Nagpur Pune Mumbai Latest Marathi News : नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेस आमदार डॉ. संजय मेश्राम त्याला अपवाद ठरले. त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सेवा हक्क दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोकळ्या मनाने स्तुती केली.

वसई येथील सिमेंटचे ब्लॉक बनविण्याच्या कंपनीतून सुरू असलेला मेफेड्रॉन (एमडी) बनविण्याचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत चार किलो ५३ ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मुंबई,पुणेसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या ताज्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 29 April 2025

17:50 (IST) 29 Apr 2025

कामाठीपुराचा पुनर्विकास लालफीतीत, विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याचा म्हाडाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

ही मान्यता मिळाल्यानंतर निविदा काढणे शक्य होणार असून दुरुस्ती मंडळाला या प्रस्तावाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. …वाचा सविस्तर
17:49 (IST) 29 Apr 2025

गंगापूरमधील विसर्गाने गोदापात्रात पानवेलींचा कचरा

नदीपात्रात ठिकठिकाणी अडकलेल्या पानवेली काढण्याचे काम सफाई कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. …अधिक वाचा
17:38 (IST) 29 Apr 2025

…आणि आतली बातमी फुटली

या चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून ६ जून रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे. …अधिक वाचा
16:57 (IST) 29 Apr 2025

टिटवाळा बनेली टेकडीवरील १६७ बेकायदा बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट

मंगळवारी सकाळी दोन जेसीबींच्या साहाय्याने तोडकाम पथक घेऊन अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी बनेली टेकडीवरील १६७ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली. …वाचा सविस्तर
16:47 (IST) 29 Apr 2025

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून झाडाला बांधून मारहाण

याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. …सविस्तर बातमी
16:40 (IST) 29 Apr 2025

…अखेर मुलुंडमध्ये धारावीचे फलक झळकले, जागा डीआरपीकडे वर्ग, स्थानिकांमध्ये नाराजी, अपात्र धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील काही अपात्र रहिवाशांचे मुलुंडमधील मिठागराच्या ५८.५ एकर जागेवर पुनर्वसन करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सविस्तर बातमी…

16:31 (IST) 29 Apr 2025

वसई भाईंदर रेल्वे स्थानकात पोलिसांची सतर्कता; रेल्वे पोलिसांची स्थानकात गस्त वाढली

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक रेल्वे स्थानकात गस्त वाढवून सुरक्षेच्या दृष्टीने विशेष लक्ष दिले जात असल्याचे चित्र दिसून आहे. …सविस्तर वाचा
16:30 (IST) 29 Apr 2025

तीन हात नाका येथे रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी

आधीच उष्णता त्यात या वाहतूक कोंडीत १५ ते २० मिनिटे अडकून राहावे लागत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. …वाचा सविस्तर
16:29 (IST) 29 Apr 2025

विदर्भाचे काश्मीर माहित आहे काय? सध्या या कारणाने चर्चेत

विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखले जाणारे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा सध्या वाढत्या तापमानामुळे चर्चेत आले आहे.चिखलदरा (अमरावती) विदर्भातील थंड हवेचे ठिकाण अशी ओळख आहे. चिखलदरा या पर्यटनस्थळाला यावर्षी उन्हाचा फटका बसला आहे. …सविस्तर वाचा
16:22 (IST) 29 Apr 2025

उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास; प्रभादेवी, दादरमधील सात प्रकल्पांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर

सी अँड डी प्रारुपाप्रमाणे प्रभादेवी-दादरमधील सात प्रकल्प मार्गी लावण्यासाठी दुरुस्ती मंडळाने प्रस्ताव तयार केले आहेत. …वाचा सविस्तर
16:18 (IST) 29 Apr 2025

‘नीट’मुळे विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेत बदल…, आता परीक्षा ४ मेऐवजी २ मे रोजी होणार…

नीट ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा असल्याने ४ मे रोजी हाेणारी विधि अभ्यासक्रमाची सीईटी २ मे रोजी घेण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे. …अधिक वाचा
16:14 (IST) 29 Apr 2025

मेट्रो ९ कारशेड वाद, डोंगरीतील १२ हजार ४०० झाडांवर कुऱ्हाड, झाडे वाचविण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेला वेग, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निवेदन

आतापर्यंत अंदाजे १५ हजार स्थानिक रहिवाशांनी झाडे वाचविण्यासाठी स्वक्षरी केली आहे. …सविस्तर बातमी
16:03 (IST) 29 Apr 2025

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील डोंबिवलीतील मृतांजवळील किंमती ऐवज कुटुंबीयांना परत

पहलगाम पोलीस आणि लष्कराने हे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याजवळ पडलेला किमती ऐवज पहलगाम पोलिसांनी ताब्यात घेतला होता …अधिक वाचा
15:55 (IST) 29 Apr 2025

एसटी थांब्यावरील हॉटेल-मोटेल संदर्भात लवकरच नवे धोरण, परिवहन मंत्र्यांची घोषणा

लांबपल्ल्याच्या प्रवासामध्ये एसटी बस ज्या हॉटेल-मोटेलवर थांबतात, तेथे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवा – सुविधाबाबत अनेक तक्रारी येत आहेत. …सविस्तर बातमी
15:36 (IST) 29 Apr 2025

पहलगाम दहशतवादी हल्ला; लोकांच्या मदतीसाठी येणार्‍या पदावर तिला काम करण्याची संधी राज्य सरकारने द्यावी – प्रगती जगदाळे

मृतांमध्ये 6 जण हे महाराष्ट्रातील पर्यटक होते.तर या 6 जणांमधील 2 जण हे पुण्यातील कर्वेनगर भागात राहणारे संतोष जगदाळे आणि कोंढवा भागात राहणारे कौस्तुभ गणबोटे हे होते. …सविस्तर वाचा
15:29 (IST) 29 Apr 2025

नागपूर मेडिकलचा विद्यार्थी डॉ. यश जैन नीट सुपरस्पेशालीटीत देशात पहिला… भविष्यात हे शिक्षण…

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) शल्यक्रियाशास्त्र विभागाचा विद्यार्थी डॉ. यश जैन हा नीट सुपरस्पेशालिटी परिक्षेत देशात पहिला आला आहे. …वाचा सविस्तर
15:18 (IST) 29 Apr 2025

‘एमपीएससी’ला झाले तरी काय?, परीक्षा, निकाल, निवड प्रक्रिया सारेच रखडलेले, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीला बळकट करण्याचे आश्वासन दिले खरे परंतु, सातत्याने रखडत चाललेले निकाल, परीक्षा, निवड प्रक्रिया आणि आरक्षणाच्या गोंधळामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी चिंताग्रस्त झाला आहे. …सविस्तर वाचा
14:50 (IST) 29 Apr 2025

घाटकोपरमध्ये तृतीयपंथीला मद्य पाजून अत्याचार

रात्रीच्या वेळी औषधाच्या दुकानातून औषध घेऊन परतणाऱ्या एका तृतीयपंथीला मारहाण करून, मद्य पाजून अत्याचार केल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली. …सविस्तर बातमी
14:47 (IST) 29 Apr 2025

नाशिक जिल्ह्यात टेम्पो उलटून २९ भाविक जखमी

जखमी हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील असून सध्या ते नाशिकच्या पाथर्डी भागात वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. …वाचा सविस्तर
14:45 (IST) 29 Apr 2025

झोपु योजनेत आता १५ दिवसात वारसा प्रमाणपत्र, नव्या चार स्वयंचलित प्रणाली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील ॲानलाईन सेवेत आणखी भर पडली असून आता झोपडीवासीयांना प्राधिकरणात खेटे न घालता १५ दिवसांत वारसा प्रमाणपत्र मिळणार आहे. …सविस्तर बातमी
14:18 (IST) 29 Apr 2025

अमली पदार्थांचा विळखा आणि पोलिसांचा सहभाग

मागील ३ महिन्यात कोट्यवधी रूपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यावरून अमली पदार्थांची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत ते दिसून येत आहेत. …सविस्तर वाचा
14:15 (IST) 29 Apr 2025

‘गैरमुस्लिमांना काश्मीरमध्ये येऊ देणार नाही हे सांगण्यासाठीच हल्ला’

गैरमुस्लिमांना काश्मीरमध्ये येऊ देणार नाही हे सांगण्यासाठीच पर्यटकांमधील गैरमुस्लिमांना वेगळे करून ठार मारले, असे निरीक्षण लेफ्टनंट जनरल (निवृत्त) आर.आर. निंभोरकर …सविस्तर वाचा
14:06 (IST) 29 Apr 2025

वांद्रे -वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प : प्रकल्पाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

जुहू आणि वर्सोवा समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य न्याहाळता येणार नाही आणि समुद्रकिनाऱ्यावरील खारफुटीचे अस्तित्त्वही धोक्यात येणार असल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालायने सोमवारी फेटाळली. …वाचा सविस्तर
13:57 (IST) 29 Apr 2025

यूपीएससी उत्तीर्ण झाल्याचा दावा निघाला खोटा, तो शुभम गडचिरोलीचा नव्हे…

धानोरा तालुक्यातील खेडेगाव येथील रहिवासी असलेला शुभम तुलावी याने यूपीएससी उत्तीर्ण केल्याचा दावा खोटा निघाला आहे. निकालपत्रात नाव असलेला हा गडचिरोलीचा शुभम नसून तो शुभम प्रसाद आहे. …वाचा सविस्तर
13:52 (IST) 29 Apr 2025

धुळे गुंतवणूक परिषदेत ८४३६ कोटींचे करार

राज्याच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने हॉटेल टॉपलाईन रिसॉर्ट येथे औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते …अधिक वाचा
13:48 (IST) 29 Apr 2025

गेटवे ऑफ इंडिया येथील प्रस्तावित जेट्टीविरोधात स्थानिक उच्च न्यायालयात; प्रकल्पाचे काम थांबवण्याची मागणी

गेट वे ऑफ इंडियाते रेडिओ क्लबदरम्यानच्या प्रस्तावित जेट्टीविरोधात स्थानिकांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. …वाचा सविस्तर
13:34 (IST) 29 Apr 2025

दहशतवादी हल्ल्यानंतरही हिंदु-मुस्लीम ऐक्य कायम!, काश्मीरमधील मुस्लीम कुटुंबाच्या आधाराने यवतमाळचे पर्यटक सुखरूप

काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यास आठवड्याचा कालावधी लोटला. या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या यवतमाळातील पर्यटकांना हिंदु-मुस्लीम ऐक्याचा आणि काश्मिरी मुस्लीम कुटुंबाच्या आदरातिथ्याचा सुखद अुनभव आला. …सविस्तर बातमी
13:32 (IST) 29 Apr 2025

सोनसाखळी चोराकडून महिलेवर दगड हल्ला

चोरट्याने महिलेचे गळ्यातील ८३ हजार रुपयांची सोनसाखळी चोरी केल्याची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
13:28 (IST) 29 Apr 2025

ज्येष्ठ अभिनेते, चित्रकार प्रकाश भेंडे यांचे निधन

चित्रपट लेखक, दिग्दर्शक, निर्माते, चित्रकार अशी बहुपेडी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते प्रकाश भेंडे यांचे मंगळवारी निधन झाले. …सविस्तर बातमी
13:17 (IST) 29 Apr 2025

वाघानेच केली वाघाची शिकार! मृतदेहावर मारला ताव…

अतित्वाच्या लढाईत वाघ एकमेकांशी भिडतात. यात एखाद्याचा मृत्यूही होतो. मात्र, याठिकाणी चक्क एका वाघाने दुसऱ्या वाघाला खाल्ले. या परिसरात वाघीण आणि तिच्या तीन बचड्यांचा वावर होता. …सविस्तर वाचा

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे