Maharashtra News Updates, 29 October 2025 : शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी मंगळवारी (२८ ऑक्टोबर) संध्याकाळपासून नागपूर हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला आहे. त्यामुळे यवतमाळ नागपूर, चंद्रपूर -नागपूर हे सर्व महामार्ग बंद पडले आहे. महामार्गांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या चक्काजाम आंदोलनात भाजपाचे आमदारही अडकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे की दुपारी १२ वाजेपर्यंत “आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही महाराष्ट्र जाम करणार.” तर, “बच्चू कडू यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत”, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.

नागपुरातील आंदोलनामुळे चार राष्ट्रीय महामार्ग ठप्प असून १४ तासांहून अधिक काळ वाहतूक बंद आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या आंदोलनाच्या सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

दरम्यान, फलटणमधील डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफासामुळेच झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. तर, मुलीच्या कुटुबियांनी हत्येचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातील सर्व अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत.

शिवसेनेने (उबाठा) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून मुंबई महानगरपालिकेत पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ज्यांचं वय ६० वर्षांहून अधिक असेल त्यांनी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

मोंथा चक्रीवादळाने आंध्र प्रदेश व ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर थैमान घातलं आहे. या चक्रीवादळाने आतापर्यंत तिघांचा बळी घेतला आहे. तर, सुरक्षिततेसाठी हजारो लोकांना किनाऱ्यापासून दूर हलवण्यात आलं आहे.

Live Updates

Maharashtra Weather Today Live Updates : राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

14:52 (IST) 29 Oct 2025

एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून ‘त्या’ सीडींची चोरी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील बंगल्यातून सोने-चांदीसह रोख रकमेची चोरी झाल्याची घटना मंगळवारी (२८ ऑक्टोबर) उघडकीस आली होती. दरम्यान, चोरांनी त्यांच्या घरातून सोने-चांदीबरोबर खडसेंच्या काही महत्वाच्या सीडी व कागदपत्र देखील लंपास केले आहेत. स्वतः खडसे यांनी बुधवारी दुपारी प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती दिली.

14:49 (IST) 29 Oct 2025

आणखी एक हुंडाबळी; विषप्रयोग करून विवाहितेची हत्या

उत्तर प्रदेशात राहणार्‍या नेहा गुप्ता (२४) या तरुणीचा विवाह १६ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईत राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणासोबत सोबत झाला होता. …वाचा सविस्तर
14:47 (IST) 29 Oct 2025

Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : Video : राष्ट्रीय महामार्ग दहा तासांपासून ठप्प; दुतर्फा २० किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा….

NH 44 Highway Blocked : महाएल्गार आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग ४४ वरची वाहतूक गेल्या १० तासांहून अधिक कालावधीपासून ठप्प झाली आहे. …सविस्तर बातमी
14:44 (IST) 29 Oct 2025

सुरेश धस यांच्या भोवती पंकजा मुंडेंचे रिंगण ?

बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी केज आणि आष्टी मतदारसंघात लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगताच, हे विधान आमदार सुरेश धस यांच्याभोवती राजकीय रिंगण आखण्याचे संकेत म्हणून घेतले जात आहेत. …वाचा सविस्तर
14:27 (IST) 29 Oct 2025

Eknath Khadse : जळगावमध्ये खळबळ… एकनाथ खडसेंच्या बंगल्यावरून ‘त्या’ सीडींची चोरी !

Eknath Khadse Bungalow Robbery : दरम्यान, चोरट्यांनी सोने-चांदीसोबत खडसेंच्या काही महत्वाच्या सीडीही सोबत नेल्या आहेत. …अधिक वाचा
14:24 (IST) 29 Oct 2025

एसटीला दिवाळी हंगामात करोडोंचे उत्पन्न

यावर्षी १८ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या दिवाळीच्या १० दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३० कोटी याप्रमाणे तब्बल ३०१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. …वाचा सविस्तर
14:21 (IST) 29 Oct 2025

स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाला ५०० कोटींचा निधी देण्यास वित्त विभागाकडून विरोध!

या प्राधिकरणाला आर्थिक निधी देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाच्या अभिप्रायासाठी सादर करण्यात आला होता. त्यावेळी वित्त विभागाने या प्राधिकरणाला आर्थिक निधी देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. …वाचा सविस्तर
14:16 (IST) 29 Oct 2025

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारात दाखल झालेल्या हापूसला विक्रमी दर; ६ डझनांच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपये

कोकणातून इतक्या लवकर आंबा मुंबईत पोहोचणे ही एक वेगळीच घटना ठरली असून, आंब्याला विक्रमी दर मिळाल्याने बाजारात “हापूसची दिवाळी” अशीच चर्चा रंगू लागली आहे. …वाचा सविस्तर
14:15 (IST) 29 Oct 2025

Farmers Protest Nagpur Traffic Jam : बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे रुग्णांची फरफट…‘एनसीआय’, ‘एम्स’ आणि इतर रुग्णालयांत…

Bacchu Kadu Maha Elgar Protest Nagpur : वर्धा रोडवरील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (एनसीआय), एम्स आणि इतरही रुग्णालयांत जाणारे रुग्ण वेगवेगळ्या भागात तासंतास अडकून पडले आहे. …सविस्तर बातमी
14:09 (IST) 29 Oct 2025

Video: दादर रेल्वे स्थानकात मद्यधुंद तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी वाचवले प्राण

दादर रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० च्या सुमारास फलाट क्रमांक १२ वर घडली. …वाचा सविस्तर
14:03 (IST) 29 Oct 2025

Vasai Virar Drug Case: महामार्गालगत उभे राहत असलेले अमली पदार्थांचे कारखाने कुठे आहेत ?

वसई, नालासोपारा , भाईंदर या भागातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळून येत आहेत. विशेषतः शहरात फोफावत असलेल्या अनधिकृत गाळ्यात व शेड मध्ये छुप्या मार्गाने कारखाने चालविले जात आहेत. …वाचा सविस्तर
14:03 (IST) 29 Oct 2025

नाशिक जिल्ह्यात साईभक्तांच्या मोटारीला अपघात…सुरतचे तीन जण ठार

चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर मोटारीला भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर, चार जण जखमी झाले. …सविस्तर वाचा
13:54 (IST) 29 Oct 2025

मोमीनपुरा उड्डाणपुलाचे काम ठप्प; काँग्रेस कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर फेकले फुल

महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) हाती घेतलेल्या कडबी चौक–मोमिनपूरा उड्डाणपुलाच्या कामास पुन्हा एकदा विलंबाचा ग्रह लागला आहे. …वाचा सविस्तर
13:45 (IST) 29 Oct 2025

Gold-Silver Price : सोने, चांदीत पडझडीनंतर आणखी मोठा बदल… जळगावमध्ये आता किती दर ?

जागतिक स्तरावरही अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा असूनही सोन्याच्या किमतींमध्ये थोडीशी वाढ झाली. …सविस्तर बातमी
13:41 (IST) 29 Oct 2025

Outsourcing Recruitment : माहिती व जनसंपर्क विभागातील ६८ पदे ‘आऊटसोर्सिंग’ पध्दतीने भरणार…काय आहे शासन निर्णय ?

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, मोहिमा व उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, त्यासाठी सर्व प्रकारच्या शासकीय बातम्या प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्याची जबाबदारी प्रामुख्याने या विभागाची असते. …अधिक वाचा
13:40 (IST) 29 Oct 2025

अवकाळी पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, आमदार किसन कथोरे यांची मागणी

१९ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी आणि परतीच्या पावसाने या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले. अनेक शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले भात पिक पूर्णपणे भिजून गेले, तर काही ठिकाणी पाण्याखाली गेले. …सविस्तर वाचा
13:31 (IST) 29 Oct 2025

Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : राज्य शासनाचे दोन राज्यमंत्री चार वाजता बच्चू कडूंच्या भेटीला येणार

Maha Elgar Protest Nagpur : हे दोन्ही मंत्री बुधवारी दुपारी चार वाजता नागपूर येथे येतील व आंदोलनस्थळी जाऊन कडू यांची भेट घेतील. …अधिक वाचा
13:21 (IST) 29 Oct 2025

Bacchu Kadu Maha Elgar Protest Nagpur : अंध, अपंग, मूक बधीर शेतकरी आंदोलनात….पोलिसांच्या हस्तक्षेपावर मर्यादा

Nagpur Farmers Protest : आंदोलकांना पिटाळून लावण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करण्यावरही मर्यादा आल्या आहेत. …सविस्तर बातमी
13:04 (IST) 29 Oct 2025

Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : नागपुरात बच्चू कडूंच्या समर्थकांचे रेल्वे रोको आंदोलन सुरू

Nagpur Farmers Railway Roko Protest : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांनी आज नागपूरात मोठे रेल्वे रोको आंदोलन सुरू केले आहे. …सविस्तर वाचा
12:54 (IST) 29 Oct 2025

Child Kidnapping : नागरिकांच्या सतर्कतेमुळे बालक अपहरणाचा प्रयत्न फसला; परप्रांतीय कामगार जेरबंद

मोमीन तालीफ मोमीन तौसिफ (६) असे अपहृत बालकाचे नाव आहे. दरेगावच्या गुलाब पार्क भागात तो खेळत असताना एक अनोळखी इसम तेथे आला. त्याने पैशाचे आमिष दाखवत तालीफ यास एका ऑटो रिक्षात बसवले. …वाचा सविस्तर
12:50 (IST) 29 Oct 2025

Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले “उघड्यावरची रात्र आम्हाला नवीन नाही; पण आता भगतसिंगगीरी सुरू होईल!”

Nagpur Farmers Protest : काल रात्री बच्चू कडू स्वतः शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर झोपले, तर आज सकाळी पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. …वाचा सविस्तर
12:43 (IST) 29 Oct 2025

शेतकऱ्याचा असाही फंडा, तुरीसोबत गांजाचे मिश्र पीक; पोलिसांच्या कारवाईनंतर…

या प्रकरणी शेतकरी प्रदीप पांडू आडे (४५, रा. धानोरा तांडा, ता. महागाव) याला अटक करण्यात आली आहे. या शेतकऱ्याने शेतात तुरीच्या पिकाबरोबर गांजाची लागवड केली. …सविस्तर बातमी
12:43 (IST) 29 Oct 2025

शेतकऱ्याचा असाही फंडा, तुरीसोबत गांजाचे मिश्र पीक; पोलिसांच्या कारवाईनंतर…

या प्रकरणी शेतकरी प्रदीप पांडू आडे (४५, रा. धानोरा तांडा, ता. महागाव) याला अटक करण्यात आली आहे. या शेतकऱ्याने शेतात तुरीच्या पिकाबरोबर गांजाची लागवड केली. …सविस्तर बातमी
12:40 (IST) 29 Oct 2025

“काही हौसे नवसे गवसे आंदोलनात शिरून…”, मुख्यमंत्री फडणवीसांचा बच्चू कडूंना सावधानतेचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आंदोलकांनी लोकांना त्रास होईल असं काहीही करू नये. अशा प्रकारच्या आंदोलना काही हौसे नवसे गवसे शिरतात. अर्थात ह्या आंदोलनात शेतकरी देखील आहेत. परंतु, अनेक लोक, वेगवेगळ्या प्रवृत्ती आंदोलनात शिरून आंदोलनाला हिंसक वळण कसं देता येईल यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे.”

12:40 (IST) 29 Oct 2025

घृणास्पद: मदरशाने विद्यार्थिनींकडून मागितले ‘कौमार्य प्रमाणपत्र’; राज्यातील मदरसे, अल्पसंख्याक संस्थांमध्ये चौकशीचे आदेश

पालकांनी वैद्यकीय अहवाल सादर करण्यास नकार दिल्यावर मुलीचे नाव मदरशातून वगळण्यात आले आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देऊन घरी पाठवण्यात आले. …सविस्तर वाचा
12:37 (IST) 29 Oct 2025

Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : समृद्धी मार्गावर टायर जाळले; बच्चू कडूंच्या आंदोलनाने घेतले उग्र वळण…

Nagpur Farmers Protest Latest News : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी उग्र वळण लागले आहे. …सविस्तर बातमी
12:28 (IST) 29 Oct 2025

पाच वर्षांत देशात वाढणार ७५ हजार वैद्यकीय जागा! वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाचा मुद्दा अधांतरीच….

गेल्या दशकात देशात वैद्यकीय शिक्षण संस्थांची आणि जागांची संख्या जवळपास दुप्पट झाली असून यामुळे डॉक्टरांची उपलब्धता आणि आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया वेगवान झाल्याचे आरोग्यमंत्रालयाचे म्हणणे आहे. …अधिक वाचा
12:27 (IST) 29 Oct 2025

पाच वर्षांत देशात वाढणार ७५ हजार वैद्यकीय जागा! वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाचा मुद्दा अधांतरीच….

गेल्या दशकात देशात वैद्यकीय शिक्षण संस्थांची आणि जागांची संख्या जवळपास दुप्पट झाली असून यामुळे डॉक्टरांची उपलब्धता आणि आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया वेगवान झाल्याचे आरोग्यमंत्रालयाचे म्हणणे आहे. …अधिक वाचा
12:23 (IST) 29 Oct 2025

Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंचा निर्धार! रस्त्यावर रात्र, सकाळी ठिय्या…

Nagpur Farmers Protest Latest News : माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी वर्धा मार्गावर पांजरा वळण रस्त्यावर आंदोलन करत आहेत. …सविस्तर बातमी
12:21 (IST) 29 Oct 2025

पुण्यात रिक्षांमुळे वाहतूक कोंडी, परवाने देणे बंद करा, कोणी केली राज्य सरकारकडे मागणी !

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यांच्या समन्वय समितीच्या बैठक झाली. या बैठकीत शहरात नवीन रिक्षांना परवाना देणे थांबविण्यात यावे, अशी विनंती राज्य सरकारला करण्याचे ठरविण्यात आले. …अधिक वाचा