Mumbai Rain News Updates 26 May 2025 : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील तीन ते चार तास काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ‘वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चिघळत असताना दोन-तीन दिवस महिला आयोगाने त्यात लक्ष घातल्याचे दिसले नाही.’, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुंबई व मुंबई उपनगर तसेच पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या
मुंबई पहिल्याच पावसाने जलमय, तासाभरात कुठे किती पाऊस?
Mumbai Rain News : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट, आज समुद्राला मोठी भरती, सुमारे चार मीटरपर्यंत लाटा उसळणार
Heavy Rain In Mumbai : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अकरावी प्रवेशाला आजपासून सुरूवात
Melghat Monsoon Rain : मे महिन्यात धुक्याची दरी… निसर्गाची किमया न्यारी
Navi Mumbai Rain Updates : नवी मुंबईत ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस !
Badlapur Rain Latest Updates : मुसळधार पावसाने बदलापूरला झोडपले, अवघ्या चार तासांत १६० मिलिमीटर पावसाची नोंद
Mumbai Rain News : मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता, पावसाचा रेड अलर्ट
प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. तर ठाणे आणि पालघर भागाला सतर्कतेचा (यलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.
Karad Rain News : कराडमध्ये पावसाचा जोर ओसरला
पश्चिम घाटात कोल्हापूर जिल्ह्याचा अपवाद वगळता तुफान कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर ओसरला आहे. तरीही ढगाळ वातावरणात पावसाची रिपरिप कायम असल्याने जनजीवन विस्कळीत आहे.
Phaltan Rain News Live Updates : फलटण धुमाळवाडीत ढगफुटीसदृश पाऊस
साताऱ्यात वळवाच्या पावसाचा जोर दुष्काळी फलटण, माण तालुक्यात कायम आहे. या पावसाने साताऱ्यातील अनेक भागांना झोडपून काढले. फलटणमध्ये धुमाळवाडीत ढगफुटीसदृश पाऊस झाला.
Krishna River Rain News : कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली ; बंधारे पाण्याखाली
Maharashtra Rain Live Updates : सलग सुरू असलेल्या पावसाने कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली असून, बोरगाव व सांगलीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे
Ahilyanagar Rain LIve Updates : अहिल्यानगरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी संततधार
पावसाने सहा घरांची पडझड झाली तर एक गाय जखमी झाली. शहर व परिसरास गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.
कर्जत शहरात मुसळधार पावसाचा कहर; शेतकऱ्यांचे नुकसान, शहरातील मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप
Karjat Rain Updates : सातत्याने कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कर्जत शहराच्या मुख्य बाजारपेठ, बसस्थानक, महाविद्यालय चौक, मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून आले.
मुंबई-रायगडला रेड अलर्ट! कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, लोकल सेवेचा खोळंबा
Heavy Rain Alert for Maharashtra : मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुढील ४ तास जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत जोरदार पावसाचा इशारा