Maharashtra News Highlights: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. तसेच पुण्यातील गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून शस्त्रपरवाना मंजूर करण्यात आल्याच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत २ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करावा आणि २०१४ पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी या मागण्यांसाठी आज नागपूर येथे ओबीसी समाजाकडून मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लागच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Live Updates
Maharashtra Mumbai News Live Updates : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…
12:07 (IST) 10 Oct 2025
बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या सुटकेचे आदेश… पोलिसांच्या केलेल्या चुकीमुळे निर्णय
आरोपीला या प्रकरणात औपचारिकरित्या अटक करण्यात आल्याचे दाखविण्यापूर्वी त्याला संपूर्ण दिवस पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. …अधिक वाचा
12:06 (IST) 10 Oct 2025
कल्याण, कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो मार्गांना गती द्या, नगरविकास विभागाचे ‘एमएमआरडीए’ला पत्र
या शहरातील बहुतांशी वर्ग हा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पश्चिम उपनगरात नोकरी करणारा आहे. या वाढत्या लोकसंख्येला प्रवासासाठी फक्त रेल्वे मार्ग हा एकमेव आधार आहे. …सविस्तर बातमी
12:06 (IST) 10 Oct 2025
विदेशात राहून कोट्यवधी कमावले, जादा परताव्याच्या अमीषाने फटक्यात गमावले
ठाण्यातील कापूरबावडी भागातील एका गृहसंकुलात ४६ वर्षीय फसवणूक झालेली महिला राहते. तर तिचा ५६ वर्षीय भाऊ ओमान देशातील एका कंपनीमध्ये कामाला आहे. …सविस्तर वाचा
12:06 (IST) 10 Oct 2025
thakare bandhu : मुंबईत माहित नाही, पण ठाण्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेने वाटचाल, आज होणार….
मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये बैठकांचे सत्र होत आहे. त्यातच आज ठाण्यातील मनसे आणि ठाकरेंचे नेते एकत्र येणार आहेत. …अधिक वाचा
काही प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने इच्छूक पुरूष उमेदवारांनी पत्नीसाठी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. दोन्ही शहरात आरक्षण सोडतीवर संमिश्र प्रतिक्रिया उटमत आहेत. …सविस्तर वाचा
12:05 (IST) 10 Oct 2025
जलपर्णीच्या पर्यावरणपूरक पुनर्वापराचा नवा पर्याय !, दिवाळीच्या मुहूर्तवार परडीना उत्तम मागणी
यंदाची दिवाळी जलपर्णी पासून विविध वस्तू तयार करणाऱ्या महिला बचत गटांसाठी आर्थिकदृष्टया उत्तम ठरत आहे. …सविस्तर बातमी
12:04 (IST) 10 Oct 2025
ग्रामीण महिला उद्योजिकांचा दिवाळी ग्राहकपेठांमध्ये वाढता सहभाग
दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई परिसरातील बाजारपेठा दिवाळी साहित्यांनी सजल्या आहेत. …सविस्तर बातमी
12:04 (IST) 10 Oct 2025
ठाणे पालिकेने केलीय ऑक्सिजन पार्कची निर्मीती; शंभरहून अधिक औषधी वनस्पतीची उद्यानात लागवड
उद्यानात चालण्यासाठी मार्गिका, योगा आणि व्यायाम करण्यासाठी व्यवस्था, बांबू पथ, छोट्या तलाव सौदर्यीकरण, अशी कामे करण्यात आलेली असून दिवाळीच्या कालावधीत या उद्यानाचे लोकार्पण करण्याची तयारी पालिकेकडून सुरू आहे. …सविस्तर बातमी
12:04 (IST) 10 Oct 2025
ठाण्यात पंतप्रधान आवास योजनेसाठी नवा प्रस्ताव; पीपीपी प्रस्ताव गुंडाळला; अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम तत्वावर घरांची निर्मीती
या प्रकल्पासाठी एकूण ७५० कोटी १३ लाखांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च लाभार्थीकडून घेऊन ठेकेदाराला देण्यात येणार आहे. …सविस्तर वाचा
12:03 (IST) 10 Oct 2025
Mira Road Cancer Hospital News: मिरा रोड येथे कर्करोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय रद्द?
मिरा रोड येथे कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला १४० कोटी रुपयांचा निधी अन्य ठिकाणी वळवण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे केली आहे …सविस्तर बातमी
12:02 (IST) 10 Oct 2025
वसईतील रस्ते अजूनही खडबडीत; दुरुस्ती कामे नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा पालिकेचा दावा
वसई विरार शहरात यंदा झालेल्या पावसामुळे विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा त्रास वाहनचालकांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे …अधिक वाचा
12:02 (IST) 10 Oct 2025
महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका नवी मुंबईला; अनेक भागात वीजपुरवठा खंडीत
सीवूड्समधील सेक्टर-४४ मध्ये वीजपुरवठा पूर्णपणे बंद आहे, तर सेक्टर-४८, ४६ आणि ४८(अ) मधील काही सोसायट्यांमध्ये आंशिक पुरवठा खंडीत आहे. …वाचा सविस्तर
11:50 (IST) 10 Oct 2025
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा मोठा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक सर्वसामान्य कुटुंबातून न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. …सविस्तर बातमी
11:38 (IST) 10 Oct 2025
‘सरकारकडे पैसा नाही म्हणून…’ एआयसीटीईचे अध्यक्ष काय म्हणाले?
तंत्रशिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एआयसीटीई करत असलेले काम, नवे अभ्यासक्रम, शिक्षक प्रशिक्षण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. …वाचा सविस्तर
10:56 (IST) 10 Oct 2025
महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश गवईंचा अवमान प्रकरणात महाराष्ट्र शासन निष्क्रिय का? थेट मुख्यमंत्र्याना कारवाईचे आदेश देण्याची….
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरुममध्ये जोडा फेकण्याचा गंभीर प्रयत्न केला. …वाचा सविस्तर
10:53 (IST) 10 Oct 2025
मालवणी पोलीस ठाण्यातील चार पोलीस निलंबित, पैसे घेत असल्याची चित्रफित व्हायरल
काही दिवसांपूर्वी या पोलिसांची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती. त्यात हे पोलीस कर्तव्य बजावत असताना पैसे घेत असल्याचा दावा करण्यात आला होता. …सविस्तर वाचा
10:28 (IST) 10 Oct 2025
उद्या शिवसेनेचा संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चा; संजय राऊतांनी दिली माहिती
आमची मागणी आहे हेक्टरी ५० हजार मिळाले पाहिजेत. जमीन खरडून गेली आहे, त्या शेतीची नव्याने उभारणी करण्यासाठी लागणारा खर्चतर नाहीच, तीन हजार रुपये सुद्धा हातात येत नाहीत. अशा अनेक विषयांसंदर्भातील मागण्यासाठी शिवसेना उद्या मराठवाड्यातील संभाजीनगर येथे ‘हंबरडा मोर्चा’ काढणार आहे. उद्धव ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
10:27 (IST) 10 Oct 2025
‘पंतप्रधान मोदींना कोणी प्रश्न विचारू नयेत म्हणून…’; संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप
दोन दिवसांपूर्वी सरकार मोदींच्या स्वागतात अडकून पडलं. पंतप्रधान मोदी येतील आणि मराठवाड्याच्या पूरग्रस्तांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करतील अशी आमची अपेक्षा होती. पण हे ओझं मोदींवर पडू नये आणि मोदींना कोणी प्रश्न विचारू नयेच म्हणून देवेंद्र फडणीस यांनी मोदी येण्याच्या आधी ३१ हजार कोटींचं एक पॅकेज धूळफेक करावी अशा पद्धतीने जाहीर केलं. शेतकऱ्यांच्या हातात तीन हजार देखील पडत नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.
Maharashtra Mumbai News Live Updates : दिवसभरातील सर्व