Nagpur News Updates, 11 August 2025 : मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात बेकायदेशीर वन्यजीव व्यापार करणाऱ्यांवर वन विभागाने गुरुवारी संयुक्त धाड टाकली. तसेच,राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर ओसरला असला तरीही बुधवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.दरम्यान, पुणे परिसरातील झपाट्याने झालेले नागरीकरण लक्षात घेता तीन नवीन महानगरपालिका वा हद्दवाढ ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करावी असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
तेव्हा अशा घडामोडींसह मुंबई शहर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर परिसरातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.
Live Updates
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi
श्रीनगरमध्ये शिवसेनेची महारक्तदान यात्रा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग
‘ऑपरेशन सिन्दूर’च्या यशानंतर भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेनेने (शिंदे) महारक्तदान यात्रेचे श्रीनगर येथे रविवारी आयोजन केले होते. …सविस्तर बातमी
कबुतरांना सकाळी ६ ते ८ यावेळेत खाद्य देण्याची परवानगी द्या; दादर कबुतरखाना ट्रस्टची मागणी
कबुतरखाना ट्रस्टनेही सकाळी ६ ते ८ या वेळेत खाद्य देण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडे मागण्यात आल्याचे म्हटले आहे. ही परवानगी मिळत नाही तोपर्यंत खाद्य घालू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.
…वाचा सविस्तर
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ११ ऑगस्ट २०२५
