Nagpur Breaking News Today 14 July 2025: मुंबईतील विक्रोळी वाहतूक विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना घडली. शंकर कोळसे असे मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे. पायाच्या दुखण्याला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत प्रवासी महिला जखमी झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली स्थानकात घडली. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच नागपूर शहरात नियोजन शुन्य कारभार, अपुऱ्या सुविधा, पायाभूत सुविधांची कमतरता, रस्ते, वीज, पाणी सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव, अरुंद रस्ते, बेशिस्त वाहतूक, त्यामुळे होणारी अनागोंदी अशा विचित्र कोंडीत नवे शहर अक्षरशः बकाल झाले आहे. 

तेव्हा मुंबई महानगरसह पुणे आणि नागपूर शहरातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Pune Mumbai Nagpur  News Updates in Marathi

14:48 (IST) 14 Jul 2025

चोरट्याने वाईन शॉप फोडले … १७ लाख रुपयांच्या  महागड्या मद्याच्या बाटल्या पळवल्या….

नवी मुंबईतील वाशी गावातील सिद्धिविनायक इमारतीतील  “व्ही फाय लिव्हिंग लिक्विड्स”  हे वाईन शॉप आहे. …सविस्तर वाचा
14:38 (IST) 14 Jul 2025

दारू पिण्याच्या वादातून लहान भावाचा खून; बिबवेवाडीतील घटना

याप्रकरणी अनितेक दत्तात्रय नवले (वय २६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि अनिकेत सख्खे भाऊन आहेत …अधिक वाचा
14:19 (IST) 14 Jul 2025

करवाढ धोरणाविरोधात वसईत हॉटेल-बारचालकांचा एकदिवसीय संप

वसई तालुका हॉटेल असोसिएशनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या एकदिवसीय संपामुळे आज शहरातील सर्व बार, परमिट रूम आणि हॉटेलमधील मद्यसेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. …अधिक वाचा
14:18 (IST) 14 Jul 2025

डोंबिवलीत पादचारी महिलेला रिक्षाची धडक देऊन पळणाऱ्या चालकाला महिलेने घडवली अद्दल

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात केळकर रस्त्याने पायी चाललेल्या एका ३० वर्षीय महिलेला शुक्रवारी संध्याकाळी पाठीमागू एका रिक्षा चालकाने रिक्षेची जोराने धडक दिली. …वाचा सविस्तर
13:58 (IST) 14 Jul 2025

ठाण्यात मेट्रो स्थानकाच्या जिन्यांचे बांधकाम भररस्त्यात… ठाकरे गटाने मेट्रोच्या कामातील त्रुटींवर ठेवले बोट

घोडबंदर रोड मुख्य रस्त्याचे सेवा रस्त्यात विलीनीकरणाच्या काम सुरू असून या रस्त्याच्या मधोमध मेट्रो स्थानकाचे जिने उभारण्यात येत आहेत. …वाचा सविस्तर
13:51 (IST) 14 Jul 2025

मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करू नये; राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या रक्तपेढ्यांना निर्देश

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्य रक्त संक्रमण परिषदेची आढावा बैठक घेतली. …सविस्तर बातमी
13:21 (IST) 14 Jul 2025

Amruta Fadnavis News: “पुणे हे देवेंद्रजींचं मूल आहे”, अमृता फडणवीसांचं विधान; म्हणाल्या, “पुण्यात खूप समस्या…”

Amruta Fadnavis Pune: अमृता फडणवीस यांनी पुण्यात देवेंद्र फडणवीसांबाबत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठऱलं आहे. …वाचा सविस्तर
13:19 (IST) 14 Jul 2025

विमानतळ रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी एकत्रित कारवाई – महापालिका आयुक्तांचे आश्वासन

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमण आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जाणाऱ्या (पार्क) वाहनांमुळे विमान प्रवाशांना फटका बसत असून, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. …सविस्तर वाचा
13:18 (IST) 14 Jul 2025

पुणे-लोणावळा लोकल आजपासून पूर्ववत; खडकी रेल्वे स्थानकाच्या कामाचा सेवेवर परिणाम

मध्य रेल्वेच्या लोणावळा-पुणे विभागातील खडकी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणाच्या कामाचा परिणाम दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात जाणवला. …सविस्तर बातमी
13:17 (IST) 14 Jul 2025

देवेंद्रजींचे पुण्याकडे विशेष लक्ष – अमृता फडणवीस यांचे प्रतिपादन

येथे आणखी काय सुधारणा करता येतील, हे मी देवेंद्रजींना सांगत असते आणि ते देखील पुण्याकडे विशेष लक्ष देतात,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी रविवारी केले. …वाचा सविस्तर
13:11 (IST) 14 Jul 2025

पालघर हॉटेल असोसिएशनचा एक दिवसीय बंद, मद्य धोरणाविरोधात हॉटेल व्यावसायिक आक्रमक

सरकारच्या या जुलमी निर्णयामुळे चालक-मालकांचा व्यवसाय बळी घेतला जात असून, हे शुल्क त्वरित कमी करण्याची मागणी त्यांनी केली. …सविस्तर बातमी
13:11 (IST) 14 Jul 2025

घाटकोपरची खंडोबा टेकडी बनली उजाड…अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी हजारभर स्थानिकच सरसावले!

दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पवई डोंगर ते खंडोबा टेकडी या भागात झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. एका प्रसिद्ध विकासकाने ही वृक्षतोड केल्याचा दावा करण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
13:08 (IST) 14 Jul 2025

Video: हल्ला झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी हत्या…”

Praveen Gaikwad News: संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्या तोंडावर आणि डोक्यावर शाई ओतण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
13:06 (IST) 14 Jul 2025

अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघड; बोळींज पोलिसांकडून एकाच गुन्ह्यात १२ जणांना अटक

प्रकरणात दोन महिलांचा समावेश असून यातील एक महिला नायजेरियन… …सविस्तर बातमी
13:03 (IST) 14 Jul 2025

लोकांच्या जीवाशी खेळ! पुण्यातील गुडलक कॅफेत बन-मस्का मागवला अन् पहिल्याच घासात काय निघालं पाहा, VIDEO पाहून बसेल धक्का

Goodluck Cafe Viral News: गुडलक कॅफेच्या बन मस्कात निघालं धक्कादायक…VIDEO पाहून हादराल …सविस्तर वाचा
13:02 (IST) 14 Jul 2025

दिल्लीतील व्यापाऱ्याला भीमाशंकरच्या जंगलात चाकूच्या धाकाने लुटले, पुणे स्टेशन परिसरातील रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा

दिल्लीतील व्यापाऱ्याला भीमाशंकराच्या जंगलात रिक्षाचालकाने चाकूच्या धाकाने लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

सविस्तर वाचा…

13:01 (IST) 14 Jul 2025

डोंगरी कारशेड रद्द करा, तात्काळ वृक्षतोड थांबवा; स्थानिकांचे आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडे

मेट्रो ९ मार्गिकेतील मूळ प्रस्तावित कारशेड राई, मुर्धा, मोर्वा येथून हलवून डोंगरी येथे नेले आहे.

सविस्तर वाचा…

12:59 (IST) 14 Jul 2025

कर्नाटकातील राजकीय प्रभावातील इसम कल्याणमध्ये अंमली पदार्थ तस्करीत अटक

तीन जणांकडून १२० कोडेन फाॅस्फेट सिरपच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या. …सविस्तर वाचा
12:33 (IST) 14 Jul 2025

पीएमपीच्या धडकेत प्रवासी महिला जखमी, बेजबाबदारपणामुळे पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण शनिवारी (१२ जुलै) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास नगर रस्त्यावरील वाघोली स्थानकात थांबल्या होत्या. …सविस्तर वाचा
12:25 (IST) 14 Jul 2025

नव्या नागपूरमध्ये पार्किंगचा गुंता, वाहतूक कोंडी…

तळागाळातल्या जनतेच्या जगण्या मरण्याशी निगडीत समस्यांवर उत्तर देण्यास कोणीही बांधील नसल्याने नागरी सुविधा व्हेंटिलेटवर आल्याने अखेरच्या घटका मोजत आहेत. उत्पन्नाचे घटलेले स्रोत आणि बेबंदशाहीमुळे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांची अवस्था बिकट झाली आहे. …अधिक वाचा
12:03 (IST) 14 Jul 2025
पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या; पायाच्या दुखण्यामुळे त्रस्त

मुंबई: विक्रोळी वाहतूक विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

वाचा सविस्तर

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह १४ जुलै २०२५