Manoj Jarange Patil Mumbai Today : मनोज जरांगे पाटील हे कुणबी जातप्रमाणपत्रांसह मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. आज (२ सप्टेंबर) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. हा दिवस अनेक घडामोडींनी भरलेला होता. या आंदोलनाविरोधातील याचिकेवर दुपारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पाठोपाठ राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले.
उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी मनोज जरांगे आणि राज्य सरकारला खडे बोल सुनावले. “तुम्हाला आझाद मैदानात केवळ २४ तास उपोषणाला बसण्याची परवानगी दिली होती. तरी तुम्ही कोणत्या अधिकाराने गेल्या चार दिवसांपासून तिथे बसला आहात?” असा प्रश्न उच्च न्यायालयाने जरांगेंच्या वकिलांसमोर उपस्थित केला. त्यावर जरांगे यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे उद्या सकाळपर्यंतची मुदत मागितली होती. ही विनंती मान्य करत उच्च न्यायालयाने सदर सुनावणी बुधवारी (३ सप्टेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब केली आहे.
दुसऱ्या बाजूला, राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील व उपसमितीतील इतर सदस्यांनी आझाद मैदानात उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला आदेश जरांगे यांनी सर्व आंदोलकांसमोर वाचून दाखवला.
हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस राज्य सरकारची मान्यता
हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस महायुती सरकारने मान्यता दिली असल्याचं जरांगे यांनी जाहीर केलं. यावर विखे पाटील म्हणाले, “सरकारचा प्रस्ताव आंदोलकांना मान्य झाला की आम्ही त्याची शासकीय अधिसूचना काढू.” यावर जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही अधिसूचना काढा आम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो. त्यानंतर तुम्ही आम्हाला मुंबईत थांबा म्हणालात तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही गुलाल उधळून निघून जाणार.”
Manoj Jarange Patil Azad Maidan Maratha Aarkshan Andolan Live Updates : मराठा आरक्षणासाठी मुंबईत चालू असलेल्या आंदोलनाविषयीचे सर्व अपडेट्स वाचा एकाच क्लिकवर.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांचा फलक लावून ‘सत्कार’; नारायणगाव ग्रामपंचायतीचा अभिनव ठराव
Manoj Jarange Patil Protest End : आझाद मैदानावर गुलालाची मुक्त उधळण; सरकारने मागण्या मान्य करताच जल्लोष; डिजेच्या तालावर धरला ठेका
Ganeshotsav 2025: खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतले दीपेश म्हात्रे यांच्या गणपतीचे दर्शन
Manoj Jarange Patil Protest End : मराठा आंदोलन संपल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणले “ माझ्यावर टीका झाली तरी…”
Ganeshotsav 2025: सावंतवाडी: मळगाव येथील माळीच्या घरातील गणपतीला सातव्या दिवशी जल्लोषात निरोप
Ganeshotsav 2025: रत्नागिरी जिल्ह्यात गणेशाला भावपूर्ण निरोप; ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ च्या नामघोषात गणेशाचे विसर्जन
कल्याण जवळील वडवली गावात पारंपारिक पध्दतीने गणपतीचे विसर्जन; पालिकेच्या अ प्रभागाकडून गणेशभक्तांचे स्वागत
मुंबई : गणेशोत्सवात रात्री ३४ जादा लोकल धावणार
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं होतं. मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन सुरू होतं. आज आंदोलनाचा पाचवा दिवस होता. या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं आहे. दरम्यान, हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय सरकारने जारी केला आहे.
Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं; उपोषण सोडताना जरांगे पाटील भावूक
Ganeshotsav 2025 : कल्याणमधील सुभेदारवाडा गणेशोत्सवाची १३१ वर्षाची परंपरा; छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज दरबाराचा देखावा
Maratha Reservation News: आंदोलन यशस्वी…आंदोलकांचा जल्लोष…आझाद मैदानात ‘पाटील पाटील’चा जयघोष
“जिंकलो रे राजाहो, तुमच्या…”, आंदोलनाच्या यशानंतर मनोज जरांगेंची उत्स्फुर्त प्रतिक्रिया
कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीने नागरिक हैराण
प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; अंबरनाथमध्ये १०२ तर बदलापूरात ८८ हरकती
तासाभरात सरकार काढणार ‘हे’ ३ जीआर; शिष्टमंडळाशी चर्चेअंती “तुमच्या ताकदीवर जिंकलो”, अशी जरांगेंची प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil Mumbai Protest : न्यायालयाची आजची उर्वरित सुनावणी उद्यावर गेली आहे. त्याआधी ३ वाजता आझाद मैदानावर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहोचलं आहे. वाचा सविस्तर
ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला.., खबरदारी म्हणून पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी, १७ रहिवाशांना तात्पुरता निवारा
Maratha reservation movement : ‘सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है’,वाहने हटविण्यास सुरुवात करताच आंदोलक आक्रमक
Ganeshotsav 2025 : ठाण्यातील या घरगुती गणपतीला इच्छापूर्ती गणपती म्हणून ख्याती;अनेक सिनेकलाकारांची दर्शनासाठी गर्दी
सातारा गॅझेटबाबत काय निर्णय झाला?
सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्याची मागणी आपण सरकारकडे केली होती. त्याबाबत सरकारने सांगितलं आहे की, “सातारा संस्थान, पुणे व औंध गॅझेटची अंमलबजावणी करण्याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल. मात्र, सरकारच्या मते १५ दिवसांत कायदेशीर त्रुटी दूर करून अंमलबजावणी करण्यास सरकारने होकार दिला आहे. आता हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटचे दोन विषय पूर्ण झाले.”
हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करण्याला मान्यता
मनोज जरांगे म्हणाले, “हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी होती. यावर सरकारने निर्णय घेतला आहे. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या प्रस्तावित मागणीसाठी शासन निर्णयाला मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली आहे. या शासन निर्णयानुसार गावातील मराठा जातीच्या व्यक्तींना, गावातील, कुळातील, नातेवाईकांना कुणबी जातीचे प्रमाण पत्र मिळाले असल्यास त्याबाबत चौकशी करून प्रमाण पत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे, म्हणजे हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करण्याला मान्यता देण्यात आली आहे”
Manoj Jarange : मराठा-कुणबी एक, सगेसोयरे ते सरकारी नोकरी…, मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या सरकारनं मान्य केल्या? वाचा संपूर्ण यादी!
शिळफाटा रस्त्याच्या काटई ते मानपाडा चौक रस्ते सीमारेषा पट्ट्या रखडल्याने वाहतूक कोंडी
Ganpati Visarjan 2025 :डोंबिवलीतील रिजन्सी इस्टेट संकुलात गणपती विसर्जन
“…तर रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी झालेली दिसेल”, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला शब्द
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील व उपसमितीतील इतर सदस्यांनी जरांगे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला आदेश जरांगे यांनी सर्व आंदोलकांसमोर वाचला. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस राज्य सरकारने मान्यता देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी यावेळी केली. सरकारने निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव आंदोलकांना मान्य झाला की आम्ही त्याची शासकीय अधिसूचना काढतो असं आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिलं आहे. यावर जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही अधिसूचना काढा आम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो.