Maharashtra : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसानं थैमान घातलं असून नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्याच्या ज्या भागांमध्ये अल्प पावसाची समस्या होती, अशा ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून पुढील दोन दिवसदेखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार, एकनाथ शिंदे व संपूर्ण मंत्रीमंडळ वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्यावर आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
Marathi News : महाराष्ट्रातील पावसासंदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी…
Uddhav Thackeray on Marathwada Visit: उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर रवाना
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत.
Supriya Sule Meets Shivraj Singh Chauhan: सुप्रिया सुळेंनी घेतली शिवराज सिंह चौहान यांची भेट
केंद्र सरकारनंही महाराष्ट्राला मदत करावी ही विनंती करण्यासाठी मी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना भेटले. ते तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत. ते म्हणाले की मी स्वत: महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ते बघण्यासाठी येईन – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष</p>
Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत, चला आपणही मराठवाड्यात जाऊत….!!
संजय राऊत, चला आपणही मराठवाड्यात जाऊत….!! या आधी महाराष्ट्रावर आणि देशावर किती तरी नैसर्गिक संकट येऊन गेली…. त्यावेळी तुम्ही कुठे दडून बसला होतात??? प्रत्येक ठिकाणी हा शिवसेनेचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदेच मदतीचे सारं सामान घेऊन पोहोचला….! तुला ही दानत, हे दातृत्व कळणारच नाही संजय राऊत.…कारण, त्यासाठी ते अंगात असावं लागतं… आणि हो …या पूर्वी अशा प्रसंगात सामन्यात फोटो लावण्यासाठी जे वाटलेत ना ? ते पण शिंदे साहेबांनीच पाठवलेले !!! हो, गेले शिंदे साहेब मराठवाड्यात…जसे याआधी गेले होते कोल्हापूर,सांगली, चिपळूण, महाड, काश्मीर आणि बऱ्याच ठिकाणी…त्यांना सवय आहे, जे आपल्याजवळ आहे त्यातून ज्याला गरज आहे त्याला देण्याची…!! तुम्ही पण आज मराठवाड्यात जाणार आहात म्हणे…. किमान *पाच रुपयाचा बिस्किटाचा पुडा घेऊन जा बरं*…. फार बिकट अवस्था आहे तिथल्या बांधवांची… एरव्ही उन्हात जळणारा मराठवाडा आज पावसाने पुरता भिजून गेलाय… बघा जमतं का, पाच रुपयाचा बिस्किटाचा पुडा न्यायला… कारण तुमची दानत तेवढीच!!
नरेश म्हस्केंची खोचक पोस्ट..
संजय राऊत, चला आपणही मराठवाड्यात जाऊत….!!
— Naresh Mhaske (@nareshmhaske) September 25, 2025
या आधी महाराष्ट्रावर आणि देशावर किती तरी नैसर्गिक संकट येऊन गेली…. त्यावेळी तुम्ही कुठे दडून बसला होतात??? प्रत्येक ठिकाणी हा शिवसेनेचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदेच मदतीचे सारं सामान घेऊन पोहोचला….!
तुला ही दानत, हे दातृत्व कळणारच…
Nashik Heavy Rain Crop Damage: नाशिकला अतिवृष्टीचा तडाखा… १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
marathwada solapur flood update: MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
येत्या २८ सप्टेंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार असून ती पुढे ढकलावी असी मागणी होऊ लागली आहे. मराठवाड्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली जात आहे.
दहिसर-भाईंदर रस्त्यासाठी खार जमीन देण्यास मीठ उत्पादकांचा नकार; खार जमीनीची मालकी केंद्र सरकारची नसल्याचा दावा
Video: खड्डे बुजवा, अन्यथा गाठ माझ्याशी! माजी मंत्र्यांनीही दिला अधिकाऱ्यांना दम; आता तरी…
Maharashtra Marathwada Flood Updates Live: अजित पवार महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर
हवामान विभागानं सांगितलंय की या आठवड्यात पुन्हा मुसळधार पाऊस होऊ शकतो. २७ ते ३० सप्टेंबर हे दिवस धोक्याचे असू शकतात. त्यामुळे लोकांना आणि सरकारलाही काळजी घ्यावी लागेल. यंत्रणाही सतत राबत आहे – अजित पवार, उपमुख्यमंत्री
आज मौजे हिंगणी (खुर्द) येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतात जाऊन पिकांचं आणि अन्य झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाही भेट दिली. यंदाच्या मुसळधार पावसानं शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान केलं. डोळ्यांत साठवलेली सगळी स्वप्नं पुराच्या पाण्यात वाहून… pic.twitter.com/OAtjkXQa9y
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 25, 2025
घरांचं, विहिरींचं, सर्व प्रकारच्या पिकांचं, फळबागांचं, रस्त्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. नदीतल्या केटीवेअरचं नुकसान झालंय. वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान दिसत आहे. जनावरं मृत्यूमुखी पडली. काही ठिकाणी मनुष्यहानीही झाली. पाण्याचा प्रवाह इतका होता की आजही मला राष्ट्रीय महामार्गावरची माणसं म्हणाली की सकाळपासून ८ ते ९ इंचांनी पाणी वाढलं आहे – अजित पवार, उपमुख्यमंत्री
आज बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त पाहणी दौऱ्याची सुरुवात मौजे पिंपळगाव घाटपासून केली. पूरामुळे शेतकरी बांधव आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झालेला परिणाम तसंच गावातील झालेलं नुकसान प्रत्यक्ष पाहिलं, गावकऱ्यांना धीर दिला, त्यांचं मनोबल वाढवलं.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 25, 2025
यावेळी पूल व लगतच्या परिसराची पाहणी करून… pic.twitter.com/qmQw10C4Dg
प्रचंड नुकसान झालं आहे. नदीकाठ, ओढे, नाले, चाऱ्या यांच्या बाजूला असणाऱ्या जमिनींचं नुकसान झालं आहे. याचं कारण काय? तर ओढे-नाले पूर्वीच्या तुलनेत लहान होत गेले आहेत. काही ठिकाणी तर नद्यांनी प्रवाहच बदलले आहेत. मोठमोठे पूल असतानाही पाणी त्याच्यावर चढलं. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला पाणी लागलं – अजित पवार, उपमुख्यमंत्री
शक्य ते सर्व करू.. पुन्हा आपल्या शेतकरी बांधवांच्या जीवनात सुगीचे दिवस आणू.. जगण्याला बळ देऊ..! pic.twitter.com/4pSzrQk8cy
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 24, 2025
"जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, मका व इतर पिकांचे मोठे नुकसान." (छायाचित्र – लोकसत्ता टीम)
Marathi News Live Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!