Nagpur Breaking News Updates : भारत-पाकिस्तानमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश सोमवारी दिले. ७ मे रोजी हा सराव होणार असून त्यामध्ये शत्रूने हल्ला केल्यास सुरक्षा यंत्रणा तसेच नागरिकांची संरक्षणसिद्धता वाढविण्याचा उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात नागपुरात आणि नजीकच्या शहरात कुठल्या भागात स्वसंरक्षणाचा सराव केला जाणार आहे ही माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 06 May 2025
वाऱ्यासह पाऊस बरसणार! मुंबई व उपनगरांना हवामान विभागाचा इशारा
मालाडमध्ये किरकोळ वादातून वृद्धेची हत्या, शेजाऱ्याला अटक
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना ठप्प!, रक्कम असूनही…
धक्कादायक! पुण्यात दुचाकीवरून पत्नीचा मृतदेह घेऊन जाणारा पती पोलीसांनी हटकल्याने जाळ्यात
नऊ कोटींचा भ्रष्टाचार, थेट प्रादेशिक उपायुक्त निलंबित, काय आहे प्रकरण?
पाकिस्तानातील संकेतस्थळांवर हिंदुस्तान जिंदाबादचे संदेश, सायबर कमांडर गटाने हॅकिंग केल्याचा दावा
वसई विरारची पाणी चिंता मिटणार ,खोलसापाडा-२ धरणाचे ८० टक्के काम पूर्ण , लवकरच अतिरिक्त २२ दशलक्षलीटर पाणी मिळणार
अजित पवारांना इंदापूरकरांचा धसका
राज्यासाठी “हे” २४ तास महत्त्वाचे…
शहरबात : घटत्या फुल उत्पादनाची चिंता…..
पेट्रोल पंपांवर ‘डिजिटल पेमेंट’ बंद? बँकांशी वादामुळे पंपचालकांचा इशारा
सामाजिक आंदोलन उभारण्याची रेषांत ताकद, ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांचे मत
जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त आयोजित व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख यांच्या ‘बोलक्या रेषा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पालव यांच्या हस्ते करण्यात आले.
पिंपरी : मुळा नदीतील अतिक्रमण काढा; पिंपरी महापालिकेला सूचना
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुळा नदीपात्रात पिंपळे निलख स्मशानभूमीजवळ भराव टाकून राडाराेडा टाकत अतिक्रमण केले आहे.
पेट्रोल पंपांवर ‘डिजिटल पेमेंट’ बंद? बँकांशी वादामुळे पंपचालकांचा इशारा
नागपूर : ‘नॅशनल सायबर क्राइम पोर्टल’च्या सूचनेवरून बँकांनी पूर्वसूचना न देता बँक खाते गोठवल्याने पेट्रोल पंप मालकांनी १० मेपासून ‘डिजिटल पेमेंट’ बंद करण्याचा इशारा दिला असून त्यात सामान्य ग्राहक भरडला जाण्याची शक्यता आहे. सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल पेमेंट’कडे मोर्चा वळवल्याने केंद्रीय गृह खात्याने संशयित बँक खात्यातून ज्या बँक खात्यात रक्कम वळती झाली, ते खाते गोठवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार नॅशनल सायबर क्राईम पोर्टलद्वारे बँकांना सूचना देण्यात येत आहे. त्याचा फटका पेट्रोल पंप चालकांना बसत आहे.
अनेक पेट्रोल पंप चालकांचे बँक खाते गोठवण्यात आले आहे, त्यात त्यांचे लाखो रुपये अकडले आहेत. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी यापुढे डिजीटल पेमेंट घेण्यास नकार दिला आहे. याची झळ ग्राहकांना बसणार आहे. बँकांनी आता एटीएममधून रोख रक्कम काढण्यावर शुल्क आकारणे सुरू केले आहे. त्यामुळे वारंवार रोख काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंप चालकांचा डिजिटल पेमेंट व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला असून फोन पे, पेटीएम, गुगल पे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांद्वारे व्यवहार करण्यास मनाई केली जाणार आहे. हा निर्णय सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे