Mumbai- Pune Rain Updates : नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी जाहीर केले आहे. यानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहरात पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आणि जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान येत्या काही तासांत मुंबईत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

Live Updates

Mumbai Rain Update : राज्यातील पावसासंबंधीत आणि इतरही सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

12:34 (IST) 15 Sep 2025

Mumbai MD Drug Racket : घरात, शेतात आणि गोठ्यातही एमडीचे उत्पादन; स्थानिक पातळवरील निर्मितीने पोलिसांपुढे आव्हान

MD Drug Local Production : पूर्वी परदेशातून तस्करीच्या मार्गाने येणारा एमडी (मॅफेड्रॉन) हा अमली पदार्थ आता स्थानिक पातळीवर तयार करण्यात येऊ लागले आहे. …वाचा सविस्तर
12:34 (IST) 15 Sep 2025

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड

सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
12:28 (IST) 15 Sep 2025

Nitin Gadkari on Ethanol Critics: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, “माझ्या बुद्धीची किंमत महिन्याला २०० कोटी…”

Nitin Gadkari on Ethanol Policy : मी हे सगळं पैशांसाठी करतोय असं तुम्हाला वाटतंय का? इमानदारीने पैसे कसे कमवायचे हे मला माहिती आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. …अधिक वाचा
12:15 (IST) 15 Sep 2025

Uran Rain News: उरणमध्ये विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस; जनजीवन विस्कळीत, सोमवारचा दिवस पावसाचा

उरण तालुक्यात मे पासून आजपर्यंत सरसरी पेक्षा अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस आता पर्यंत झालेला सर्वाधिक पाऊस आहे. …अधिक वाचा
12:14 (IST) 15 Sep 2025

कुत्र्यांच्या दहशतीत गोंदिया; रस्त्यावर चालणंही धोकादायक!

गोंदिया जिल्ह्यात असे कोणतेही गाव किंवा शहर नाही, प्रत्येक वस्ती, गल्ल्या भटक्या आणि बेवारस कुत्र्यांनी भरलेल्या नाहीत. …सविस्तर वाचा
12:10 (IST) 15 Sep 2025

“कोण म्हणते, गरिबांना कर्ज दिल्यावर बुडते…”, गडकरी थेटच बोलले

सत्तेचे विकेंद्रीकरण झाले, तसे संपत्तीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे,’ असे मत केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केले. …सविस्तर बातमी
12:02 (IST) 15 Sep 2025

Railway Updates: मध्य रेल्वेची वाहतुक उशीराने, नोकरदारांचे हाल, सरकते जीनेही बंद

ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध, बालकांना त्रास सहन करावा लागला. नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. …वाचा सविस्तर
12:00 (IST) 15 Sep 2025

उपराजधानीत खासगी बसचालकांची शिरजोरी

शहरातील रस्त्यांवर खाजगी बसेस थांबवण्यास आणि पार्किंग करण्यास वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी बंदी घातली होती. …अधिक वाचा
11:45 (IST) 15 Sep 2025

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले…. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी….

जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोविस तासांत सरासरी ९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. …सविस्तर बातमी
11:44 (IST) 15 Sep 2025

IND vs PAK : उद्धव ठाकरेंना भाजपने सुनावले; शेलार म्हणाले, “तर ते आलेपाक खाणे बंद करतील…”

आशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरुन विरोधकांकडून सरकारवर टीका झाली. या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला होता. …सविस्तर वाचा
11:35 (IST) 15 Sep 2025

पावसाने रात्रभर झोडपले… कुठे किती पाऊस?

पुणे शहर, पिंपरी चिंचवड, ग्रामीण भाग अशा सर्वच ठिकाणी पावसाचा जोर आहे. घाटमाथ्यावरही पावसाचे प्रमाण जास्त आहे. …अधिक वाचा
11:34 (IST) 15 Sep 2025

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत, काही रेल्वे स्थानकांदरम्यान पाणी साचले

मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकादरम्यान आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकात पाणी साचल्याने रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा वेग मंदावला. …अधिक वाचा
11:33 (IST) 15 Sep 2025

पनवेल : गुंड राजकुमार म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल

तळोजातील या भांडणांमध्ये दोन्ही प्रकरणातील तक्रारदारांनी रिव्हॉल्वरचा वापर केल्याचा उल्लेख केल्यामुळे या प्रकरणाला गॅंगवारचे स्वरूप आले. …सविस्तर वाचा
11:26 (IST) 15 Sep 2025

मुंबईत मध्यरात्रीपासून कुठे-किती पाऊस झाला? BMCने सांगितली आकडेवारी

मुंबईत १५ सप्टेंबर २०२५ मध्यरात्री १२ वाजे पासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली १० ठिकाणे

(पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये)

१) पाली चिंबई, महानगरपालिका शाळा, वांद्रे – १७६

२) वरळी अग्निशमन केंद्र – १७०

३) आदर्श नगर महानगरपालिका शाळा – वरळी १६८

४) वांद्रे अग्निशमन केंद्र – १६७ ५) फ्रॉसबेरी जलाशय – १६७

६) दादर अग्निशमन केंद्र – १६०

७) कुलाबा अग्निशमन केंद्र – १५९

८) सुपारी टॅंक महानगरपालिका शाळा, वांद्रे – १५८

९) खार दांडा महानगरपालिका शाळा, पाली हिल – १४८

१०) ए विभाग कार्यालय – १३७

11:22 (IST) 15 Sep 2025

Mumbai Monorail Breakdown : दोन तासानंतर मोनोरेल सेवा पूर्ववत

Mumbai Monorail : या गाडीतील १७ प्रवाशांना महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या (एमएमएमओसीएल) अधिकारी-कर्मचार्यांनी सकाळी ७.४० वाजता सुखरुप बाहेर काढले. …वाचा सविस्तर
11:22 (IST) 15 Sep 2025

Pooja Khedkar Controversy : पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; नवी मुंबईतून ट्रक चालकाचे अपहरण प्रकरणात पोलिसांशी हुज्जत

FIR Against Pooja Khedkar Mother : खेडकर यांना तपासात मदत करण्यास सांगितले. तेव्हा खेडकर यांनी बंगल्याचा दरवाजा बंद करून घेतला, असे सहायक पोलीस निरीक्षक खरात यांनी फिर्यादीत म्हटले आहे. …वाचा सविस्तर
11:09 (IST) 15 Sep 2025

“…तर लाखोंच्या संख्येने विमानतळावर उतरू, सरकारचे १२ वाजवून टाकू”, खासदार बाळ्या मामांचा थेट इशारा

नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले आहे. या विमानतळाचे उद्घाटन लवकरच होणार आहे. …वाचा सविस्तर
11:01 (IST) 15 Sep 2025

​सावंतवाडी: साटेली तर्फ सातार्डा येथील लोहखनिज उत्खननावर तात्काळ बंदी; चुकीच्या पद्धतीने उत्खनन

​जिल्हा खनिकर्म अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी ७ ऑगस्ट रोजी या खाणीची पाहणी केली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. …सविस्तर वाचा
10:48 (IST) 15 Sep 2025

चंद्रपुरात पुन्हा श्रेयवादाची लढाई; भोंगळे, अहीर आणि धोटेंमध्ये दावे-प्रतिदावे

जिवती या अतिदुर्गम तालुक्यातील आठ हजार ६४९.८०९ हेक्टर क्षेत्र वनक्षेत्रातून वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. …सविस्तर वाचा
10:31 (IST) 15 Sep 2025

Navi Mumbai Rain : नवी मुंबईत जोरदार पाऊस ! बेलापूर, नेरूळमध्ये सर्वाधिक पाऊस

नवी मुंबई शहरात व परिसरात मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत असून जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याची घटना घडली आहे. …सविस्तर वाचा
10:28 (IST) 15 Sep 2025
मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत; गाड्या १० मिनिटं उशीराने

मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर लोकल गाड्या १० मिनिटे उशिराने धावत आहेत. मार्गांवर काही ठिकाणी पाणी साचले आहे, मात्र काळजी घेऊन गाड्या अजूनही धावत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे सीपीआरओ यांच्याकडून देण्यात आली आहे.

10:24 (IST) 15 Sep 2025

Maharashtra Police News: “महाराष्ट्र पोलीस गेल्या २५ वर्षांत हॉलिडे मूडमध्ये”, माजी पोलीस महासंचालकांचे परखड मत

मुंबईत दर तिसऱ्या दिवशी एक उद्योजकाची हत्या होत होती. तीन वर्षांत एकट्या मुंबईत १०१ उद्योजकांची हत्या झाली. …अधिक वाचा
10:09 (IST) 15 Sep 2025

Pune Diwali Special Trains : जळगाव, भुसावळ स्थानकांवर पुणे जाणाऱ्या ‘या’ तीन रेल्वे गाड्यांना थांबा…

पुणे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणार्‍या काही रेल्वे गाड्यांना यापूर्वीच जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. …अधिक वाचा
09:58 (IST) 15 Sep 2025

Pune Rain Updates : दिवे घाटात दरड कोसळली, पावसामुळे दहा ठिकाणी झाडे पडली

रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. …अधिक वाचा
09:49 (IST) 15 Sep 2025

Mumbai Rain Traffic Jam Updates : मुसळधार पावसामुळे ‘या’ भागातील वाहतूक संथ; वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल

Traffic Disruption Mumbai: रविवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्गांवर पाणी असून अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. …सविस्तर वाचा
09:49 (IST) 15 Sep 2025

Mumbai Rain Traffic Jam Updates : मुसळधार पावसामुळे ‘या’ भागातील वाहतूक संथ; वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल

Traffic Disruption Mumbai: रविवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्गांवर पाणी असून अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. …सविस्तर वाचा
09:48 (IST) 15 Sep 2025

Thane Accident News: ठाण्याच्या कॅडबरी जंक्शनजवळ भीषण अपघात; रिक्षा टँकरवर आदळून एक ठार तर दोघे गंभीर जखमी

Thane Accident Latest News : ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शनजवळ रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. …सविस्तर बातमी
09:48 (IST) 15 Sep 2025

Panvel Rain News : पनवेलमध्ये पावसामुळे महामार्गावर संथगतीने वाहतूक

सोमवारी सकाळी पावणेसात वाजण्याची समुद्राच्या भरतीची वेळ आणि पावसामुळे शहरात सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. …सविस्तर वाचा
09:48 (IST) 15 Sep 2025

Pune Rain Latest News: पुणे जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट, नदीपात्रालगत राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने काल रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. …सविस्तर वाचा
09:18 (IST) 15 Sep 2025

Mumbai Rain Live Updates : मुंबईला ‘रेड अलर्ट’चा इशारा; पुढील काही तास मुसळधार पाऊस

Mumbai Rain Red Alert : सुधारीत अंदाजानुसार हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. …सविस्तर बातमी