नागपूर : उन्हाळा सुरू झाला तरी अवकाळी पाऊस मात्र पाठ सोडायला तयार नाही. पावसाळ्यात देखील राहत नसतील इतके ‘अलर्ट’ हा अवकाळी पाऊस देत आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील आठवड्यापासूनच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वारा आणि गारपीटीसह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सावरण्याची एकही संधी न देता पुन्हा एकदा पावसाने त्याच्या आगमनाची वर्दी दिली आहे. उपराजधानीत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. नागपूरसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात देखील परभणी, बीड, हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रात पुणे तसेच नगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा…शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप

आज, शनिवारी विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्यात विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यात जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. खानदेशात जळगाव व धुळे जिल्ह्यात पावसाचा इशारा आहे.

हेही वाचा…“मोदी द्वेष हेच महाविकास आघाडीचे सूत्र”, प्रवीण दरेकर यांची टीका

कोकणातही काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd issues orange and yellow alert for heavy rain in various part of maharashtra rgc 76 psg
First published on: 02-03-2024 at 10:17 IST