Mumbai Live Updates, 25 July 2025 : मुंबई शहर आणि उपनगरांत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात संततधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून संततधार पाऊस कोसळत आहे. शहरातील परळ, कुलाबा, वरळी भागात पावसाचा जोर वाढला आहे. उपनगरातील वांद्रे, अंधेरी परिसरात देखील पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांनी व्यक्त केलेली नापसंती तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुढील आठवड्यात चर्चा केल्यावर निर्णय घेण्याची घेतलेली भूमिका यामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर गंडांतर येणार की त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाणार याचीच आता चर्चा सुरू झाली आहे.विधान परिषद सभागृहाचे कामकाज सुरू असतामा भ्रमणध्वनीवर कोकाटे हे रमी खेळत असल्याच्या चित्रफीती समोर आल्या. त्यावरून विरोधकांनी कोकाटे यांची कोंडी केली आहे. त्यातचट कोकाटे यांनी सरकारला भिकाऱ्याची उपमा दिली. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. 

या घडामोडींसह मुंबई,  मुंबई महानगर, नागपूर आणि पुणे शहर परिसरातील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या…

Live Updates

Pune Nagpur Mumbai Breaking News Live Updates in Marathi

14:17 (IST) 25 Jul 2025

पालघरमध्ये ‘श्रावण महोत्सव २०२५’ अंतर्गत प्रथमच जिल्हास्तरीय पाककला स्पर्धा

या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवा आणि सर्वोत्कृष्ट ठरून दुबई, बँकॉक, पट्टाया ची मोफत सफर करा, असे आवाहन श्रावण महोत्सव टीममार्फत यावेळी करण्यात आले. …सविस्तर बातमी
14:05 (IST) 25 Jul 2025

कृत्रिम फुलांचा बाजार उठला…प्‍लास्‍टीक फुलांवरील बंदीने व्‍यावसायिक अडचणीत

राज्यसरकारने प्लास्टीक फुलांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी ही घोषणा केली आहे. …अधिक वाचा
13:56 (IST) 25 Jul 2025

वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन त्रिसूत्री

वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करा, अशी सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. …अधिक वाचा
13:55 (IST) 25 Jul 2025

ट्रॉमा सेंटर व जिल्हा रुग्णालयासाठी उर्वरित निधीची तातडीने पूर्तता करण्याची खासदार यांची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी

रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची कमतरता लक्षात घेता मनोर येथे २०० खाटांचे प्रस्तावित ट्रॉमा सेंटर कार्यरत होणे अत्यावश्यक आहे. …अधिक वाचा
13:48 (IST) 25 Jul 2025

कल्याण डोंबिवली पालिकेतील ‘गैरकारभारी’ कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून पाठराखण?; लाचखोरांची एकूण संख्या ४७

कल्याण डोंबिवली पालिकेतील २० वर्ष एकाच विभागात काम करणाऱ्या ठाणमांड्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासन करीत नाही. अनेक विभागात कर्मचारी, ठेकेदार यांच्या संगनमताने पालिकेच्या तिजोरीची वाटमारी सुरू आहे. …सविस्तर बातमी
13:48 (IST) 25 Jul 2025

कल्याण, डोंंबिवली परिसरात संततधार पाऊस

कल्याण, डोंबिवली शहर परिसरात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले आहेत. रस्त्यावरील खड्डयांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. …सविस्तर बातमी
13:48 (IST) 25 Jul 2025

कल्याण डोंबिवली पालिकेचा मुख्य स्वच्छता अधिकारी सफाई कामगाराकडून लाच घेताना अटक; पालिकेतील ४७ वा लाचखोर

कल्याण डोंबिवली पालिकेतील घनकचरा विभागातील मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत गंगाराम देगलुरकर आणि स्वच्छता निरीक्षक सुदर्शन शांताराम जाधव गुरूवारी पालिकेतील एका सफाई कामगाराकडून २५ हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या सापळ्यात अडकले. …वाचा सविस्तर
13:38 (IST) 25 Jul 2025

खड्डे, रस्ता दुरुस्ती आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवा; मागणीसाठी दिघोडे ग्रामस्थांचे चक्क खड्ड्यात बसून आंदोलन

आंदोलनकर्त्यांनी जवळ जवळ दिड तास चिखलातील खड्ड्यात बसून जनहितार्थ आंदोलन छेडल्याने रस्त्यावर मुंबई व कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग लागली होती. …सविस्तर वाचा
13:36 (IST) 25 Jul 2025

अमेरिकेतील मराठी शाळांमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे मराठीचे धडे

परदेशात जाण्यासाठी इंग्रजीतून शिक्षण घेण्याकडे मराठी कुटुंबातील मुलांचा कल आहे. मात्र अमेरिकेत स्थायिक झालेले मराठीजन हे आपल्या मुलांना मराठीचे धडे देत आहेत, हे उल्लेखनीय आहे. …सविस्तर वाचा
13:35 (IST) 25 Jul 2025

३.७७ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त…चार आरोपी अटकेत….

नवी मुंबईतील कामोठे येथे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा साठवण्यात आला असून मागणी प्रमाणे त्याचे वितरण केले जात आहे. अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. …वाचा सविस्तर
13:20 (IST) 25 Jul 2025

पावसामुळे उरणच्या हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा; हवा निर्देशांक ३० च्या दरम्यान

गेल्या अनेक महिन्यापासून उरण यामध्ये २०० पेक्षा वर हवेचा निर्देशांक नोंदविण्यात येत होता. ही हवेची प्रदुषित मात्रा मानवी शरीसाठी अतिशय हानीकारक आहे. …अधिक वाचा
13:07 (IST) 25 Jul 2025

झोपु योजनेतील काॅर्पस फंड वाढणार; लवकरच प्रति सदनिकेप्रमाणे आता २ ते ३ लाख रुपये काॅर्पस फंड

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्वसित इमारतींसाठी दिल्या जाणाऱ्या काॅर्पस फंडमध्ये वाढ करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने घेतला आहे. …वाचा सविस्तर
13:06 (IST) 25 Jul 2025

पावसाच्या हजेरीनंतर रेल्वे वेळापत्रक विस्कळीत; लोकल दहा मिनटे उशिरा…

शुक्रवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण झाले असून पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतूकवर देखील होऊ लागला आहे. …अधिक वाचा
13:05 (IST) 25 Jul 2025

अटलसेतुला जोडणाऱ्या जासई मार्गिकांची प्रतीक्षा कायम; जासई सुरू करण्यासाठी मार्गिकांसाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित

उरण पनवेल मार्गावरील मार्गिकांमुळे उरण मधील वाहनचालकांना कमी वेळात मुंबई गाठता येणार आहे.मात्र ही मार्गिका सागरी मार्ग सुरू होऊनही दीड वर्षात पूर्ण होऊ शकलेली नाही. …सविस्तर वाचा
12:56 (IST) 25 Jul 2025

तीन तासांत अंधेरी जोगेश्वरीत सर्वाधिक पाऊस

पावसाचे पाणी साचल्याची नोंद झालेली नसली तरी अंधेरी सब वेमध्ये मात्र पाणी साचल्यामुळे सकाळपासून दोन वेळा सब वे बंद करावा लागला. …वाचा सविस्तर
12:45 (IST) 25 Jul 2025

संततधार आणि खड्डयांमुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली

स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली असून महापालिका, एमआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले आहेत. …अधिक वाचा
12:41 (IST) 25 Jul 2025

वसई-विरारमध्ये पावसाचा जोर; सखल भागांत पाणी साचले, वाहतूक मंदावली

शुक्रवारी सकाळपासूनच वसई-विरार शहरात पावसाने जोर धरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरात एकूण १२७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. …सविस्तर बातमी
12:41 (IST) 25 Jul 2025

भाईंदरमध्ये खड्ड्यामुळे महिला रिक्षाचा अपघात; पोलीस ठाण्यात तक्रार

अपघाताच्या धक्क्याने रिक्षाचे पुढचे चाक निखळले. त्या वेळी वाहनात महिला चालकासोबत एक प्रवासीही होता. …सविस्तर वाचा
12:39 (IST) 25 Jul 2025

१० वर्षांत लोकल अपघातात २६ हजार प्रवाशांचा मृत्यू…; रेल्वेकडून फक्त १४०० मृतांच्या वारसांना १०३ कोटींची आर्थिक मदत

उपनगरीय लोकलच्या अपघातात मागील १० वर्षात तब्बल २६ हजार ५४७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १४ हजार १७५ अपघात रुळ ओलांडताना झाले आहेत. …अधिक वाचा
12:39 (IST) 25 Jul 2025

माघी गणेशोत्सवातील दोन गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा; दोन्ही मूर्तीचे २ ऑगस्टला होणार विसर्जन

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या उंच मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे माघी गणेशोत्सवातील पश्चिम उपनगरातील दोन मूर्तींचे अखेर विसर्जन करता येणार आहे. …वाचा सविस्तर
12:39 (IST) 25 Jul 2025

माघी गणेशोत्सवातील दोन गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा; दोन्ही मूर्तीचे २ ऑगस्टला होणार विसर्जन

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या उंच मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे माघी गणेशोत्सवातील पश्चिम उपनगरातील दोन मूर्तींचे अखेर विसर्जन करता येणार आहे. …वाचा सविस्तर
12:36 (IST) 25 Jul 2025

२० वर्षीय तरुणीचा महाविद्यालयात मृत्यू; प्रवेशद्वाराजवळच कोसळळी…

गुरूवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आली. मात्र प्रवेशद्वाराजवळच तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळळी. …अधिक वाचा
12:34 (IST) 25 Jul 2025

१०२ मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार!

राज्यातील १०२ मेळाव्यांमध्ये विक्रमी ५७ हजार तरुणांनी नोंदणी केली, तर २७ हजार तरुणांना एकच दिवशी रोजगार मिळाला आहे. अकोला येथे आयोजित मेळाव्यामध्ये १०७ उमेदवारांची निवड झाली. …वाचा सविस्तर
12:24 (IST) 25 Jul 2025

सावधान; पोलिसांना खोटी माहिती देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी…

११२ सारख्या आपत्कालीन सेवांचा गैरवापर करून खोटी माहिती देणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. …सविस्तर बातमी
11:52 (IST) 25 Jul 2025

पावसाच्या हजेरीमुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली; मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सेवा विस्कळीत

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक सकाळपासूनच मंदावलेली दिसून येत आहे. त्यामुळे दहिसर टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. …सविस्तर वाचा
11:46 (IST) 25 Jul 2025

Video : लोकल गाडी जीवनवाहिनी की जलवाहिनी? ठाण्याहून कर्जतकडे जाणाऱ्या लोकल गाडीत गळती

वेळापत्रक कोलमडलेले, फलाट धोकादायक, पूल मोडकळीस आलेले, आणि आता डब्यांमधून पावसाचे पाणी थेट अंगावर. …अधिक वाचा
11:42 (IST) 25 Jul 2025

पालघर जिल्हावासियांचा रोजचा प्रवास म्हणजे खड्ड्यांशी झुंज; प्रवाशांच्या मनस्तापाचा ‘खड्डा’ रोज खोल होतोय

शहरातील रस्त्यांची बकाल अवस्था झाली असून किरकोळ अपघात हे आता नित्याचे झाले असल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. …सविस्तर बातमी
11:40 (IST) 25 Jul 2025

Thane Water Cut: ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा पाणीपुरवठा होणार बंद…

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे नळजोडण्या खंडीत करण्याचे निर्देश …अधिक वाचा
11:40 (IST) 25 Jul 2025

Thane Water Cut: ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा पाणीपुरवठा होणार बंद…

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे नळजोडण्या खंडीत करण्याचे निर्देश …अधिक वाचा
11:27 (IST) 25 Jul 2025

दारूच्या नशेत खून केल्याची वाच्चता… वर्षभरानंतर आरोपी सापडला

आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर दोन दिवस पोलिसांनी वेशांतर करून परिसरात सापळा रचला होता, त्यावेळी पोलिसांना तो सापडला. …सविस्तर बातमी

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २५ जुलै २०२५