Mumbai Weather Forecast Today : राज्यात पावसाचे थैमान चालू असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मुंबई, नवी मुंबई व पनवेल भागातही मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालं आहे. पनवेलमधील जनजीव विस्कळीत झालं आहे. पावसाने मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, रविवारपासून कोसळणाऱ्या या पावसामुळे चार जणांचा बळी गेला असून, मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे.

Live Updates

Maharashtra News Live Updates : राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

17:06 (IST) 16 Sep 2025

उंबार्ली गाव प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेला मुकले! सदोष ऑनलाईन प्रणालीत गावाचे नावच नाही, शेतकऱ्यांमध्ये संताप

अतिवृष्टी, अनियमित पावसाचे सत्र, तसेच पिकांवर होणारे रोग-कीड आदी कारणांमुळे शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे मोठा आर्थिक फटका बसत असतो. …सविस्तर वाचा
16:58 (IST) 16 Sep 2025

AIIMS Mental Health Drive: विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी एम्सचा ‘नेव्हर अलोन’ उपक्रम! आत्महत्या कमी करण्यावर भर…

या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना चोवीस तास मदत, मानसिक आरोग्य तपासणी (स्क्रीनिंग), समुपदेशन, तातडीचे हस्तक्षेप आणि त्यानंतरचे फॉलो-अप अशा सर्व सेवा एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. …सविस्तर वाचा
16:52 (IST) 16 Sep 2025

आंबिवली येथील अदानी समुहाच्या अंबुजा सिमेंट प्रकल्पाला नागरिकांचा जोरदार विरोध

मोहने, आंबिवली, अटाळी, टिटवाळा, मांडा, गाळेगाव, शहाड परिसरातील नागरिक, तसेच राजकीय, पर्यावरणप्रेमी नागरिक अधिक संख्येने या जनसुनावणीला उपस्थित होते. …सविस्तर वाचा
16:48 (IST) 16 Sep 2025

Redevelopment stalled: मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेतील चार हजार इमारतींचा पुनर्विकास रखडला

राज्यभर मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेतील ४२०० इमारती आहेत. या इमारती ४० वर्षांहून अधिक जुन्या असून अनेक इमारतींची प्रचंड दूरवस्था झाली आहे. …अधिक वाचा
16:44 (IST) 16 Sep 2025

शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप, उबाठा, मनसेचा सामना; ठाण्यातील शंभर वर्ष जुन्या स्पोर्टींग क्लब कमिटीची निवडणूक

मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेल्या शतायुषी स्पोर्टींग क्लब कमिटीची त्रैवार्षिक निवडणुक शुक्रवार, १९ सप्टेंबरला सेंट्रल मैदावरील क्लबच्या सभागृहात होणार आहे. …अधिक वाचा
16:31 (IST) 16 Sep 2025

पालघर : मोखाडा हद्दीत मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच

मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत सापडलेला मृतदेह हा नाशिक येथील इगतपुरी तालुक्यातील शरद कोंडाजी बोडके (३१) या तरुणाचा आहे. …वाचा सविस्तर
16:21 (IST) 16 Sep 2025

कात्रज ते हिंजवडी इलेक्ट्रिक डबलडेकर बसची चाचणी यशस्वी

एका बस ची किंमत २ कोटी रुपये असून ८५ प्रवाशांची आसन व्यवस्था आहे.खालील बाजूला ४५ आणि वरील बाजूला ४० प्रवासी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
16:19 (IST) 16 Sep 2025

नागपूर : २३२ हेक्टरवर जागतिक दर्जाचा पर्यावरण पर्यटन प्रकल्प

करारानुसार पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीची २३२.६४ हे.आर. जागा नागपूर प्रदेश विकास प्राधिकरणाला ३० वर्षाच्या भाडे करारावर प्रतिवर्ष एक रूपये भाडेपट्ट्यावर हस्तांतरीत करण्यात येणार आहे. …सविस्तर बातमी
16:10 (IST) 16 Sep 2025

ठाणे : गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’

ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी कल्याण तालुक्यातील खोणी येथे आयोजित करण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
16:08 (IST) 16 Sep 2025

Video : तब्बल सव्वादोनशे अतिक्रमणांवर हातोडा! अजितदादांच्या आदेशानंतर सुरू झालेली चाकणमधील थेट कारवाई सुरुच…

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह (पीएमआरडीए) इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत आहे. …वाचा सविस्तर
15:50 (IST) 16 Sep 2025

नाशिकमध्ये मानव-बिबट्या संघर्ष तीव्र… वन विभागाचे नर बिबट्यांकडे लक्ष का ?

अंधार पडल्यानंतर नागरिकांना बंदीस्त करून घेण्याची वेळ येत आहे. भारनियमनामुळे रात्रीच्यावेळी शेतीला पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागते. …वाचा सविस्तर
15:47 (IST) 16 Sep 2025

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वीज चोरी करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांवर गुन्हे

कल्याणमधील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील तीन व्यापाऱ्यांनी वीज मीटर न घेता आपल्या गाळ्यामध्ये महावितरणची चोरून वीज घेतली. …सविस्तर बातमी
15:29 (IST) 16 Sep 2025

२००८ मालेगाव बॉम्बस्फोट : “तुम्ही खटल्यात साक्षीदार होता का?”, उच्च न्यायालयाची मृतांच्या कुटुंबियांना विचारणा

कोणीही आरोपींच्या निर्दोषत्वाला आव्हान देऊ शकत नाही, अशी टिप्पणीही मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने यावेळी केली. …सविस्तर वाचा
15:21 (IST) 16 Sep 2025

“…तर ठाणेकरांना एकत्र घेऊन मोठा लाँग मार्च काढू”, वाहतुक कोंडीच्या प्रश्नावर मनसे नेते अविनाश जाधव संतापले

ठाण्यात मोठ्याप्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. या प्रश्नावर मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. …अधिक वाचा
15:15 (IST) 16 Sep 2025

पुण्यात मुसळधार पाऊस, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप; नागरिकांची तारांबळ, मार्केट यार्ड पाण्याखाली

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरी सध्या राज्यावर कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम जाणवत आहे. पुण्यात आज (१६ सप्टेंबर) पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यासह आज पुण्याजवळील घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत गेल्या दोन-तीन तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस चालू असून डेक्कन आणि जंगली महाराज रस्त्यावर पाणी साचलं आहे. तर ,मार्केट यार्ड परिसरात पाणीच पाणी झालं आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाल्यासह फळ पाण्यात वाहतानाचे चित्र मार्केट यार्ड परिसरात दिसून येत आहे.

15:05 (IST) 16 Sep 2025

१८ वर्षे उपेक्षा; पण निलंगेकरांना कधी ‘वनवास’ वाटला नाही!

या शांत-सुस्वभावी नेत्याने राजकीय उपेक्षेबाबत कधी कुरकूर केली नाही किंवा आपल्या राजकीय उपेक्षेला ‘वनवास’ म्हटले नाही. शेवटपर्यंत ते काँग्रेसमध्येच राहिले. …वाचा सविस्तर
14:58 (IST) 16 Sep 2025

निजामाच्या काळात रेल्वे रुळ उखडणाऱ्या रणरागिणी कोण होत्या ?

रझाकारांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या रणरागिणी तथा मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई असा गौरव ज्यांचा केला जायचा त्या दगडाबाई देवराव शेळके यांचे स्मारक मात्र, आश्वासन देऊनही कागदावरच राहिले. …अधिक वाचा
14:43 (IST) 16 Sep 2025

Ambadas Danve: मराठवाडा मंत्रिमंडळातील निर्णयास सरकारकडून वाटाण्याचा अक्षता, अंबादास दानवे यांचा आरोप

Ambadas Danve on Marathwada Cabinet Decisions: सरकारने त्याचे या प्रदेशावरचे प्रेम पुतणा मावशीसारखे असल्याचे सिद्ध केले असल्याचा आरोप माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. …सविस्तर वाचा
14:31 (IST) 16 Sep 2025

“शिंदे के नाम से जो जुड़े हैं, वो नवी मुंबई जीतकर ही जाएंगे..”, खासदार नरेश म्हस्के यांचे गणेश नाईकांना आव्हान

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी आणि युवासेना पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. …सविस्तर बातमी
14:29 (IST) 16 Sep 2025

राधानगरी धरणातून पंचगंगेचे पाणी दुधगंगेत; एक हजार सहाशे कोटींचा खर्च अपेक्षित

पुराचे ६५ अब्ज घनफूट पाणी बोगद्याद्वारे भीमा नदीत आणण्याचा प्रस्ताव खर्चिक असून त्यासाठी केंद्र सरकारसह, विविध बँकांकडून निधी प्राप्त करण्याचे विचारधीन आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. …वाचा सविस्तर
14:20 (IST) 16 Sep 2025

कराडला लोकन्यायालयात ६९६ खटल्यात सामंजस्य, ६ कोटी १८ लाख रुपयांच्या तडजोडीतून दावे यशस्वीरित्या निकाली

लोकन्यायालयात तब्बल ६ कोटी १८ लाख रुपयांच्या तडजोडीच्या रकमांसह काही भावनिक नातीही पुन्हा एकत्र आली. …सविस्तर वाचा
14:18 (IST) 16 Sep 2025

महाराष्ट्र ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, मंत्रिमंडळ बैठकीत घेतले आठ मोठे निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (१६ सप्टेंबर) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये नविन ॲनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय

(उद्योग विभाग)

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ जाहीर. सन २०५० पर्यंतचे नियोजन. सुमारे ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा

(वस्त्रोद्योग विभाग)

अकोला येथील दि निळकंठ सहकारी सूतगिरणीला “खास बाब” म्हणून शासन अर्थसहाय मिळणार. अर्थसहाय्याच्या ५:४५:५० या गुणोत्तरानुसार निवड

(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य)

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थींनीसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ. हजारो विद्यार्थ्यी- विद्यार्थिनींना दिलासा

(सहकार व पणन विभाग)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ. राज्यभरात ११६ बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी, व अस्तित्वातील भवनांच्या दुरूस्तीसाठी असा एकूण १३२ कोटी ४८ लाखांचा खर्च. विविध ठिकाणी ७९ नवीन शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव.

(सहकार व पणन विभाग)

आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेस २ वर्षे मुदतवाढ. नागपूर, काटोल, कळमेश्वर, (जि.नागपूर), मोर्शी (जि.अमरावती ) व संग्रामपूर, (जि.बुलढाणा) येथे आधुनिक संत्रा केंद्र उभारण्यात येत आहेत. मुदतवाढीसह योजनेच्या स्वरुपात अनुषंगिक बदल करण्यास मान्यता

(सार्वजनिक बांधकाम विभाग)

भंडारा ते गडचिरोली दरम्यान ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग. प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार. प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनास मान्यता. भुसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता.

(ऊर्जा विभाग)

नवीनकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी संयुक्त उद्यम कंपनी. महानिर्मिती व मे.सतलज जलविद्युत निगम लि. यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मान्यता. राज्यभरात ५ हजार मेगावॅट क्षमतचे प्रकल्प विकसित करणार

(नियोजन विभाग)

राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा.राज्यातील पायाभूत प्रकल्पांबाबत यापुढे उपसमिती यापुढे मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज करणार

14:14 (IST) 16 Sep 2025

डोंबिवली, ठाणे परिसरातील ७० महिला शिक्षिका आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेंद्र करनकाल आणि आयुष ॲकेडमीच्या संचालिका आदिती अजय चौधरी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. …वाचा सविस्तर
14:01 (IST) 16 Sep 2025

उसाच्या हप्त्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; साखर सम्राटांची कोंडी

आगामी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच या माध्यमातून साखर उद्योगाची कोंडी होताना दिसत असून हा मुद्दा या हंगामात राजकीय पातळीवर गाजण्याची शक्यता आहे. …अधिक वाचा
13:59 (IST) 16 Sep 2025

नववर्षात नागपूरला गॅस पाईपलाईनचे दुहेरी ‘गिफ्ट’, ओडिशाचा धामरा पोर्ट थेट…

नागपूरसह विदर्भवासीयांना येत्या नववर्षात दुहेरी गॅस पाईपलाईनचे गिफ्ट मिळणार आहे. …सविस्तर बातमी
13:59 (IST) 16 Sep 2025

नववर्षात नागपूरला गॅस पाईपलाईनचे दुहेरी ‘गिफ्ट’, ओडिशाचा धामरा पोर्ट थेट…

नागपूरसह विदर्भवासीयांना येत्या नववर्षात दुहेरी गॅस पाईपलाईनचे गिफ्ट मिळणार आहे. …सविस्तर बातमी
13:53 (IST) 16 Sep 2025

कराड : व्यावसायिक दांडिया-गरब्याला सकल हिंदू समाजाचा विरोध

सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला या संदर्भातील निवेदन देण्यात आले. या निवेदनावर अनेक समाजबांधवांची नावे आहेत. …अधिक वाचा
13:50 (IST) 16 Sep 2025

कल्याणीनगर, कोरेगाव पार्क येथील पब, बार वर महापालिका मारणार ‘हातोडा’!

कल्याणीनगर, कोरेगांव पार्क, खराडी येथे मोठ्या प्रमाणात बार, पब, रेस्टॉरंट आहेत. मध्यरात्री उशीरापर्यंत हे पब, बार चालू ठेवले जातात. …सविस्तर बातमी
13:48 (IST) 16 Sep 2025

“शरद पवार यांनी प्रायश्चित्त करायला हवे…”, कोणी टीका केली?

‘कुणी काय करावे आणि काय करू नये, हे शरद पवारांनी सांगू नये. लोकांनी त्यांना निवृत्त करण्याऐवजी, काही लोकांनी आता स्वत:हूनच निवृत्ती स्वीकारली पाहिजे,’ असा टोला त्यांनी लगावला. …वाचा सविस्तर
13:44 (IST) 16 Sep 2025

अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांच्या राज्य संघटनेची सूत्र महिलेच्या हाती… निवडणुकीत विजय.. डॉ. मंजुषा गिरी म्हणाल्या…

नागपुरातील प्रसिद्ध न्यूरोडेव्हलपमेंटल बालरोगतज्ज्ञ आणि किशोरवयीन मुलांच्या समुपदेशक म्हणून डॉ. मंजुषा गिरी कार्यरत आहेत. …सविस्तर बातमी

Heavy rains in Maharashtra : राज्यात पावसाचा कहर,चौघांचा बळी; मराठवाड्याला सर्वाधिक फटका (लोकसत्ता टिम)

राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राने त्यात भर घातली आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा पहिला फटका मराठवाड्याला बसला. त्यापाठोपाठ सोलापूर, सांगलीसह मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांमध्येही अतिवृष्टी झाली. कोकणातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरातही रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू आहे, मात्र राज्यात सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होत आहे.