Today’s Live News Update, 03 January 2024: राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय व सामाजिक वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचवेळी दुसरीकडे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही बाजूंनी पक्षीय पातळीवर कामाला सुरुवात केल्याचं दिसत आहे. त्यातच १० जानेवारीला शिवसेनेतील आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांचा निकाल येणार असल्यामुळे त्यावरही तर्क-वितर्कांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Mumbai Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एकाच क्लिकवर!
शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं आजपासून दोन दिवसीय शिबीर सुरू झालं असून त्यामध्ये विविध नेतेमंडळी आपापली भूमिका मांडणार आहेत. यावेळी शरद पवारही गटाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
पुणे: मिळकतकरातून महापालिकेला आतापर्यंत एक हजार ८१५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत उत्पन्न ३०० कोटींनी जास्त आहे. चालू आर्थिक वर्षाअखेरपर्यंत मिळकतकरातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख आर्थिक स्त्रोत आहे. चालू आर्थिक वर्षात मिळकतकरातून दोन हजार कोटींपेक्षा उत्पन्न मिळेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यादृष्टीने मिळकतकराची थकबाकी वसुली करण्यास कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून प्राधान्य देण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापर्यंत मिळकतकरातून १ हजार ८१५ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले असून, पुढील तीन महिन्यांत उत्पन्नात ४०० ते ५०० कोटींनी वाढ होईल, असा अंदाज कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी मिळकतकरातून ७८ लाख रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत यंदा ३०० कोटींनी जास्त उत्पन्न मिळाले आहे.
महायुतीकडून येत्या १४ जानेवारी रोजी राज्यभर जिल्हा स्तरावर एकाच वेळी मेळावे घेतले जाणार असल्याची घोषणा आज संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यातून ४५हून जास्त खासदार महायुतीचे निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
LIVE |?मुंबई | महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद https://t.co/uy7lTwZP7w
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 3, 2024
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स
Maharashtra Mumbai Marathi News Live Updates: मराठा आरक्षणासंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट