Maharashtra News Highlights: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (२६ सप्टेंबर) दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. तसेच काल त्यांनी मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मदतीसंदर्भात निवेदन दिलं आहे. महापुराने बेहाल झालेल्या मराठवाड्याला मदतीचा हात देणं गरजेचं असून राज्य सरकारच्या तिजोरीत निधी नसला तरी उणे अर्थसंकल्पातून तरतुदी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर मदत दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Live Updates

Marathi News Live Today : राज्यासह देशभरातील बातम्या वाचा एकाच क्लिकवर.

15:52 (IST) 26 Sep 2025

पनवेल: अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई सुरूच

गुरुवारी तळवली येथील सेक्टर २१ येथील कारवाईमध्ये सर्वे क्रमांक ४०, ५६ यावर संदीप पाटील यांनी केलेले ४३० चौरस मीटरचे बांधकाम पाडण्यात आले. तसेच सेक्टर २० मधील दिलीप जाधव यांनी १३६ मीटरचे बांधकाम पाडण्यात आले. …वाचा सविस्तर
15:50 (IST) 26 Sep 2025

“आरक्षण हा जिलेबी वाटपाचा कार्यक्रम नाही, मात्र राज्यात…”, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची टीका

कुणी दबाव टाकला की घेऊन जा जिलेबी अशा पध्दतीने आरक्षण प्रमाणपत्र वाटत सुटले आहेत, अशी टिका माजी विरोधी पक्ष नेते तथा ओबीसी समाजाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. …सविस्तर बातमी
15:38 (IST) 26 Sep 2025

Navratri 2025: विरारच्या सोनुबाई भवानी मंदिरात नऊदेवींचा जागर

देवीची मूर्ती शेततळ्यात सापडली होती असे इथले जुने जाणकार ग्रामस्थ सांगतात. देवीची वाघावर विराजमान असलेली मूर्ती पाषाणात कोरलेली असून वैशिष्टयपूर्ण आणि पुरातन आहे. …वाचा सविस्तर
15:13 (IST) 26 Sep 2025

येऊरच्या जंगलातील बेकायदा टर्फ उखडले

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलात बेकायदा टर्फ बांधून त्यातून आर्थिक नफा कमाविणाऱ्या व्यवसायिकांना अखेर कायमचा लगाम लागला आहे. …अधिक वाचा
15:13 (IST) 26 Sep 2025

राहुल गांधींचा मामा पगारे यांना फोन…‘मामाजी घाबरू नका, काँग्रेस तुमच्या पाठीशी’

डोंबिवलीतील काँग्रेसच्या निष्ठावान नेत्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात शालू नेसवून त्यांची बदनामी केली. यामुळे मानसिक धक्का बसलेले काँग्रेसचे डोंबिवलीतील पदाधिकारी मामा पगारे रुग्णालयात उपचार घेत आहेत. …सविस्तर बातमी
15:13 (IST) 26 Sep 2025

देशातील १,६०० महिला लोको पायलटना सुरेखा यादव यांच्यामुळे प्रेरणा

३६ वर्षांची सेवेनंतर आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव निवृत्त होणार …अधिक वाचा
14:52 (IST) 26 Sep 2025

स्टार्टअपसाठी खूशखबर: ६ टक्के व्याजदराने कर्ज; ३ टक्के सरकार भरणार… जाणून घ्या काय आहे योजना…

या योजनेचा शुभारंभ येत्या ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी सकाळी येथे दिली. …सविस्तर वाचा
14:52 (IST) 26 Sep 2025

Video : २६ कोटींचा अमली पदार्थांचा साठ्याची होळी 

वारंवार जप्त केलेले अमली पदार्थ हे शास्त्रोक्तपद्धतीने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीतील भस्मीकरणा-या यंत्रात जाळून त्याची होळी केली जाते. …सविस्तर वाचा
14:09 (IST) 26 Sep 2025

MPSC Exam Date Confusion : एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम…

राज्यभर पावसामुळे जनजीवन विस्कळीत असताना एमपीएससी परीक्षा वेळेवर घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांत संभ्रम आणि संताप व्यक्त होत आहे. …अधिक वाचा
14:03 (IST) 26 Sep 2025

Narendra Patil: नवे कामगार मंत्री येतात….त्यांना कुणी बर्फी देत आणि कामगार बोंबा मारत रहातो; नरेंद्र पाटील नेमक काय बोलून गेले…

माथाडी कामगारांचे दिवंगत नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या माथाडी मेळाव्यात त्यांचे पुत्र आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. …अधिक वाचा
14:01 (IST) 26 Sep 2025

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी

पुढील वर्षी एप्रिलमध्ये तामिळनाडू विधानसभाची मुदत संपत असून त्याच आसपास तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील मोठे राज्य असलेल्या तामिळनाडूकडे भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. …वाचा सविस्तर
13:50 (IST) 26 Sep 2025

‘डीम्ड कन्वेयन्स’साठी पूर्व तपासणी मोहीम; नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय

‘डीम्ड कन्व्हेयन्स’साठी शुल्क निश्चितीही केली जाणार असून, मोहिमेअंतर्गत कागदपत्रांची तपासणी, सोसायट्यांच्या असलेल्या विविध शंकाचे निरसन करण्यात येणार आहे. …सविस्तर बातमी
13:44 (IST) 26 Sep 2025

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या; पदवीधर निवडणुकीसाठी मतदाराला स्वतंत्र नाव नोंदणी करणे बंधनकारक

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील याद्यांमध्ये नव्याने नाव नोंदणी करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विधानभवनामध्ये गुरुवारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांची बैठक घेतली. …वाचा सविस्तर
13:22 (IST) 26 Sep 2025

Purandar airport : पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची मुदत संपुष्टात; मुदतवाढ न देण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय

पुरंदर विमानतळासाठी पारगाव, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी अशा सात गावांमधून जमीन संपादित होणार आहे. …अधिक वाचा
13:00 (IST) 26 Sep 2025

लसीकरणासाठी पालिका शाळेतील विद्यार्थिनींचा रुग्णवाहिकेतून कोंबून प्रवास

महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थिनींना एचपीवी लस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या लसीमुळे भविष्यात विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव होणार आहे. …वाचा सविस्तर
12:51 (IST) 26 Sep 2025

“फडणवीस पेशवे काळातील नाना फडणवीसांसारखे शहाणे आहेत, जनतेची मागणी होताच…”, ठाकरे गटाचा टोला

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “ओला दुष्काळ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. देवेंद्र फडणवीस ही पेशव्यांच्या काळातील नाना फडणवीस यांच्यासारखेच आहेत. जे जनतेच्या मागण्या आल्या की सरकारी भाषा दाखवायचे. मुळात हे सरकार गोट्या खेळण्याच्याच लायकीचं आहे.”

12:44 (IST) 26 Sep 2025

Mama Pagare: भर रस्त्यात शालू नेसवल्याने मामा पगारेंकडून डोंबिवली भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

काँग्रेसचे डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते मामा पगारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, संदीप माळी, दत्ता मयेकर आणि इतर २० जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून घेतला. …वाचा सविस्तर
12:36 (IST) 26 Sep 2025

वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांसाठी या ठिकाणांवर सर्व्हेलन्स व्हॅन… एआय सीसीटीव्ही लावण्यास सुरूवात

वाहतूक पोलिस, महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ‘एनआयबीएम’ परिसरात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी शंभराहून अधिक ‘एआय’वर आधारित ‘सीसीटीव्ही’ बसविण्यात आले आहेत. …वाचा सविस्तर
12:19 (IST) 26 Sep 2025

येत्या निवडणुकीत महायुती विरोधात मतदान… पुण्यातील कॅब, रिक्षांवर झळकली पत्रके

परिवहन आयुक्तालयाच्या निर्देशानुसार, प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या ॲग्रीगेटर कंपन्यांना प्रति किलोमीटर ३२ रुपये प्रमाणे दर निश्चित करून दिले आहेत, तरी या कंपन्या चालकांना प्रति किलोमीटर १० ते ११ रुपये दरानुसार मोबदला देतात. …सविस्तर बातमी
12:08 (IST) 26 Sep 2025

Jitendra Awhad: नीट बोलायचं, नाही तर गुन्हे दाखल करेल… जितेंद्र आव्हाडांसमोरच उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ओएसडीची रहिवाशांना धमकी

ठाण्यात सध्या झोपडपट्टी प्राधिकरणाच्या बायोमॅट्रिक सर्वेक्षणावरून वाद पेटला आहे. यातच एक व्हिडीओ समोर येत आहे. …सविस्तर बातमी
12:07 (IST) 26 Sep 2025

Thane Viviana Mall Sold : ठाण्यातील सर्वात मोठा मॉल १,९०० कोटींना विकला गेला! एका रात्रीत नावही बदललं! जाणून घ्या कुणी खरेदी केला…

मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय शॉपिंग डेस्टिनेशनपैकी एक मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील विवियाना मॉलचे नाव अचानक बदलल्याची जोरदार चर्चा ठाणेकरांमध्ये तसेच इतर शहरातील नागरिकांमध्ये सुरु आहे. …वाचा सविस्तर
12:01 (IST) 26 Sep 2025

पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाला मिळणार गती, महापालिकेचा मोठा निर्णय !

या प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीच्या सुमारे ४४.४ किलोमीटर काठाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. संगमवाडी भागात संरक्षण खात्याची ७ हेक्टर जागा आहे. या जागेवर सुशाेभीकरणाचे काम करण्यास यापूर्वी संरक्षण विभागाने परवानगी दिली आहे. …अधिक वाचा
11:52 (IST) 26 Sep 2025

पुण्याला दुय्यम वागणूक का? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे कोणी केली विचारणा !

पुण्यात आवश्यक जागा, शैक्षणिक वातावरण, शिक्षणतज्ज्ञ उपलब्ध असतानाही नागपूर, त्यानंतर मुंबई या भागांमध्ये हे केंद्र उभे रहाते, पुण्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असा आरोप केला जात आहे. …सविस्तर बातमी
11:39 (IST) 26 Sep 2025

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले घोषणा केली पण महापालिकेने एकतानगरी बाबत घेतला हा मोठा निर्णय !

एकता नगरीत पावसाळ्यात येत असलेल्या पुराच्या संकटापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी आवश्यक ते उपाय केले जातील. येथे क्लस्टर डेव्हलपमेंट केले जाईल. यासाठी राज्य सरकारच्या वतीने आवश्यक तो निधी दिला जाईल, असे शिंदे यांनी जाहीर केले होते. …वाचा सविस्तर
11:28 (IST) 26 Sep 2025

शासकीय शाळांनंतर अनुदानित शाळांसाठीही महत्त्वाचा निर्णय… शिक्षकांना मिळणार दिलासा… होणार काय?

शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये एकूण १५ प्रकारच्या समित्या अस्तित्वात होत्या. …अधिक वाचा
11:23 (IST) 26 Sep 2025

आहार मार्गदर्शन, अभ्यासक्रम, प्रशिक्षणासाठी ‘न्युट्रिडेक’… काय आहे ही संकल्पना?

महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते ‘न्यूट्रिडेक’ केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. …सविस्तर वाचा
11:10 (IST) 26 Sep 2025

विद्यापीठाच्या वसतिगृहातून लॅपटाॅप चोरी; चतु:शृंगी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गु्न्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या आवारातील जी-३ वसतिगृहातील एका खाेलीत विद्यार्थी राहायला आहे. …सविस्तर बातमी
11:09 (IST) 26 Sep 2025

MPSC Update : मोठी बातमी… एमपीएससीचा राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यास नकार, आयोगाने काढलेले परिपत्रक बघा!

राज्यभर असलेल्या पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली असली तरी एमपीएससीने वेळापत्रक बदलण्यास नकार देत परीक्षा नियोजनाचे तपशील परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहेत. …अधिक वाचा
11:02 (IST) 26 Sep 2025

रस्त्यांवरील खड्ड्यांनी कसे दिले पुण्याच्या राजकारणाला ‘वळण’?

विद्यमान काळात भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने खड्ड्यांबाबत महापालिका प्रशासनाला जाब विचारण्याचे कष्ट घेतले नाहीत. मात्र, दस्तुरखुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेतली. …वाचा सविस्तर
11:01 (IST) 26 Sep 2025

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ बॉम्बवर अजित पवार म्हणाले, “बाहेरच्या देशाने कुठलाही…”

Ajit Pawar vs Donald Trump : अजित पवार म्हणाले, “अमेरिकेच्या जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांना चार वर्षांसाठी निवडून दिलं आहे. ते त्यांच्या देशासाठी निर्णय घेत आहेत. त्यांनी असे कितीही निर्णय घेतले तरी आपण त्याला समर्पक उत्तर देऊ.” …सविस्तर बातमी