आदेश देताना नमूद केले. …सविस्तर वाचा
11:10 (IST) 25 Sep 2025

Sohrabuddin sheikh encounter case: सोहराबुद्दीन बनावट चकमक खटला: निकालानंतर सहा वर्षांच्या विलंबाने साक्षीदारांना पुन्हा पाचारण करणे शक्य?

डिसेंबर २०१८ मध्ये, मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने पुराव्याअभावी या प्रकरणातील सर्व २२ आरोपींची निर्दोष सुटका केली होती. या सुटकेविरोधात सोहराबुद्दीन याचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने २०१९ मध्ये अपील दाखल केले होते. …सविस्तर वाचा
11:05 (IST) 25 Sep 2025
Devendra Fadnavis Interview: ‘अकेला देवेंद्र क्या कर लेगा’ मोहिमेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, India Today Conclave मध्ये दिलं उत्तर!

देवेंद्र कधी एकटा नव्हताच. लोकांना भास होतो की मी एकटा आहे. माझ्या फायद्याचंच आहे ते की त्यांना वाटावं मी एकटा आहे. मग ते मला कमी लेखतात. त्यानंतर आमचं सैन्य त्यांना आमची ताकद दाखवतात. त्यामुळे मला वाटतं की आता त्यांना कळलं असेल की एकटा देवेंद्र काय करू शकतो – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

10:53 (IST) 25 Sep 2025

विकासकांवर नाही, पण फेरीवाल्यांवरील कारवाईत मात्र तत्परता; महापालिकेच्या कृतीवर उच्च न्यायालयाचा संताप

याचिकाकर्त्या फेरीवाल्यांनी सादर केलेल्या निवेदनावर विचार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर, लगेचच दुसऱ्या दिवशी या फेरीवाल्यांना हटवण्याची कारवाई महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली. त्यामुळे, फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. …सविस्तर बातमी

"जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, मका व इतर पिकांचे मोठे नुकसान." (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

Marathi News Live Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!