Mumbai Breaking News Today, 10 July 2025 : प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसाठी वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजाचे बुधवारी (काल) पुन्हा एकदा हसे झाले. विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, प्रत्यक्षात दिवसभर शहर आणि उपनगरातही रिमझिम पाऊस पडला. हवामान विभागाने मात्र न झालेला मुसळधार पाऊस आजपासून ओसरण्याचा अंदाज वर्तवला आहे.

तसेच मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील कांबळी वाडी परिसरातील जैन मंदिराचे अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत मुंबई महापालिकेने केलेली कारवाई ही एमआरटीपी कायद्याच्या नियमानुसार करण्यात आली असून ती योग्यच असल्याचा निर्वाळा न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी मंगळवारी सुनावणीच्या वेळी दिला. त्यामुळे याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांनी केलेली कारवाई बरोबर होती, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबई, पुणे, नागपूर या जिल्ह्यांतील तसेच राज्याच्या इतर भागांतील ताज्या बातम्या या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Nagpur Pune Mumbai Breaking News Updates in Marathi

13:45 (IST) 10 Jul 2025

शिळफाट्याची कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मानकोली उड्डाणपूलाला पसंती

डोंबिवली शहरातून पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर भागातील रेल्वे फाटक ओलांडले की वाहन चालक मानकोली पुलावरून सुसाट वेगाने मुंबई-नाशिक महामार्गाने वीस मिनीटात जुना कळवा मुंब्रा टोलनाका येथे पोहचतो. …अधिक वाचा
13:40 (IST) 10 Jul 2025

पावसाने उसंत घेतल्याने कल्याण, डोंबिवलीत खड्डे भरणीच्या कामांना वेग

यावेळी पावसाने मे अखेरपासून सुरूवात केली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी खड्डे भरणी, रस्ते सुस्थितीत करण्याच्या पालिकेच्या कामांमध्ये अडथळे आले. …वाचा सविस्तर
13:38 (IST) 10 Jul 2025

‘शेतकऱ्यांनो, आता लाठ्या-काठ्या घेऊनच या’ बच्चू कडू म्हणाले, ‘सरकारला…’

शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी १४ जुलैला अंभोरा येथे होणाऱ्या सभेत रूमनं आणि लाठ्या-काठ्या घेऊनच या, असा थेट इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी दिला आहे. …सविस्तर बातमी
13:34 (IST) 10 Jul 2025

उंबर्डे कचराभूमीवर टाकलेल्या करोना काळातील औषधांच्या चौकशीची ठाकरे गटाची मागणी

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडेही आपण यासंदर्भात तक्रार करून चौकशीची मागणी करणार आहोत, असे शहरप्रमुख अभिजीत सावंत यांनी सांगितले. …सविस्तर वाचा
13:28 (IST) 10 Jul 2025

इयत्ता पाचवी व आठवीचा शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर, ३१ हजार ७८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

एकूण निकालामधील ३१ हजार ७८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यात इयत्ता पाचवीमधील १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांचा, तर आठवीतील १५ हजार ९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. …सविस्तर बातमी
13:16 (IST) 10 Jul 2025

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीच केली हरणाची शिकार? मांस शिजत असतानाच दोघांना रंगेहाथ पकडले

आलापल्ली (ता. अहेरी) वनविभागातून ९ जुलैला रात्री वनविकास महामंडळाच्या नागेपल्ली येथील कॉलनीतील दोन कर्मचाऱ्यांच्या घरात हरीण शिजत असल्याच्या माहितीवरुन उपवनसंरक्षक दीपाली तलतले यांनी कारवाई केली.शिजवलेल्या मांसासह दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. …अधिक वाचा
13:16 (IST) 10 Jul 2025

पोलिसांच्या कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे; पोलीस महासंचालकांना भूमिका मांडण्याचे आदेश

आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणाशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना पोलीस नोंदवही नेहमीप्रमाणे सुस्थितीत नसल्याचे आणि त्यातील काही पाने बाहेर आल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने पोलिसांच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढले. …वाचा सविस्तर
13:14 (IST) 10 Jul 2025

मिठागरांच्या जागांवरच धारावीकरांचे पुनर्वसन होणार; विरोध करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रकल्पबाधित धारावीकरांचे मुलुंड, भांडुप आणि विक्रोळीतील मिठागरांच्या जागेवरच पुनर्वसन होणार आहे. …सविस्तर बातमी
13:08 (IST) 10 Jul 2025

मंत्री बावनकुळेच्या मतदारसंघात उद्घाटनासाठी सज्ज उड्डाणपूल पावसामुळे खचला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृह जिल्हा नागपूर येथे उड्डाणपूल, रेल्वे भुयारी मार्ग, सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधण्यात येत आहेत. मंत्री बावनकुळेच्या मतदारसंघात उद्घाटनासाठी सज्ज उड्डाणपूल पावसामुळे खचला आहे. …सविस्तर वाचा
13:07 (IST) 10 Jul 2025

प्राण्यांसाठी विद्युत दहनवाहिनी नसल्याची उच्च न्यायालयाकडून दखल

‘प्राण्यांसाठीच्या दहनवाहिनीची प्रतीक्षाच’ या शीर्षकाखाली ‘लोकसत्ता’ने ८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने या प्रकरणी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. …अधिक वाचा
13:03 (IST) 10 Jul 2025

लीलावती रुग्णालय वाद प्रकरण : जगदीशन यांच्या याचिकेवर सुनावणीस आणखी एका न्यायमूर्तींचा नकार

चेतन मेहता ग्रुपला लीलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टवर बेकायदेशीररीत्या नियंत्रण ठेवू देण्यास मदत करण्यासाठी दोन कोटी पाच लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप प्रशांत मेहता यांनी जगदीशन यांच्यावर केला आहे. …अधिक वाचा
12:54 (IST) 10 Jul 2025

म्हाडा राज्यभर लावणार दोन लाख झाडे, मुंबईत ५० हजार वृक्षलागवडीचे लक्ष्य

वन महोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने म्हाडाने राज्यभरात सर्व विभागीय मंडळांच्या माध्यमातून दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे. यापैकी ५० हजार वृक्षलागवड मुंबईत म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून केली जाणार आहे. …सविस्तर बातमी
12:39 (IST) 10 Jul 2025

कर्नाकचा काळा इतिहास पुसला…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर पुलाचे लोकार्पण

या पुलाचे कर्नाक हे जुने नाव बदलून या पुलाचे नाव सिंदूर असे ठेवण्यात आले आहे. भारतीयांवर अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर कर्नाकचा काळा इतिहास पुसून टाकला, अशी भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. …सविस्तर वाचा
12:18 (IST) 10 Jul 2025

मुंबई पश्चिम रेल्वे खोळंबली…

माहीम येथे गुरुवारी सकाळी १०.४७ च्या सुमारास ट्रक पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने लोकल खोळंबल्या. …अधिक वाचा
12:10 (IST) 10 Jul 2025

वसईच्या बाभोळा परिसरात नालेसफाई अर्धवट; पोकलेन दोन आठवड्यांपासून नाल्यात.

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बाभोळा परिसरात नालेसफाईचे काम अपूर्ण राहिल्याने स्थानिक नागरिकांना सध्या चिखल, दुर्गंधी आणि अपघाताच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. …सविस्तर बातमी
11:26 (IST) 10 Jul 2025

धक्कादायक! एकीकडे हिंदीची सक्ती, तर दुसरीकडे नववीच्या ६४ टक्के विद्यार्थ्यांना सातचा पाढा, गुणाकारही येत नाही…

‘परख’ संस्थेच्या वतीने शाळांच्या सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर करण्यात आला नसून नागपूर जिल्ह्यातील शिक्षणाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येते. यामध्ये नवव्या वर्गातील ६४ टक्के विद्यार्थ्यांना सातचा पाढा म्हणता येत नसून साधा गुणाकारही करता येत नसल्याचे वास्तव आहे. …अधिक वाचा
11:26 (IST) 10 Jul 2025

धक्कादायक! एकीकडे हिंदीची सक्ती, तर दुसरीकडे नववीच्या ६४ टक्के विद्यार्थ्यांना सातचा पाढा, गुणाकारही येत नाही…

‘परख’ संस्थेच्या वतीने शाळांच्या सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर करण्यात आला नसून नागपूर जिल्ह्यातील शिक्षणाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येते. यामध्ये नवव्या वर्गातील ६४ टक्के विद्यार्थ्यांना सातचा पाढा म्हणता येत नसून साधा गुणाकारही करता येत नसल्याचे वास्तव आहे. …अधिक वाचा
11:20 (IST) 10 Jul 2025

उरणच्या मासेमारी जाळ्यांना आंध्र प्रदेशच्या कारागिरांची वीण

खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीवर २०० फुटांपेक्षा लांब व पन्नास ते साठ फूट रुंद अशा जाळी वापरण्यात येतात. …वाचा सविस्तर
11:03 (IST) 10 Jul 2025

Gondia Rain Updates: अतिवृष्टीचे तीन बळी, पाच जखमी; गोंदिया जिल्ह्यात…

जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात झाली. सुरुवातीचे मृग आणि आर्द्रा हे दोन नक्षत्र कोरडे गेले. …वाचा सविस्तर
10:57 (IST) 10 Jul 2025

वयाची शंभरी गाठलेल्या आशियातील सर्वाधिक वयाच्या ‘वत्सला’ हत्तीणीचा मृत्यू

१९७१ मध्ये केरळच्या निलांबूर जंगलातून “वत्सला”ला आधी नर्मदापुरम आणि नंतर पन्ना व्याघ्र प्रकल्पात स्थायिक करण्यात आले. …वाचा सविस्तर
10:51 (IST) 10 Jul 2025

Nagpur Rain News : पोलीस ठाण्यापासून तर रेल्वे स्थानकापर्यंत, विमानतळापासून ते मेट्रोपर्यंत…

तीन दिवसाच्या पावसाने नागपुरात दाणादाण उडाली. २३ प्रमुख रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले.

सविस्तर वाचा…

मुंबई पुणे नागपूर न्यूज १० जुलै २०२५