Maharashtra News Updates, 29 October 2025 : शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी मंगळवारी (२८ ऑक्टोबर) संध्याकाळपासून नागपूर हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला आहे. त्यामुळे यवतमाळ नागपूर, चंद्रपूर -नागपूर हे सर्व महामार्ग बंद पडले आहे. महामार्गांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या चक्काजाम आंदोलनात भाजपाचे आमदारही अडकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे की दुपारी १२ वाजेपर्यंत “आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही महाराष्ट्र जाम करणार.” तर, “बच्चू कडू यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत”, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.

नागपुरातील आंदोलनामुळे चार राष्ट्रीय महामार्ग ठप्प असून १४ तासांहून अधिक काळ वाहतूक बंद आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या आंदोलनाच्या सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

दरम्यान, फलटणमधील डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफासामुळेच झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. तर, मुलीच्या कुटुबियांनी हत्येचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातील सर्व अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत.

शिवसेनेने (उबाठा) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून मुंबई महानगरपालिकेत पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ज्यांचं वय ६० वर्षांहून अधिक असेल त्यांनी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

मोंथा चक्रीवादळाने आंध्र प्रदेश व ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर थैमान घातलं आहे. या चक्रीवादळाने आतापर्यंत तिघांचा बळी घेतला आहे. तर, सुरक्षिततेसाठी हजारो लोकांना किनाऱ्यापासून दूर हलवण्यात आलं आहे.

Live Updates

Maharashtra Weather Today Live Updates : राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

21:27 (IST) 29 Oct 2025

‘आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’, बच्चू कडू यांची माहिती, उद्या फडणवीसांची भेट घेऊन चर्चा करणार

सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. बच्चू कडू यांच्या मागण्यांबाबत सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करत आहे. मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जैसवाल यांचा यामध्ये समावेश आहे. उद्या बच्चू कडू हे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

20:59 (IST) 29 Oct 2025

बच्चू कडू म्हणाले “ सरकारने न्यायालय विकत घेतले”

रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांना न्यायालयाने रस्ता मोकळा करण्यास सांगितल्याने आंदोलक संतप्त झाले आहे. ते आंदोलन करण्यावर ठाम आहे, आम्हाला कारागृहात टाका,असे बच्चू कडू यांनी सांगितले व रात्री ते आंदोलकांसह स्वत:ला अटक करून घेण्यासाठी शहराच्या दिशेने निघाले. दरम्यान सरकारने न्यायालय विकत घेतले आहे,अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

वाचा सविस्तर

20:37 (IST) 29 Oct 2025

सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीला, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार?

सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. बच्चू कडू यांच्या मागण्यांबाबत सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करत आहे. मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जैसवाल यांचा यामध्ये समावेश आहे.

19:49 (IST) 29 Oct 2025

शरद पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादीच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नरेश शेळके; ऐन ‘स्थानिक’ निवडणुकांच्या तोंडावर…

शरद पवारांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष बदलला आहे. नरेश शेळकेंना कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. …वाचा सविस्तर
19:36 (IST) 29 Oct 2025

कल्याण डोंबिवली पालिका वर्धापनदिन कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांना ‘हाजीर हो’ चे आदेश; कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रद्द केला होता वर्धापनदिन

वर्धापनदिन कार्यक्रम गुरुवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात पालिका प्रशासनाने घेण्याचे ठरवले आहे. या कार्यक्रमाला सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी हजर होण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. …सविस्तर बातमी
19:26 (IST) 29 Oct 2025

“तुमचे दोन मंत्री आले नाही, आम्ही अटक व्हायला चाललो”, बच्चू कडू अटक करून घेण्यासाठी पोलिसांकडे निघाले

वर्धा रोडवर सुरू असलेल्या प्रचंड आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवर नागपूर खंडपीठाने बुधवारी स्वतःहून दखल घेतली आणि तातडीचे आदेश देत माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्छू कडू यांना व त्यांच्या समर्थकांना लगेच रस्ता मोकळा करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, न्यायायलयाच्या आदेशानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही’, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. तसेच “तुमचे दोन मंत्री आले नाही, आम्ही अटक व्हायला चाललो”, असं म्हणत बच्चू कडू अटक करून घेण्यासाठी पोलिसांकडे निघाले आहेत.

19:17 (IST) 29 Oct 2025

video : पाण्यात उतरायचे तर कसे? वाघिणीचा बछडा घाबरतच पाण्यात उतरला, पण नंतर…

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील असाच एक व्हिडिओ सहाय्यक वनसंरक्षक स्वप्नील भोवते यांनी चित्रित केला आहे. यात वाघिणीचा एक बछडा बिनधास्तपणे पाण्यात पोहतो आहे, तर दूसरा मात्र पाण्यात उतरायला देखील घाबरत आहे. …सविस्तर बातमी
18:42 (IST) 29 Oct 2025

“आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही, पण…”, हायकोर्टाच्या आदेशानंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

वर्धा रोडवर सुरू असलेल्या प्रचंड आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवर नागपूर खंडपीठाने बुधवारी स्वतःहून दखल घेतली आणि तातडीचे आदेश देत माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्छू कडू यांना व त्यांच्या समर्थकांना लगेच रस्ता मोकळा करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, न्यायायलयाच्या आदेशानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही’, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

18:40 (IST) 29 Oct 2025

वाहतुक कोंडीत वाहने बंद पडण्याचे शुक्लकाष्ठ

ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते.परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष आणि विविध प्रकल्पांची ठाणे शहराला आता कोंडीचे शहर असे अनेकदा म्हटले जाते. वाहतुक कोंडीस आता वाहने बंद करण्याचे कारण देखील पुढे येत आहे …सविस्तर वाचा
18:13 (IST) 29 Oct 2025

नाशिक राज्य परिवहन महामंडळाची खऱ्या अर्थाने दिवाळी….राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

प्रवाशांना दिली जाणारी तत्पर आणि माफक दरातील सेवेमुळे खासगी प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेतही एसटी आपले पाय भक्कम रोवून उभी आहे. …अधिक वाचा
18:13 (IST) 29 Oct 2025

बच्चू कडू आंदोलनाची हायकोर्टाकडून गंभीर दखल, वर्धा रोडवरील आंदोलकांना तात्काळ हटवण्याचे आदेश…

वर्धा रोडवर सुरू असलेल्या प्रचंड आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवर नागपूर खंडपीठाने बुधवारी स्वतःहून दखल घेतली आणि तातडीचे आदेश देत बच्छू कडू यांना व त्यांच्या समर्थकांना लगेच रस्ता मोकळा करण्याचे निर्देश दिले. …सविस्तर वाचा
18:10 (IST) 29 Oct 2025

“भारताच्या सागरी क्षेत्रावर जगाचा विश्वास वाढला”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईतील इंडिया मेरीटाईम वीकमध्ये वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील इंडिया मेरीटाईम वीक २०२५ ला भाषण केले. यावेळी त्यांनी म्हटले की, “हा कार्यक्रम २०१६ मध्ये मुंबईत सुरू झाला होता. मुंबईत सुरू झालेला हा कार्यक्रम आता जागतिक कार्यक्रम बनला आहे. यामध्ये ८५ हून अधिक देश सहभागी होत आहेत. येथे शिपिंग क्षेत्राशी संबंधित अनेक योजना सुरू करण्यात आल्या. शिपिंग क्षेत्रात लाखो कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. यावरून भारताच्या सागरी क्षेत्रावर जगाचा विश्वास वाढल्याचे दिसून येते.”

17:57 (IST) 29 Oct 2025

नवनीत राणांना ‘गँगरेप’ व ‘ठार मारण्याची’धमकी; स्पीड पोस्टद्वारे आलेल्या पत्राने खळबळ

भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना हैदराबादमधील एका व्यक्तीकडून स्पीड पोस्टद्वारे पाठवलेल्या या पत्रात तुझ्यावर गँगरेप करून मारून टाकू अशा भयंकर व आक्षेपार्ह शब्दांत धमकी देण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
17:42 (IST) 29 Oct 2025

शेतकरी आंदोलनाचा फटका… पेट्रोल पंप कोरडे होणार? नागपूर जिल्ह्यात…

आंदोलनामुळे झालेल्या वाहन कोंडीमुळे नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना पेट्रोल, डिझेलसह इतर इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पुरवठ्याची स्थिती लवकर सुधारली नाही काही पेट्रोल पंप कोरडे पडण्याची शक्यता पेट्रोल पंप चालकांनी व्यक्त केली आहे. …सविस्तर वाचा
17:26 (IST) 29 Oct 2025

अंबरनाथच्या शिवमंदिराचे शिल्पवैभवाचे नाट्यगृहात; आनंद दिघे नाट्यगृहात डॉ. कुमुद कानिटकर यांच्या छायाचित्रसंग्रहाचे कायमस्वरूपी प्रदर्शन

अंबरनाथ महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहातील प्रदर्शन दालनात आता नागरिकांना अकराव्या शतकातील शिलाहारकालीन शिवमंदिराचे अप्रतिम शिल्पवैभव जवळून अनुभवता येणार आहे. …वाचा सविस्तर
17:10 (IST) 29 Oct 2025

नागपूर : गडकरींच्या बर्ड पार्कमध्ये शेतकरी आंदोलकांचा ठिय्या

बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा नागपुरात पोहोचला आहे. आंदोलकांनी आसपासच्या शेतात, मोकळ्या जागेत तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एनएचएआयतर्फे विकसित केलेल्या बर्ड पार्कमध्ये प्रवेश करून तेथे ठिय्या दिला आहे. …वाचा सविस्तर
16:50 (IST) 29 Oct 2025

शेतकरी आंदोलन तापले… ‘एसटी’ची प्रवासी वाहतूक ठप्प… ६०० प्रवासी वाहतुक कोंडीत…

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी सुरू केलेले आंदोलन आता तापले आहे नागपुरात वाहतूक कोंडी होऊन एसटीच्या सर्व वाहतूक ठप्प पडल्या आहे. …वाचा सविस्तर
16:48 (IST) 29 Oct 2025

Salher Fort : साल्हेर किल्ल्यावर निधीचा वर्षाव…पुन्हा पाच कोटी रुपये…

नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
16:32 (IST) 29 Oct 2025

अंबरनाथच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला दिरंगाईचा फटका; २५८ कोटींच्या योजनेसाठी आवश्यक जागा वन विभागाकडून हस्तांतरित नाहीच

अंबरनाथ शहराच्या भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून अमृत योजना टप्पा दोन अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या तब्बल २५८ कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला वन विभागाच्या दिरंगाईचा फटका बसत आहे. …सविस्तर बातमी
16:14 (IST) 29 Oct 2025

तुम्ही सांगाल तो शब्द प्रमाण…माजी आमदार कुणाल पाटील यांचे कोणाला आश्वासन?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर माजी आमदार कुणाल पाटील हे तालुक्यात कार्यरत झाले आहेत. परंतु, यावेळी कुणाल पाटील हे काँग्रेससाठी नव्हे तर, भाजपसाठी मते मागणार आहेत. …सविस्तर बातमी
16:13 (IST) 29 Oct 2025

‘एआय’ जनरेटेड व्हिडिओने वाघाला पाजली दारू ! वनविभाग कारवाई करणार का..?

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पातील एका व्हिडिओने मात्र अवघ्या काही क्षणात समाजमाध्यम व्यापले आहे. ‘एआय’ च्या माध्यमातून तयार केलेल्या व्हिडिओमध्ये एक दारुडा चक्क वाघाला दारु पाजताना दिसत आहे. …सविस्तर वाचा
16:09 (IST) 29 Oct 2025

सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध राणे, नगरपंचायत निवडणुकीत दोन भावांमध्ये संघर्ष; आमदार म्हणाले, “युती होईल असं वाटत नाही”

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राणे विरुद्ध राणे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. कारण भाजपा व शिवसेनेची (शिंदे) युती होणार नसल्याचं आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आमदार निलेश राणे हे शिवसेनेसाठी (शिंदे) व मंत्री नितेश राणे हे भाजपासाठी मोर्चेबांधणी करू लागले आहेत. निलेश राणे म्हणाले, आम्ही महायुतीसाठी आग्रही होतो. परंतु, आगामी निवडणुकीत युती होईल असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही स्वबळावर आणि पूर्ण ताकदीने लढू. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. सर्व निवडणुका आम्ही ताकतीने लढणार आणि जिंकणार.

16:01 (IST) 29 Oct 2025

Nagpur Farmers Protest : नाशिकचे शेतकरी नागपूरकडे ! बच्चू कडू यांच्या आंदोलनात…

Bacchu Kadu Maha Elgar Protest Nagpur : महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. नाशिक जिल्हा बँकेचे थकबाकीदार नागपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. …सविस्तर वाचा
16:00 (IST) 29 Oct 2025

जेव्हा अमृता फडणवीसांपेक्षा बाहेरचे लोकच मुख्यमंत्र्यांच्या नवीन कपड्यांचे कौतूक करतात, फडणवीसांनीच सांगितला किस्सा…

दिवाळीला फडणवीसांनी त्यांच्या कपड्यांमध्ये अनोखा बदल केला आहे. यंदाच्या दिवाळीत त्यांनी निळ्या रंगाचा कुर्ता, पायजामा आणि गुलाबी रंगाचा मोदी जॅकेट घातला आहे.सोशल मिडीयावर त्यांची सर्वत्र चर्चा झाली. …अधिक वाचा
15:53 (IST) 29 Oct 2025

Eknath Khadse : “बंगल्यातून सीडींसोबत काही लोकांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे चोरीला…”, एकनाथ खडसेंचा रोख कुणाकडे?

दरम्यान, चोरट्यांनी सोने-चांदीसोबत सीडी, काही लोकांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असलेली महत्वाची कागदपत्रेही चोरून नेल्याचा दावा खडसे यांनी आता केला आहे. …सविस्तर बातमी
15:52 (IST) 29 Oct 2025

Vande Mataram : वंदे मातरम् गीताची १५०वी वर्षपूर्ती… राज्यातील सर्वच शाळांमध्ये संपूर्ण गीताचे गायन !

वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील राजमाता जिजाबाई ट्रस्टतर्फे शिक्षण विभागाने पत्र देण्यात आले होते. …वाचा सविस्तर
15:40 (IST) 29 Oct 2025

कोंडाईबारी महामार्ग पोलीस चौकी पुन्हा चर्चेत…मालमोटार चालकाचे आंदोलन पाच तासानंतर मागे

महामार्ग पोलिसांच्या अवैध वसुली विरोधात मालमोटार चालकाचे कोंडाईबारीजवळ चार ते पाच तास आंदोलन विसरवाडी पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षकांना जावून हे प्रकरण निस्तारावे लागले. …सविस्तर वाचा
15:14 (IST) 29 Oct 2025

गुगल मॅपने रस्ता दाखवला अन…..नाशिकचे कुटुंब कारसह जीवघेण्या फरशी पुलावर अडकले

दिवाळीच्या सणानिमित्त धुळ्यात नातेवाईकांकडे आलेले नाशिक येथील दीपक पाटील हे कुटुंबासह साक्री रोडकडे जात असताना गुगल मॅपने शॉर्टकट म्हणून शनिनगर-जमनागिरी मार्ग दाखवला. …सविस्तर वाचा
15:03 (IST) 29 Oct 2025

Nagpur Farmers Protest : “मी प्रथम शेतकऱ्यांचा, मग बाकी…” बच्चू कडू यांना भेटले एकमेव भाजप आमदार आणि….

bjp mla rajesh bakane meets  Bacchu Kadu : एकीकडे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापूढे आंदोलन करण्याचा निर्धार तर दुसरीकडे त्याच आंदोलनास पाठिंबा देणारा भाजप आमदार. …सविस्तर बातमी
14:57 (IST) 29 Oct 2025

Hit and Run: छठपूजेहून परतणार्‍या दुचाकीचा अपघात; बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

राहुल विश्वकर्मा (२५) हा तरूण विक्रोळी पूर्वेला राहतो. तो एका खासगी कुरियर कंपनीत काम करत होता. …वाचा सविस्तर