Maharashtra News Highlights: उपराष्ट्रपतिपदासाठी आज (९ सप्टेंबर) निवडणूक पार पडणार आहे. इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन सेड्डी व एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. बीआरएस, बीजेडी व शिरोमणी अकाली दल हे पक्ष या निवडणुकीत मतदान करणार नाहीत. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असून आपण या निवडणुकीचे सर्व अपडेट्स या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
दुसऱ्या बाजूला, मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, “काही लोकांना वाटत होतं की माझी राख होतेय, तेवढ्यात मी भरारी घेतली. मी आव्हानांपासून पळून गेलो नाही.” यावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येऊ शकते.
मनोज जरांगेंचा राज्य सरकारला अल्टीमेटम
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. येत्या १७ सप्टेंबरपासून हैदराबाद गॅझेटमधील नोंदींप्रमाणे मराठा कुटुंबांना जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा अन्यथा मराठवाडा मुक्तीदिनी आयोजित कार्यक्रमांमध्ये राजकीय नेत्यांवर बंदी घालू.
आज राज्य सरकारची ओबीसी संघटनांबरोबर बैठक
दुसऱ्या बाजूला राज्य सरकारची आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाबरोबर बैठक होणार आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, आमदार परिणय फुके यांच्यासह ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. छगन भुजबळ या बैठकीला जातात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्व घडामोडींकडे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्राशी संबंधित बातम्यांवर आपलं लक्ष असेल.
Marathi News Live Updates : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा घ्या एकाच क्लिकवर.
समूह साधन केंद्र समन्वयक पदासाठी कधी होणार परीक्षा? शिक्षण विभागाचे निर्देश काय?
समूह साधन केंद्र समन्वयक पदासाठी कधी होणार परीक्षा? शिक्षण विभागाचे निर्देश काय?
Anil Deshmukh: दारुगोळा कंपनीत वारंवार स्फोटामुळे कामगारांचे मृत्यू… माजी गृहमंत्री कारणांबाबत थेटच म्हणाले…
कार हरियाणाची, पाटी पोलिसांची अन् धडकली नागपूरात; पोलीस पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात
डोंबिवलीत आयरे, कोपर, भोपरमधील २१ बेकायदा बांधकामे भरपावसात भुईसपाट
यवतमाळात घरोघरी डास अळ्यांचा शोध !
वादग्रस्त शिक्षक भरतीप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांचे वराती मागून घोडे
डोंबिवलीतील ज्येष्ठ डाॅक्टर दिलीप ठाकूर यांचे निधन
आझाद मैदानातील शिल्लक पाण्याच्या लाखो बाटल्या गायब… बाटल्या चोरीचा आंदोलकांचा आरोप
राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्त्वाचे निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज (९ सप्टेंबर) राज्यमंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ऊर्जा, नगरविकास, जलसंधारण व महसूल विभागांतर्गत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीतील चार महत्त्वाचे निर्णय
१. ऊर्जा विभाग
शेतकऱ्यांना दिलासा. उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ. अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या १ हजार ७८९ योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ.
२. नगरविकास विभाग
नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून २००० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी रुपये, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी २६८ कोटी रुपये, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ११६ कोटी रुपये कर्ज उभारणी करणार.
३. मृद व जलसंधारण विभाग
अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी (ता. मुर्तिजापूर) येथील लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता. मुर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार, शेतीला पाणी, शेतकऱ्यांना फायदा.
४. महसूल विभाग
रायगड जिल्ह्यातील मौजे आसुडगाव (ता. पनवेल) येथील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने (रहिवास क्वार्टर्स) बांधण्यासाठी देण्यास मान्यता.
छत्रपतीसंभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांची बांधणी, माजी सात महापौर आणि माजी आमदार गळाला
कासला सलग सुट्टीत हजारो पर्यटकांची भेट
शरद पवार व अजित पवारांचा काय संबंध? भुजबळांचा सवाल, ‘त्या’ ओबीसी नेत्यांवर आक्षेप
बहिणीच्या प्रियकराची हत्या… पोलिसांसमोर आत्मसमर्पण
मुंब्र्यात लकी कंपाऊंडमधील इमारतीचा सज्जा कोसळला, एक महिला ठार, एक जखमी
विसर्जनादरम्यान ‘फेस्टिवल चोरांची’ हाथ की सफाई… शेकडो मोबाईल गहाळ… गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारदारांची गर्दी
घराच्या मालकीवरून दोन गटात हाणामारी… जखमी वृध्दाचा मृत्यू, ४ जणांना अटक
गोराई समुद्रकिनाऱ्यावर नेली बस… भरतीच्या पाण्यात अडकली
कल्याण बारावे भागात चपाती खाण्यास आणि इंजेक्शन दिल्याने कपिला गाईचा मृत्यू
मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या तीन रत्नागिरीच्या ट्रॉलर्सवर कारवाई
मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या तीन रत्नागिरीच्या ट्रॉलर्सवर कारवाई
नऊ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात आठ शाळांचा गौरव
राष्ट्रीय उद्यानातील वनमजुरांनाही नोकरीचे सर्व लाभ मिळणार… उच्च न्यायालयाचा निर्णय
नव्या वर्षापासून एमएसआरडीसीचा कारभार दादरमधील कोहिनूर स्क्वेअरमधून
“केंद्र सरकारचा अजब फतवा, पती व पत्नीच्या नावावर शेती असल्यास केवळ पत्नीलाच…”, रोहित पवारांचा टोला
रोहित पवार म्हणाले, “एका कुटुंबात नवरा आणि बायको दोघांच्या नावावर शेती असल्याने दोन लाभार्थी असतील तर आता केवळ कुटुंबातील महिला लाभार्थ्यालाच पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळतील. पुरुष लाभार्थ्याला दोन हजार रुपये मिळणार नाहीत, हा केंद्र सरकारचा फतवा अजबच म्हणावा लागेल. एकीकडे जीएसटीमध्ये कपात करून ढोल बडवायचे आणि दोनच दिवसात शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे हफ्ते बंद करायचे? केंद्र सरकारला हे शोभते का? आधीच पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात म्हणून लाडक्या बहिणींना लाडक्या बहिण योजनेच्या मदतीपासून राज्य सरकारने वंचित ठेवले आणि आता लाडक्या भावांना वंचित ठेवत आहात? नैसर्गिक आपत्तीचा फटका आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका कुटुंबातील सर्वच शेतकऱ्यांना बसतो त्यामुळे कुटुंबातील एकाच शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय पूर्णतः चुकीचा आहे, केंद्र सरकारने पुनर्विचार करावा.”