Latest Mumbai Pune Nagpur News Updates : सध्या राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून गेल्या तीन चार दिवसांपासून कोकणासह इतर काही भागांत पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भात आज अतिमुसळधार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) इशारा तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच मंत्री आशीष शेलार यांनी मनसेच्या आंदोलनावर टीका केली आहे. “पहलगाममध्ये अतिरेक्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या, इथे मनसे आंदोलक निष्पाप हिंदूंना भाषा विचारून मारहाण करीत आहेत” अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशीष शेलार यांनी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या जिल्ह्यांतील पावसाच्या तसेच राजकीय व इतर घडामोडींसंदर्भातील बातम्या जाणून घ्या.

Live Updates

Pune Nagpur Mumbai  News Updates in Marathi

19:29 (IST) 7 Jul 2025

द्रुतगती मार्गावर उभ्या कंटेनरला दुचाकीची धडक… दुचाकीस्वाराचा मृत्यू, अन्य एक गंभीर जखमी

याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात निष्काळजीपणाचा व मोटरवाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
19:18 (IST) 7 Jul 2025

इमारत मालकाची सतर्कता आणि बँक लुटीचा डाव उधळला

शनिवारच्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांच्या टोळीने बँकेच्या मागील दाराचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेरे आणि सायरन सिस्टिमची तोडफोड केली. …सविस्तर वाचा
19:13 (IST) 7 Jul 2025

वर्धा : गडकरी संतापले, म्हणाले पुलाचे स्थलांतरण करा, कंत्राटदारास काळ्या यादीत टाका.

राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयाजवळील लोखंडी पूल येथील वणा नदीवर स्थानांतरीत करण्यात यावा या मागणीचे निवेदन आज नितीन गडकरी यांना राका नेते अतुल वांदिले यांनी प्रत्यक्ष भेटीत दिले. …सविस्तर बातमी
19:10 (IST) 7 Jul 2025

इमारतीच्या चौथ्या, पाचव्या मजल्यावरील घर करायचा टार्गेट, उच्च शिक्षित चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात

बदलापूरातील इमारतीच्या चौथ्या- पाचव्या मजल्यावरील बंद घरांमध्ये शिरून घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. …सविस्तर बातमी
18:56 (IST) 7 Jul 2025

धोकादायक जाहिरात फलकांवर लक्ष; जाहिरात दारांना लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याच्या नोटिसा

पावसाळ्यात वादळी वाऱ्यात जाहिरात फलक कोसळण्याच्या घटना समोर येत असतात. अशा घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेच्या जाहिरात विभागाकडून जाहिरात दारांना लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. …सविस्तर वाचा
18:48 (IST) 7 Jul 2025

रेल्वेला मुहूर्त सापडला… आता आठ तास आगोदर आरक्षण चार्ट…’या’ तारखेपासून…

सर्व प्रवासी गाड्यांसाठी आठ तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया १० जुलैपासून अनिवार्य करण्यात आली आहे. …अधिक वाचा
18:24 (IST) 7 Jul 2025

यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार….घाटंजी तालुक्यात दोघांचा पूरबळी

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारपासून पावसाने जोर पकडला असून, अनेक ठिकाणी पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. …सविस्तर बातमी
18:23 (IST) 7 Jul 2025

राज-उद्धव यांच्या सभेनंतर सरन्यायाधीशांचे मराठीबाबत मोठे विधान, म्हणाले, ‘मराठी भाषा…’

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत याविरोधात सभा घेतली आणि मराठीचा आवाज बुलंद केला. या सभेनंतर आता देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देखील मराठी भाषेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. …अधिक वाचा
17:52 (IST) 7 Jul 2025

धक्कादायक! ‘डब्ल्यूसीएल’मध्ये नोकरीच्या नावावर बेरोजगारांना कोट्यवधींनी गंडवले-शिवसेनेच्या माजी आमदारांच्या नावे…

गोपीकिशन बाजोरिया यांनी हे आरोप फेटाळून लावत आपला त्या आरोपींशी कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. …सविस्तर बातमी
17:33 (IST) 7 Jul 2025

गोंडवाना विद्यापीठातील ‘कमवा आणि शिका’ योजना वादात? संघ परिवारातील संस्थेच्या नियोजित प्रशिक्षणावर आक्षेप…

उच्च शिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करण्याच्या हेतूने दशकभरापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात वादाची मालिका सुरूच असून यात ‘कमवा आणि शिका’ योजनेची भर पडली आहे. …सविस्तर वाचा
17:20 (IST) 7 Jul 2025

भाजप नेत्याला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ऑफर… नाराज सुधीर मुनगंटीवर स्पष्टच म्हणाले…

सुधीर मुनगंटीवार यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात वनमंत्री आणि सास्कृतिक खाते त्यांच्याकडे होते. भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष राहिले. …अधिक वाचा
17:03 (IST) 7 Jul 2025

शिंदेंच्या आमदाराचा यू-टर्ण, म्हणाले “तर मी माझे शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो”

मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले होते. …सविस्तर बातमी
17:02 (IST) 7 Jul 2025

नवनीत राणा यांनी लावला ‘एमएडीसी’च्या उपाध्यक्षांना फोन, “अमरावती-मुंबई विमानसेवा वारंवार रद्द का होतेय?”

गेल्या काही दिवसांत अमरावती-मुंबई विमान सेवा तांत्रिक बिघाडात अडकलेली आहे. यामुळे सामान्य विमान प्रवासी खूपच त्रस्त झालेले आहेत. …वाचा सविस्तर
16:48 (IST) 7 Jul 2025

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गोदाम वादाच्या भोवऱ्यात; अकृषिक जमिनीचा बेकायदेशीर वापर होत असल्याचा आरोप

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा संपादन सुरू असतानाच, तलासरी तालुक्यातील झरी गावातील प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे गोदाम वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. …सविस्तर बातमी
16:31 (IST) 7 Jul 2025

मोकाट श्वानाच्या भीतीने सहाव्या मजल्यावरून कोसळला; १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

रविवारी सुटीच्या दिवस असल्याने पावनगाव येथील १० माळ्यांच्या देव हाईट्स इमारती खाली प्रांगणात काही शाळकरी मुले खेळत होती. …सविस्तर वाचा
16:19 (IST) 7 Jul 2025

अमरावती : बच्चू कडूंच्या ‘७/१२ कोरा कोरा यात्रे’ला सुरुवात; भर पावसात शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने हजेरी

सरकारने सातबारा कोरा केलाच पाहिजे अशी मागणी करीत शेतकरी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत आहेत. …सविस्तर वाचा
16:08 (IST) 7 Jul 2025

डोंबिवलीतील ओंकार शाळेचा शार्दुल विचारे सी. ए. फाऊंडेशन परीक्षेत देशात तिसरा; कल्याणच्या जुळ्या बहिणींचे यश

डोंबिवली ठाकुर्ली ९० फुटी रस्ता परिसरातील गृहसंकुलात राहणाऱ्या शार्दुल विचारे या तरूणाने पहिल्या टप्प्यातील सनदी लेखापाल (सी. ए. फाऊंडेशन) परीक्षेत ४०० पैकी ३५८ गुण मिळून देशात तिसरा क्रमांक मिळविण्याचा मान मिळवला आहे. …अधिक वाचा
15:54 (IST) 7 Jul 2025

प्रिया फुके कोण आहेत?, त्या पुन्हा एकदा चर्चेत का?

परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांनी आज विधान भवनासमोर आंदोलन करत फुके आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. …वाचा सविस्तर
15:46 (IST) 7 Jul 2025

रील बनवण्याच्या नादात गमावला जीव; बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

रविवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास तीर्थराज धनपाल बरसागडे (१८) हा विद्यार्थी त्याच्या दोन मित्रांसोबत सीनेगावला लागून असलेल्या कोंढा कोसारा परिसरातील मुरुम खदान येथे गेला होता. …अधिक वाचा
15:13 (IST) 7 Jul 2025

क्रिकेटसाठी बँकेतील नोकरीचा राजीनामा, नमा खोब्रागडे यांची यशोगाथा

नमा खोब्रागडे यांची ही यशोगाथा केवळ क्रिकेटची नाही, तर हजारो तरुणांसाठी स्वप्न, जिद्द आणि धैर्य यांचं प्रतीक आहे. …सविस्तर बातमी
14:55 (IST) 7 Jul 2025

धुळ्यात सिनेस्टाईल पद्धतीने गुजरातमधील दोघांची लूट

या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या अधीपत्याखाली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष पथक तयार करण्याचे सूचित केले आहे. …सविस्तर वाचा
14:54 (IST) 7 Jul 2025

पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला गडकरींचा विरोध आहे का? पुन्हा म्हणाले, ‘जो करेगा जात की बात…’

केंद्र सरकारने जातींच्या गणनेसह लोकसंख्येची मोजणी म्हणजेच ‘जातनिहाय जनगणना’ करण्यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. …अधिक वाचा
14:52 (IST) 7 Jul 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विद्युत क्षेत्राच्या खासगीकरणावरून यु टर्न… ९ जुलैला संप… संघटना म्हणते…

बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी सरकारच्या मालकीच्या तिन्ही वीज कंपन्यांचे खाजगीकरण करणार नाही. उलट त्यांना आर्थिक मदत करून सक्षम करू असे जाहिर केले. …सविस्तर बातमी
14:39 (IST) 7 Jul 2025

ठाकरेंच्या विरोधातील बॅनर काढण्यास टेंभीनाक्यावर पोलीस पथक अन्…

शिंदे यांच्या युवा सेनेने टेंभीनाका येथे बॅनरद्वारे व्यंगचित्रातुन प्रतिउत्तर दिले आहे.हे बॅनर काढण्यासाठी थेट पोलीस टेंभीनाक्यावर पोहचले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी शिंदेंच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून येथील बॅनर हटविला. …सविस्तर वाचा
14:25 (IST) 7 Jul 2025

एनएचएम कर्मचाऱ्यांचा एल्गार… बेमुदत आंदोलनाचा इशारा…

आपल्या विविध मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत (एनएचएम) काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी येत्या १० आणि ११ रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. …अधिक वाचा
14:14 (IST) 7 Jul 2025

नाशिकच्या काही भागात चार दिवस वीज पुरवठा बंद राहणार

नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या या कामामुळे ११ केव्ही भारत नगर वाहिनी अंतर्गत – खोडेनगर, विठ्ठलमंदिर, वडाळा गाव, गणेश नगर, रहमत नगर, रविशंकर मार्ग या भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. …वाचा सविस्तर
14:14 (IST) 7 Jul 2025

ठाकुर्ली, खंबाळपाडा, चोळे परिसरात वीजेच्या लपंडावाने नागरिक हैराण

मागील काही दिवसांपासून डोंबिवली जवळील ठाकुर्ली, चोळे, पंचायत बावडी, ९० फुटी रस्ता, खंबाळपाडा परिसरात महावितरच्या विजेचा लपंडाव सुरू आहे. …वाचा सविस्तर
13:56 (IST) 7 Jul 2025

विचित्र अपघात! झाडावर वीज कोसळली अन झाड धावत्या दुचाकीवर… वडिलांचा मृत्यू; मुलगा गंभीर

जीवचंद यादोराव बिसेन (४६) असे मृत वडिलाचे तर चिराग जीवचंद बिसेन (१६) असे या घटनेतील गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. …सविस्तर बातमी
13:49 (IST) 7 Jul 2025

ठाण्यात अनधिकृत बांधकामासाठी फुटमागे तीनशे रुपयांचा रेट ?

ठाण्यात अनधिकृत बांधकामासाठी अधिकारी चौरसफुटामागे तीनशे रूपये घेत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी केला आहे. …वाचा सविस्तर
12:58 (IST) 7 Jul 2025

पुण्यात एका तरुणाकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना, काँग्रेसकडून पुतळ्याला दुग्धभिषेक

पुणे रेल्वे स्टेशनसमोरील असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर काल रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला या तरुणाने भगवे वस्त्र परिधान करून पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. …सविस्तर बातमी

मुंबई पुणे नागपूर न्यूज  ७ जुलै २०२५