Latest Mumbai Pune Nagpur News Updates : सध्या राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून गेल्या तीन चार दिवसांपासून कोकणासह इतर काही भागांत पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भात आज अतिमुसळधार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) इशारा तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच मंत्री आशीष शेलार यांनी मनसेच्या आंदोलनावर टीका केली आहे. “पहलगाममध्ये अतिरेक्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या, इथे मनसे आंदोलक निष्पाप हिंदूंना भाषा विचारून मारहाण करीत आहेत” अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशीष शेलार यांनी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या जिल्ह्यांतील पावसाच्या तसेच राजकीय व इतर घडामोडींसंदर्भातील बातम्या जाणून घ्या.

Live Updates

Pune Nagpur Mumbai  News Updates in Marathi

12:46 (IST) 7 Jul 2025

मराठींचं रक्षण करतो, पण परप्रांतीयांवर हल्ले योग्य नाहीत – बावनकुळे

परप्रांतीय माणसांना मारहाण ठीक नाही. ते महाराष्ट्रात कितीतरी वर्षापासून राहतात, ज्यांचा जन्म येथे झाला आहे. त्यांना टार्गेट करणे योग्य नाही. ते पाकिस्तानचे आहे का? – चंद्रशेखर बावनकुळे सविस्तर बातमी
12:32 (IST) 7 Jul 2025

खार, मालाडमध्ये कारवाई…दोन कोटींचे कोकेन जप्त… नाजयरेयन नागरिक अटकेत…

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी कक्षाने मालाड येथे एका नायजेरियन नागरिकाला अटक करून सुमारे २ कोटी रुपये किंमतीचे २०० ग्राम कोकेन जप्त केले. …सविस्तर वाचा
12:31 (IST) 7 Jul 2025

शिक्षकांचे १८ जुलै रोजी विधानभवनासमोर आंदोलन; निवडणुकीच्या अतिरिक्त कामावरून शिक्षकांमध्ये नाराजी

निवडणुकीच्या अतिरिक्त कामासाठी नेमणूक केलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात येत्या १८ जुलै रोजी प्रहार शिक्षक संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. …सविस्तर वाचा
12:31 (IST) 7 Jul 2025

नोकरीचे आमिष दाखवून दोन मुलींवर लैंगिक अत्याचार… अंधेरीमधील व्यावसायिकाला अटक

नोकरी मागण्यासाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलींच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका ६२ वर्षीय व्यावसायिकाला साकिनाका पोलिसांनी अटक केली. …अधिक वाचा
12:30 (IST) 7 Jul 2025

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो १… गाडी वेग पकडत नसल्याने अर्ध्यावरच फेरी थांबविण्याची नामुष्की फेरी रद्द, मेट्रो स्थानकांवर प्रचंड गर्दी

वर्सोव्यावरून निघालेली मेट्रो गाडी निर्धारित वेग पकडत नसल्याने ती डी. एन. नगरला रिकामी करून दुरुस्तीसाठी कारशेडला पाठविण्यात आली. …सविस्तर वाचा
12:29 (IST) 7 Jul 2025

बच्चू कडू दुटप्पी, कर्जमाफीचा आमचा संकल्प; बावनकुळेंची टीका

आपल्याला कर्जमाफी करायची आहे, आमचाही अजेंडा आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प केला आहे. सरकारने कबूल केले आहे. असे बावनकुळे म्हणाले. …वाचा सविस्तर
12:02 (IST) 7 Jul 2025

पंढरपूरहून परतताना विठ्ठलाची कृपा; एसटी बसला अपघात पण, २० भाविक बचावले

बसमध्ये एकूण ५१ प्रवासी चालक आणि वाहक मिळून ५३ जण प्रवास करीत होते होता. या अपघातात कमिअधिक २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. …सविस्तर बातमी
12:00 (IST) 7 Jul 2025

खात्यातून रक्कम लंपास, पोस्टमास्टर फरार, पोलीस पेचात.

एक खातेदार नंदलाल पाटील यांच्या खाते पुस्तिकेत खाडाखोड दिसून आली. नोंदी गहाळ करण्यात आल्यात. हा प्रकार पोस्ट मास्टरनेच केल्याचा आरोप झाला. …सविस्तर बातमी
11:50 (IST) 7 Jul 2025

भाईंदर : मराठी नागरिकांच्या मोर्च्याची परवानगी पोलिसांनी फेटाळली

मिरा रोड येथील एका मिठाई विक्रेत्याने मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्याच्या प्रकरणावरून मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना अलीकडेच घडली होती. …वाचा सविस्तर
11:42 (IST) 7 Jul 2025

निवासयोग्य दाखला न घेणाऱ्या विकासकांवर गुन्हा? अधिवेशनात सुधारणा विधेयक अपेक्षित

दंडात्मक रकमेत दहा पट वाढ आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याबाबत सुधारणा विधेयक येत्या अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. …सविस्तर बातमी
11:40 (IST) 7 Jul 2025

सिंधुदुर्ग : जीर्ण वीजतारा आणि खांबांचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात संताप

इन्सुली बिलेवाडी शाळा क्र. ७ जवळ घडलेल्या या घटनेत शेतकरी शैलेश कोठावळे थोडक्यात बचावले. …अधिक वाचा
11:38 (IST) 7 Jul 2025

चंद्रपूर बँक निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेस एकत्र

खासदार धानोरकर यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत बँकेत कॉंग्रेसची सत्ता बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेचे विद्यमान संचालक शेखर धोटे यांची उमेदवारी मागे घेण्याचा व विजय बावणेंना निवडून आणण्याचे ठरविण्यात आले. …वाचा सविस्तर
11:21 (IST) 7 Jul 2025

न्यायमूर्तींनी आधी स्वत:चे आरोग्य सांभाळावे, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या सल्लामागील कारण काय ?

न्यायमूर्तींनी काम आणि वैयक्तिक आयुष्य यात संतुलन राखण्याचे आवाहनही दत्ता यांनी यावेळी केले. …अधिक वाचा
11:18 (IST) 7 Jul 2025

मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड… मोनोरेल सेवा विस्कळीत

लवकरच बिघाड दूर होईल आणि मोनोरेल सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती एमएमएमओसीएलकडून देण्यात आली. तर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल एमएमएमओसीएलने दिलगिरी व्यक्त केली आहे. …अधिक वाचा
11:17 (IST) 7 Jul 2025

बँकांमध्ये नोकऱ्यांचा पाऊस, तब्बल ५० हजार जागांवर भरती, त्वरा करा

या भरतीमागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे बँकांमधील रिक्त पदं भरणं, डिजिटल बँकिंग सेवा बळकट करणं आणि ग्रामीण भागांमध्ये बँकिंग सेवा वाढवणे हा आहे. …अधिक वाचा
11:08 (IST) 7 Jul 2025

दहशतीत नागपूर : जुगार, सट्टेबाजीने पेटवले गुन्हेगारीचे लोण

पोलीस आयुक्तालयानेच दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यातच शहरात ५० खून झाले. आपसांतल्या वादानंतर प्राणघातक हल्ल्याच्या ९० हून अधिक घटन घडल्या. इतक्यावरच शहरातली गुन्हेगारी थांबलेली नाही. …सविस्तर वाचा
11:02 (IST) 7 Jul 2025

मुंबई : दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना अटक… गॅस कर्मचाऱ्यांकडून उकळली खंडणी…

एका वाहनाने त्यांचा टेम्पो अडवला. त्या वाहनातून प्रवीण कुमार सिंग (३४) नावाचा इसम उतरला. त्याने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. …सविस्तर बातमी
10:58 (IST) 7 Jul 2025

ॲपवरून मैत्री… हॉटेलमध्ये नेऊन फसवणूक… तरूणींसह २१ जणांना अटक…

समाजमाध्यमावर, तसेच विविध डेटींग ॲपवर तरुण – तरुणी जोडीदाराच्या शोधात असतात. …सविस्तर बातमी
10:57 (IST) 7 Jul 2025

Video : वाघिणीच्या बछड्यांची जंगलातच रंगली “मस्ती की पाठशाला”

गेल्या काही महिन्यांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे आणि त्यासाठी कारणीभूत ठरत आहे ती “एफ-२” वाघीण आणि तिचे पाच बछडे. …वाचा सविस्तर
10:55 (IST) 7 Jul 2025

कोर्लई समुद्र किनाऱ्यावरील संशयास्पद बोटीचे गुढ कायम

बोट पाकिस्तानी असल्याचे स्थानिक मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे मच्छीमार आणि स्थानिक नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण आहे. …सविस्तर बातमी
10:42 (IST) 7 Jul 2025

पुणे : कोरेगाव पार्क भागात लूटमार

कोरेगाव पार्क भागात दोघांना धमकावून लुटण्यात आल्याची घटना घडली. …अधिक वाचा
10:38 (IST) 7 Jul 2025

सावंतवाडी: मळेवाड येथे बिबट्याचा शेतकऱ्यांवर हल्ला, चार जण जखमी

तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. …सविस्तर बातमी
10:37 (IST) 7 Jul 2025

भाजपचे आमदार संजय केळकर यांचे वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांना आवाहन; वाढदिवसाचे होर्डिंग्ज-बॅनर नको, गरजू विद्यार्थ्यांना मदत करा

भाजप आमदार संजय केळकर यांचा ९ जुलै रोजी वाढदिवस असतो. वाढदिवस शुभेच्छांचे बॅनर न लावता ठाणे शहरात लोकहिताचे अनेक उपक्रम राबवून सेवा दिवस म्हणून साजरा करतात. …सविस्तर वाचा
10:06 (IST) 7 Jul 2025

“महापालिका निवडणूक जोरगेवारांच्या नेतृत्वात,” पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने अहीर, मुनगंटीवार समर्थकांमध्ये नाराजी…

कन्यका सभागृहात महापालिका निवडणूक आढावा बैठक, महानगर अध्यक्ष आणि नवनियुक्त मंडळ अध्यक्ष सत्कार समारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह आयोजनाचे नियोजन करण्यात आले होते. …सविस्तर वाचा
10:04 (IST) 7 Jul 2025

टीकेनंतर एकनाथ शिंदे यांचा हेलिकॉप्टर दौरा रद्द; समाजमाध्यमांवर संताप, कारण मात्र मुसळधार पावसाचे

पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाणे ते कल्याण पुन्हा ठाणे असा २० किलोमीटरचा प्रवास हेलिकॉप्टरने करणार असल्याचा सरकारी दौरा शनिवारी संध्याकाळी जाहीर होताच मनसे नेते राजू पाटील यांनी त्यावर सडकून टीका केली.

सविस्तर वाचा…

10:03 (IST) 7 Jul 2025

Maharashtra Rain Alert : कोकणासह राज्यातील ‘या’ भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा

कोकणसाह, घाट परिसर आणि पूर्व विदर्भात सोमवारी अतिमुसळधार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

10:03 (IST) 7 Jul 2025

मराठी आंदोलनाची ‘पहलगाम’शी तुलना, आशीष शेलार यांच्या विधानामुळे वाद; विरोधकांचे टीकास्त्र

अमराठींना होत असलेल्या मारहाणीच्या प्रकारांमुळे उद्विग्नता येते, असे ते म्हणाले.

सविस्तर वाचा…

10:02 (IST) 7 Jul 2025

Mumbai Local Train Updates: तब्बल १३ तासांनी वाशी-पनवेल लोकल सुरू, मात्र कूर्मगतीने

लोकल बंद राहिल्याने रस्ते वाहतुकीवर ताण आला. त्यामुळे बसची गर्दी वाढली, रिक्षा-टॅक्सी थांब्यावर लांब रांगा लागल्या होत्या.

सविस्तर वाचा…

10:02 (IST) 7 Jul 2025

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर मोबाईल क्रमांक दुसऱ्या सीमवर सुरू करण्याचा प्रयत्न, संशयीत आरोपी दिल्लीतून ताब्यात

विवेक सब्रवाल असे दिल्लीवरून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो दिल्ली परिसरातील बुराडी येथील रहिवासी आहे.

सविस्तर वाचा…

10:01 (IST) 7 Jul 2025

शिंदेंच्या ‘जय गुजरात’ला प्रताप जाधवांचे पाठबळ; म्हणाले, “मुंबई गुजरातचीही राजधानी होती”

शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री व बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिंदे यांच्या ‘ जय गुजरात’ वक्तव्याचे जोरदार समर्थन केले.

सविस्तर वाचा…

मुंबई पुणे नागपूर न्यूज  ७ जुलै २०२५